Skip to main content

अनुभव

जगात खरंच भुते आहेत काय?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 27/11/2013 17:07 या दिवशी प्रकाशित केले.

आगावू टीप :- या धाग्याला मीपा.भूत मंडळींनी उगीचीच फाटे फोडू नयेत. नाही तर अतृप्त आत्मा त्यांच्या मानगुटीवर बसेल .

शिव्यांना शिव्या देऊ नये.

लेखक वडापाव यांनी शनिवार, 23/11/2013 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.] सुरुवात झाली 'अईला!!' पासून.

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

शेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर

लेखक रामबाण यांनी शनिवार, 16/11/2013 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
निवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता… त्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज… दोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं..

उद्घाटन

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 14/11/2013 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला. प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले. “कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं. “अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं. मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळं मी नेहमीच करते.

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 14/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत आविष्कार अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय "कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून. "दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे. आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ? मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला.

नवे व्यवसाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 14/11/2013 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

आहे मी ब्राह्मण!! मग??

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/11/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये.

हरवलेला विद्यर्थ

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 04/11/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे. आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली.