Skip to main content

अनुभव

आत्तोबा

लेखक लोकेश तमगीरे यांनी रविवार, 04/08/2019 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
७५ वर्षाचा माणूस म्हंटल्यावर साधारणतः आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते हो ? ... ज्याचे दोन्ही गुडघे झिजले आहेत आणि कंबर, पाठदुखी, मानदुखीमुळे जो दिवसाचा ८०% वेळ घरात आराम खुर्ची किंवा बिछान्यावर घालवत आहे. कधी बाहेर काम पडलंच तर लगेच ड्रायव्हरला घेऊन चार-चाकी गाडी मध्ये फिरणारा, स्वतःची सर्व वैयक्तिक कामे दुसऱ्यांच्या मदतीने करून घेणारा, डायबिटिज, हायपरटेन्शन, आर्थराइटिस इ. रोगाने ग्रस्त आणि म्हणून मरणाची सतत चिंता करणारा, किंवा रीटायरमेन्ट होऊन घरी आरामात आयुष्य काढणारा.. पण मी ज्यांना २ वर्षांपासून बघत आलो आहे ना त्यात वर वर्णिल्याप्रमाणे काहीच नाही.

युनिटी इज स्ट्रेंथ

लेखक लोकेश तमगीरे यांनी शुक्रवार, 02/08/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
गोपनार.....भामरागड तालुक्यातील १२१ गावांपैकी एक माडिया आदिवासीबहुल गाव. साधारणतः २२०-२५० पर्यंत लोकसंख्या असलेलं गाव. हेमलकसाहून १३ किलोमीटरचा कुठे पक्का तर कुठे कच्चा रस्ता ओलांडला की कुक्कामेटा फाटा येतो. या फाट्याहून डावीकडे साधारणतः ८-९ किलोमीटरची जंगलवाट आहे. वाटेत ३ मोठ-मोठे नाले आहेत. ६ महिने हा रस्ता सुरळीत चालू असतो. पण एकदा का पाऊस पडला की, मग ४-५ महिने कुठलीही दुचाकी जाऊ शकत नाही. कुक्कामेटा गाव ओलांडलं की समोर वाटेत लाहेरी नदीचं एक मोठं पात्रं लागते. ते लाकडी डोंग्याने पार केल्यावर लष्कर गाव येतं. लष्कर हून २.५ किलोमीटर अंतर गाठलं की अखेरीस गोपनार गाव येते.

आणि भारत एका चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीराला मुकला.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 29/07/2019 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : हा लेख तद्दन फालतू आहे. आम्ही आमच्या बायकोवर, इथे हवे तितके लिहू शकतो. त्यामुळे स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल तर अशाच एका शनिवारची गोष्ट आहे. आम्ही आमच्या बाबा महाराजांचे साप्ताहिक दर्शनासाठी गेलो होतो. अर्थात तीर्थ प्राशन करून मग घरी गेलो. तसे नौकानयन न करता, पंख लावूनच घरी गेलो आणि बघतो तर काय. ..घरी बरीच मंडळी जमलेली. आई-वडील तर होतेच, पण शिवाय बायकोची भावंडे पण होतीच. चपला काढून, जेमतेम बसतोय न बसतोय, तोच बायकोचा हुंदका कानावर आला. आता हिला काय झालं, म्हणून नजर वरती केली, तर मातोश्रींनी हातात एक कागद ठेवला. कसाबसा कागद वाचला.

आमची धमाल मसुरी - ऋषिकेश सहल!

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 24/07/2019 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा दहा जणांचा गृप. त्यापैकी आठ जण (किरण, दीपक, सचिन, धनंजय, आनंद, केदार, संतोष, आणि मी) एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंते झाले. अस्मादिक त्या आठपैकी एक. राहिलेले दोन जण (गजानन, संजय) नंतर मित्र झाले. अगदी जवळचे! आजदेखील आमचा हा गृप अभेद्य आणि अखंड आहे. काही "सामायिक सद्गुणांच्या आणि आवडींच्या" भक्कम पायावर ही मैत्री गेली २३ वर्षे टिकून आहे. नुसती टिकलेलीच नाही तर बहरलेलीदेखील आहे आणि चविष्ट लोणच्याप्रमाणे मुरलेलीदेखील आहे. इतकी मुरलेली आहे की कुणी नुसतं "कधी?" असं विचारलं की बाकीच्या सगळ्यांना लगेच अचूक संदर्भ लागतो.

खाजगी मंदिरे की उर्मटपणा चे अड्डे?

लेखक शान्तिप्रिय यांनी शनिवार, 20/07/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो .अतिशय मोठ्या कालखंडानंतर मिपावर लिहीत आहे. सर्व कसे आहात? कंकाका यांचेशी मी अधून मधून संपर्कात असतो. मिपावर फोटो चिकटवणे ही खूप किचकट प्रक्रिया आहे म्हणून थोडा कंटाळा करत होतो.या लेखात फोटो असण्याची गरज नाही हा भाग वेगळा. फोटोसाठी काही युक्त्या कंकाका यांनी सांगितलेल्या आहेत त्या करून पाहतो.असो ....आता लेखाच्या विषयाकडे वळूया. खाजगी मंदिरे हा एक अतिशय भयानक प्रकार अलीकडेच पुण्यात पाहिला.

श्री शरद पवार _एक आठवण -------------------------------

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
. माझं एम आय डी सी भोसरी मध्ये लघु उद्योग युनिट होते साल नेमके आठवत नाही पण कै विशवनाथ प्र सिंग हे त्या काळात प्रधान मंत्री होते एके दिवशी बातमी आली की सिंग सरकारने लेबर चार्जेस कारणा-या कारखान्या ना पण एक्ससाईज ड्युटी लागू केली आहे हि बातमी समजतात आम्हा उद्योजकांच्या पोटात गोळा उभा राहिला पोस्ट समजण्या साठी लेबर चार्जेस म्हणजे काय ते समजावून घेणे आवश्यक आहे उद्योजकांची २ प्रकारात वर्गवारी होते १- म्यानुफ्याक्चरर म्हणजे स्वताचे प्रोडक्त्त असणारे म्यानुफ्याक्चरर कडे स्वताचे प्रोडक्त्त असते त

मंतरलेले दिवस – १

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 16/07/2019 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या महायुद्धातली गोष्ट. लंडनवर जवळजवळ रोज बॉंबवर्षाव. अशा काळात शहरात ‘ब्लॅक आऊट’ पाळतात तसा लंडनमध्येही तेव्हा होता. रस्त्यावरचे दिवे बंद. प्रत्येक घराच्या प्रत्येक खिडकीला जाड पडदे. प्रकाशाचा कवडसा देखील बाहेर येता नये. रात्री शहर कुठे आहे हे बॉंबफेक्या विमानांतून नुसत्या डोळ्यांनी दिसू नये म्हणून घेतलेली दक्षता. नाईट व्हीजन गॉगल्स अजून आले नव्हते. असेच कडक ब्लॅक आऊटचे दिवस. एके सायंकाळी एका घरातून प्रकाशाची तिरीप बाहेर येत होती. गस्त घालणारा एक पोलीस त्या घराचा दरवाजा अधीरतेने ठोठावतो. दार उघडणार्‍या व्यक्तीला पोलिसी खाक्याने दरडावत काळजी घेण्यास सांगतो.

कुत्रत्वाचं नातं

लेखक इरामयी यांनी शुक्रवार, 12/07/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 02/07/2019 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझं "पलायन" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.