Skip to main content

अनुभव

मुंबई धडे - २

लेखक मालविका यांनी शनिवार, 22/12/2018 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई धडे - २ मागच्या लेखात मी चुकून २००५ साली मुंबई ला आल्याचा उल्लेख केला आहे . मी २००६ साली कोकणातून मुंबई मध्ये आले . जूनच्या मध्यावर साधारण क्लास सुरु झाला. मुंबई लोकलची, गर्दीची नि पावसाची हळूहळू ओळख आणि सवय व्हायला लागली. आधी कितीतरी वेळा लोकल मधून होणाऱ्या चोऱ्यांविषयी ऐकलं होत त्यामुळे जाता येता ओढणी गळ्याभोवती गोल फिरवून घ्यायचे. म्हणजे कुणी गळ्यातली चेन ओढायला नको कि ओढणी कुठे अडकायला नको. लहानपणापासून एकटीने प्रवास केला असल्याने स्वतःची नि स्वतःच्या सामानाची काळजी घेण्यास मी समर्थ होते. पण लोकल माहितीची नाही त्यामुळे एक अजाणता भीती मनात होती.

मुंबईचे धडे - १

लेखक मालविका यांनी मंगळवार, 18/12/2018 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ साली बी कॉम ची परीक्षा दिली नि मी नवीन कोर्स करिता कोकणातून मुंबईला येऊन दाखल झाले. ठाण्याला काकांकडे राहण्याची सोय झाली. स्टेशनपासून काकांचं घर अगदीच जवळ होतं. तशी मुंबईला राहायची आणि मुंबईची सवय करून घायची हि पहिलीच वेळ. याआधी कधीतरी फिरायला म्हणून कुणाबरोबर तरी मी मुंबई पाहिलेली. मुंबई बाहेरची असल्याने लोकल जिथपर्यंत जाते त्याला सगळ्याला मुंबई म्हणायचे. माझा क्लास विद्याविहार स्टेशन जवळ होता. तेव्हा रोज ठाणे ते विद्याविहार रोज लोकलचा प्रवास करावा लागणार होता.

अडनिडी मुलं-३

लेखक जेडी यांनी सोमवार, 17/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन .

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 14/12/2018 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर काल रात्री मोठा पाऊस झाला. मी थांबलो होतो तिथे उकाडा व डासांमुळे झोप नाही लागली. जवळजवळ रात्रभर जागाच होतो. पहाटे चारला संस्थेतले एक जण बघायला आले. मग काही वेळ त्यांच्यासोबत बोलत बसलो. पहाटेच्या अंधारात फिरून आलो. संस्थेच्या कामाविषयी आणखी गप्पा झाल्या. नंतर त्यांनी अगत्याने माझ्यासाठी पोहे बनवले. पहाटेही पावसाचंच वातावरण आहे. त्यामुळे चांगला उजेड व्हायला वेळ लागला. त्यामुळे १९ नोव्हेंबरला रोजच्यापेक्षा थोडं उशीरा निघालो. निघतानाही रवीजी आणि मुलांनी खूप उत्साहाने मला निरोप दिला.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

लेखक मार्गी यांनी बुधवार, 12/12/2018 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर) १८ नोव्हेंबरची पहाट, आज प्रवासाचा सातवा दिवस. आज रविवार आहे आणि टप्पा तसा छोटा आहे. आज ७५ किलोमीटर सायकल चालवायची आहे व सतत अनेक दिवस सायकल चालवत असल्याने हे फक्त ७५ वाटत आहेत. एक पेडल मारल्यावर जशी सायकल आपोआप पुढे जाते, एका पेडलचा मूमेंटम जसा दुस-या पेडलला मिळतो, तसाच आता अनेक दिवसांचा मूमेंटम माझ्याकडे आहे. भिती फक्त एकच आहे की, आजच्या रूटवरही रस्ता काही प्रमाणात कमी दर्जाचा आहे. ठीक सव्वा सहाला अंबेजोगाईतून निघालो. यशवंतराव चव्हाण चौकात काल स्वागत झालं होतं, तिथून लातूरच्या रस्त्याला लागलो.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ६. बीड ते अंबेजोगाई

लेखक मार्गी यांनी सोमवार, 10/12/2018 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ६. बीड ते अंबेजोगाई १७ नोव्हेंबरची पहाट. इन्फँट इंडिया बाल गृहातून निघालो. निघताना दत्ता बारगजे जी व सर्व मुलांनी मला निरोप दिला. पहाटे लवकर उठून अगदी प्रेमाने माझ्यासाठी जेवण बनवलं! डोंगर उतरताना आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य वाटतोय! कालच्या भेटीच्या आठवणी मनात आहेत. आजही मला तुलनेने अगदी कमी दर्जाचा रस्ता लागणार आहे. आज असा तिसरा दिवस आहे जेव्हा सुरुवातीला तीस- पस्तीस किलोमीटरपर्यंत असा रस्ता असेल व नंतर चांगला रस्ता मिळेल. असा विचार करतोय किंवा अशी आशा करतोय की फक्त पस्तीस किलोमीटरपर्यंतच असा रस्ता असावा.

कथा विविधा

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 10/12/2018 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, विविध विषयांवरील लेखन आणि कवितांमुळे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या मिपा सदस्या ज्योती अळवणी यांच्या सात निवडक कथांचा समावेश असलेल्या ‘कथा विविधा’ ह्या त्यांच्या पहिल्या कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग काल जुळून आला. मुळात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची माझी हि पहिलीच वेळ होती, त्यामुळे चिन्मयी सुमीत, सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, डॉ. स्नेहलताताई देशमुख, खा. पूनम महाजन, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, समीरा गुजर आणि प्रा.