Skip to main content

अनुभव

आली गौराई अंगणी

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 30/08/2017 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी. तर आमच्या गौरीच्या आगमनाची तयारी श्रावण संपतानाच चालू केली जाते. सुरुवात होते घमेलंभर तांबडमातीपासून.

अचानक भेट एका अजब व्यक्तिमत्वाशी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शुक्रवार, 25/08/2017 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
२३ ऑगस्ट , दुपारची नेहमिची गाडी ,जागा ही नेहमीचीच डब्यात फक्त तीन चार माणसे .. जागा निवडीला भरपूर वाव . पूर्ण हवेशीर खिडकिशी बसुन मोबाईल शी खेळणं सुरु .. इतक्यात " ही गाडी घाटकोपर ला थांबत्ये का" असा लोकल च्या नेहमीच्या प्रवाशाला कधीच न पडणारा प्रश्न कानावर पडला , म्हणून वर पाहीले . एक वृद्ध पण तंदुरुस्त व्यक्ती मलाच विचारत होती हा प्रश्न. हो , ही गाडी सर्व स्थानकांवर थांबेल .. आराम करा, असे हसत हसत सांगुन ,पुन्हा मोबाईल मध्ये डोकं घालायच्या विचारात असतानाच , मी इथे बसु का तुमच्या शेजारी ?

रूममेट (स्वानुभवावर आधारित काल्पनिक कथा)

लेखक प्रशांत लेले यांनी बुधवार, 16/08/2017 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
रूममेट भाग १ ICWA ची परीक्षा पास झालो आणी कॅडबरी मध्ये नोकरी लागली. पहिलाच जॉब आणी तो पण कॅडबरी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये, त्यामुळे खुश होतो. थोडे टेंशन सुद्धा होते. त्यातून कामाचे ठिकाण होते सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुका. कॅडबरी कंपनीची एक काँट्रॅक्ट मनुफॅक्चरिंग साईट फलटण तालुक्यातील साखरवाडी गावात होती. कॉन्ट्रॅक्ट मनुफॅक्चरर कंपनी होती डॉ. रायटर्स. कॅडबरी ची आम्ही एकूण चार माणसे होतो. सुधीर, रवी, मी आणी योगेश. बाकी सर्व स्टाफ आणि वर्कर्स डॉ. रायटर्स चे होते. योगेश भावसार म्हणजे आमचे साहेब. भावसार साहेब प्रोडक्शन सांभाळायचे.

पैठणी दिवस भाग-३

लेखक गुल्लू दादा यांनी मंगळवार, 15/08/2017 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे. असेच एके दिवशी मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या वडिलांना घेऊन मलमपट्टी विभागात आले. दोघेही एकमेकांवर मारवाडी भाषेत ओरडत आले. वडील मुलाला म्हणत होते, 'मला नाही करायची पट्टी बिट्टी'. त्यांचा मुलगा पण त्यांना प्रतिउत्तर देत होता.

खरेदी एक भोग!

लेखक sudhirvdeshmukh यांनी सोमवार, 14/08/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
खरेदी एक भोग ! जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.

#अनुभव#

लेखक भित्रा ससा यांनी सोमवार, 14/08/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ; माझे हे पहिलेच लेखन सूचनांचे स्वागत अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे. गेल्या वर्षीच्या जानेवारीची गोष्ट. वाडवडिलांची पुण्याई जमिनीच्या रूपात भेटलेली त्यामुळे आमचा शेती हा बाजूउद्योग सुरू असतो . दिवसा संगणक दुरुस्ती व रात्री भिजवणी असा रुटीन ठरलेला होता . हरभरा जोमात आलेला पण पावसाने थोडा दगा दिला त्यावर उपाय म्हणून तुषार सिंचन सयंत्र जोडण्याचा निर्णय एकट्याच्या बहुमताने मंजूर केला.

पैठणी दिवस भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 12/08/2017 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

#कटींग_पाटली_व_हिप्पीकट

लेखक sudhirvdeshmukh यांनी मंगळवार, 08/08/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
#कटींग_पाटली_व_हिप्पीकट लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे.

पैठणी दिवस भाग-१

लेखक गुल्लू दादा यांनी गुरुवार, 03/08/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

जनरेशन गॅप आणि निळाई

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी बुधवार, 02/08/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.