Skip to main content

अनुभव

फुलांची फुल स्टोरी...

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 13/10/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ येत आहे. दिवाळीमध्ये धन्वंतरी पुजनामध्ये खाली मंत्र म्हंणण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. श्रीमत भागवतामध्ये (३/१५/१९) मध्ये सदर श्लोक पहायवयास मिळतो. सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:| बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद यात अनेकविध फुले तसेच वनस्पती, वृक्षांचा उल्लेख येतो. व या व अशा प्रकारच्या फुलांच्या समर्पणाने जगदीश्वर प्रसन्न (प्रसन्न म्हणजे आनंदीत) होतो. अशा आशयाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ फुले समर्पण भाव जागा करु शकतात असा होतो. लहान मुलांच्या निरागस, निर्लोभ स्वभावाला अनेकदा आपण फुलांची उपमा देतो.

बुलेट घेतल्यापासूनचे सुखद क्षण

लेखक वामन देशमुख यांनी शुक्रवार, 13/10/2017 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!” *** ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो.

बळी [शतशब्दकथा]

लेखक निओ यांनी रविवार, 08/10/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर. समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला. .................................. लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.

कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 06/10/2017 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
गाभा: माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा ! १) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सां

सोनदऱ्यातली दिवाळी

लेखक Naval यांनी गुरुवार, 05/10/2017 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
sonadara दिवाळीचं वातावरण सुरु झालं कि आजही आठवते ती आम्ही साजरी केलेली एक आगळी वेगळी दिवाळी. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा (आईचे वडील) शिक्षण उपसंचालक म्हणून रिटायर झाल्यानंतर एका आश्रमशाळेत जाऊन राहत होते. रिटायरमेंटनंतरच आयुष्य सामाजिक कामात वाहून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. डोमरी,कोठिंबा आणि यमगरवाडी या तीन गावातल्या आश्रमशाळांशी ते जोडले गेले. त्यांच्या कामात होईल तो वाटा ते उचलत होते. त्यांच्याकडून आम्ही नेहमी तिथले खूप किस्से ऐकायचो. ते आम्हाला म्हणायचे अरे ते आयुष्य येऊन बघा एकदा तरी.

योग- ध्यानासाठी सायकलिंग

लेखक मार्गी यांनी बुधवार, 27/09/2017 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. योग- ध्यान ही थीम घेऊन एक सायकल मोहीम करणार आहे. सायकलिंगचा योगाशी व ध्यानाशीही जवळचा संबंध आहे. किंबहुना सायकलिंग, रनिंग, वेगवेगळे क्रीडा प्रकार किंवा नृत्य ह्या सगळ्यांचा संबंध योग व ध्यानाशी आहे. पश्चिमोत्तानासनासारखी काही आसन करणं कठीण असतं. किंवा सूर्य नमस्काराच्या तिस-या स्थितीत काही जणांचे हात जमिनीला स्पर्श करू शकत नाही. पण सायकलिंग- रनिंगमुळे अशी आसनं करता येतात. शिवाय एंड्युरन्सच्या एक्टिव्हिटीमध्ये हृदय जास्त हवा पंप करतं, त्यामुळे सायकलिंगसारख्या व्यायामानंतर भस्त्रिकासारखं प्राणायामसुद्धा जास्त तीव्रतेने करता येतं.

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

ग्राम"पंचायत" लागली..!! -2

लेखक विशुमित यांनी शनिवार, 23/09/2017 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राम"पंचायत" लागली..!! -1 यंदा बिनविरोध होणार नाही, हे माझ्या अगोदर नानांनी त्या होलपाटण्या मन्याला का सांगितले असावे? घरातल्या माणसांना किंमतच नाही दिली कधी नानांनी. कधी कोणासमोर चांगल्या कामाचे कवतुक नाही केले. स्वतःला सांगलीच्या आबांचे पाईक समजत राहिले आयुष्यभर. वडाच्या झाडाखाली रोपटे येत नाही हे मान्य पण कोणालाच वर येऊन नाही द्याचे, असे एकंदरीत वडाचे लॉन्ग टर्म धोरण असावे बहुतेक. कधीच कुठल्या मिटिंग मध्ये सहभागी होऊ नाही दिले.

कंपास पेटी

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 20/09/2017 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

कंपास पेटी

********************** आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!!

गच्ची वरुन...

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 14/09/2017 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे. आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय. --चिनी गुलाबाचे कलम करून नवीन कलर बनवता येईल का ? --भाबड्या अपेक्षा लागल्यात फुलांच्या रंगाच्या --बरेचसे ड्युअल कलर बघितलेत मी नेट वर --सगळ्याना द्यायला सोपे जाईल...