Skip to main content

अनुभव

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - जुन २०१७ - हार्ट रेट मॉनीटर (भाग १)

लेखक विंजिनेर यांनी गुरुवार, 01/06/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "विंजिनेर"! व्यायामात आपले हृदय महत्वाची भूमीका बजावते.

चंद्रशिला ट्रेक

लेखक अजय भागवत यांनी गुरुवार, 01/06/2017 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालयात ट्रेकिंग करणारे अनेकजण आहेत. काहीही विशेष नाही. पण जर एखाद्याला चंद्रशिला ट्रेक बद्दल माहिती हवीच असेल तर येथे पहावी - https://drive.google.com/file/d/0B8a9AFSuwpEscFl6MUVLeVYwckU/view?usp=s… फोटो पाहायचे असतील तर येथे पाहावेत - https://goo.gl/photos/8nyD3bMpEcACqttU6

एका गारुड्याची गोष्ट १४: बिनविषारी साप ! (समाप्त !)

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 31/05/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्ष मध्ये निघून गेली, डिग्री झालीं, स्थलांतर झाले, नोकरी लागली आणि मग लिहिण्यासाठी हात सळसळू लागले. इ.स.पू. मध्ये मी बिनविषारी सापांच्या लेखाची सुरवात धामणी वरील लेखाने केली होती, आता या लेखात इतर बिनविषारी सापांबद्दल बोलतो. साधारणतः लोकासाठी कुठला पण साप "विषारीच" असतो आणि तो मारलाच पाहिजे असे विचार असतात. खरे म्हणजे जवळपास ८०% साप बिनविषारी आहेत. अगदी आपल्या आख्या (पुणे) शहरी आयुष्यात सारसबाग गणपतीच्या आरती मध्ये इखादी मुलगी वळून आपल्या कडे बघेल किंवा कुलकर्णी पंपावर पेट्रोलच्या रांगेत पेठीय मुलगी वळून हसेल पण आख्या आयुष्यात एक विषारी साप दिसणार नाही.

आधी नाकाने, मग जीभेने

लेखक सरनौबत यांनी रविवार, 28/05/2017 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधी नाकाने, मग जीभेने खाद्यपदार्थांची चव घेताना जीभ ह्या इंद्रियांच्या सिंहाचा वाटा असला तरी डोळे आणि नाक ह्यांचे देखील बरेच महत्व आहे. पुलं नि 'अपूर्वाई' मध्ये फ्रेंच जेवणाचे त्याच्या उत्कृष्ट प्रेझेंटेशन मुळे; 'आधी डोळ्यांनी, मग जीभेने' असे वर्णन केले आहे. भारतीय जेवणात देखील रंगसंगती आणि मांडणीचा विचार करून पान वाढण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे.

प्रदूषण... (लघुकथा)

लेखक चिनार यांनी मंगळवार, 23/05/2017 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या मधोमध बांधलेला तो फ्लायओव्हर रखडून रखडून शेवटी पूर्ण झाला. उदघाटन,कौतुकसोहळे पार पडले. मुख्यमंत्री स्वतः आले होते उदघाटनाला. काही विरोधकांनी पर्यावरणाच्या वगैरे घोषणा दिल्या मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना. विरोधकांच्या मते, या फ्लायओव्हरसाठी झाडं तोडण्यात आली, सिमेंटच्या अजस्त्र बांधकामामुळे शहराचं तापमान वाढू शकते, वाहतूक वाढल्यामुळे प्रदूषण होईल वगैरे वगैरे. ते काय नेहमीचंच असतं. मुख्यमंत्री स्वतः विरोधक असताना त्यांचंही मत काही वेगळं नव्हतं! पण एकदा सत्तेच्या सागवानी खुर्चीत बसल्यावर जंगलातील सागवानाविषयी आस्था तुटते ती कायमचीच!

सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/05/2017 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात? तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात? सालस आणि आज्ञाधारक आहात? आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे? तर मग आजच सावध व्हा! ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल! तुमच्या अंगात ठाण मांडून बसलेला हा सद्गुणाचा पुतळा निर्धाराच्या घट्ट दोरखंडाने बांधा, एका भक्कम लोखंडी पेटीत टाका, पेटीला भलेमोठे इच्छाशक्तीचे लोखंडी कुलूप लावून ती पेटी हेलिकॉप्टरमधून मिसाईलला बांधून समुद्राच्या मध्यभागी खोल तळाशी भिडेल इतक्या जोरात फेकून द्या आणि चाबी वितळवून टाका.

डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/05/2017 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यांची/नजरेची काळजी कशी घ्यावी ? मलासे वाटते मनुष्यजातीच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढी दृष्टीविषयक व्याधींची समस्या आजच्या घटकेला निर्माण झालेली आहे. काही काळ आधीपर्यंत नेत्रविकार तज्ञांकडे वयस्क आणि वृद्ध लोक जास्त आलेले दिसत. आताशा लहान वयाच्या मुला-मुलींचा भरणा जास्त दिसतो, ही बाब अत्यंत चिंतादायक आहे. हल्ली कुणाकडेही जा, लहान मुले मोबाईल वा टीव्हीला चिकटलेली दिसतील. अगदी आठ-दहा महिने वयाच्या बाळांना देखील दूध पीताना वा काही खाताना कार्टून लावून दिले नाही, तर ती खात-पीत नाहीत, असे त्यांच्या आया सांगताना दिसतात.

अग्निशामक दल आणि आमचे "अग्निकारक प्रसंग"

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 14/05/2017 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला- स्थळ : आमचे घर वेळ: मध्यरात्रीचे २.३० स्वयंपाकघरात काहीतरी आवाज झाला म्हणून वडिलांना जाग आली म्हणून ते उठून बघायला गेले. तिथे मिट्ट अंधार होता . . . फक्त फ्रीजमागे एक दिव्य प्रकाश दिसत होता . काही कळायच्या आतच आमचा ६ फुटी डबल डोअर फ्रीज भसाभस पेटला . वडिलांच्या डोळ्यासमोर त्याही अवस्थेत अंधारी आली. तडक ते माझ्याकडे आले आणि मला व आईला उठवले . मी धावत स्वयंपाकघरात गेलो तर तिथे अग्नितांडव सुरू होते. माझ्या लक्षात आलं की गॅसचा सिलेंडर वाचवला पाहिजे पण तो काढणं अशक्य होतं. सिलेंडर पेटला असता तर अख्खी बिल्डींग उडाली असती . . . पण आता आयुष्य केवळ दैवाच्या हवाली होतं . . .

शाळा- मंतरलेले दिवस

लेखक योगेश आलेकरी यांनी शुक्रवार, 12/05/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.

शाळा- मंतरलेले दिवस

स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार a शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं.

खानदेश...!

लेखक हर्षु यांनी गुरुवार, 11/05/2017 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
काहि दिवसांपुर्वी एका लग्नाच्या निमीत्ताने जळगाव ला जाण्याचा योग आला. मराठवाड्याबाहेर जाण्याची तशी हि तिसरी - चौथी वेळ, पण आधी बघीतलं ते पुणंच. तिथले ते प्रवेश करताच दिसनारे माॅल्स, अजस्ञ रस्ते माझ्या शहरी मनाला खुप भावायचे. पण माझ्या ह्या खानदेश वारीनं माझ्या डोळ्यवरली ती माॅल ची झापडं पार उतरवली. तसं फार काहि नाहि पाहिलं मी तिथं, पण जे दिसलं ते नक्कीच मनाला सुखावनारं होत.