Skip to main content

अनुभव

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 10/05/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती.

जिद्द

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 08/05/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा . . . . . . जिद्द . . . . . . . . . . . . . . विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.

हरवले सापडले : एक विलक्षण अनुभव

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 07/05/2017 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ७ मे २०१७ वेळः साधारण रात्रीचे ८-३० गेल्या काही तासांपूर्वीच ही घटना घडलेली आहे. पायाखालची जमीन सरकणे,जग स्वत:भोवती फिरणे पासुन ते हॅपी एंडीग पर्यंतचा विल्क्षण अनुभव ह्या घटनेने दिला. व दरम्यान देवावरची श्रध्दा अजुन मजबुत झाली. झाले असे कि आज रविवार व घरी एकटा असल्याने संध्याकाळच्या जेवणाची सोय करण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या महीन्याचे रेंटचे पैसेही घरमालकाला द्यायचे होते.रक्कम दहाहजारावर होती. पण आधी बाहेरची कामे उरकु व नंतर पैसे देऊ असा विचार करुन रक्कम पाकिटात ठेवली. जाताना नेहेमीप्रमाणे बर्म्युडा टी शर्ट अश्या टिपिकल घरगुती पेहेरावात गेलो. होण्डा अ‍ॅक्टीवा काढली.

एका पुस्तकाचा शोध..

लेखक मोदक यांनी रविवार, 07/05/2017 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
. ...अरे हो, हे पुस्तक बघ. तुला नक्की आवडेल. डिसेंबर महिन्यात एका काकाच्या घरी दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान बराच वेळ गप्पा, जेवण आणि इतर विषय बोलून झाल्यानंतर काकाकडे असलेले कैलास मानस सरोवर यात्रेवरील एक पुस्तक वाचून संपवले. रात्री झोपण्याआधी काकाने अचानक एक पुस्तक हातात ठेवले. भरभक्कम वजनाचे ते पुस्तक बघून आणि विशेषतः त्यातील अनुक्रमणिका बघून झोप उडालीच.

"जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 06/05/2017 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपणास माहीतच आहे की 1 Jan 2011 ते 19 Feb 2011 या कालावधीत मी "जलजीवा" ही सायन्स फिक्शन, थ्रिलर/फँटसी कादंबरी लिहिली होती. ती मायबोली आणि मिसळपाव या वेबसाईटस वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती आणि जगभरातील अनेक मराठी वाचकांना ती आवडली होती आणि तशा प्रतिक्रियासुद्धा मला आल्या होत्या आणि अजूनही येत असतात. 2016 साली ती बुकस्ट्रकने ती प्रकाशित केली आणि त्यापाठोपाठ ईसाहित्य.डॉटकॉम तसेच डेलीहंटने पण ती प्रकाशित केली. तसेच गुगल प्लेस्टोर वर सुद्धा ती उपलब्ध आहे.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

लेखक इडली डोसा यांनी गुरुवार, 04/05/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं. या वर्षी व्हॅंकुवरला शिफ्ट झाल्यामुळे लोकप्रिय विंटर स्पोर्ट असलेल्या स्किईंगचा अनुभव घेता आला. घरापासून ३० ते ५० मिनिटांच्या ड्राईव्हवर ३ स्की रिसॉर्ट असल्यामुळे आधी एखाद्य ठिकाणी जाऊन कसे वाटते ते बघू आणि मग पुढे शिकायचे कि नाही ते ठरवू असं ठरवलं.

होशंगाबादला काय काय बघावे? मिपाकर हैत का तिथे ?

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 02/05/2017 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, उद्या संध्याकाळी मी होशंगाबादला पोहोचून ४ दिवस तिथे रहाणार आहे. बहुशः मोकळाच असेन. तरी तिकडे काय काय बघण्यासारखे आहे ? नर्मदेचे सौंदर्य बघायला सर्वोत्तम जागा/वेळ कोणती? काही प्राचीन अवशेष, किल्ला, जंगल वगैरे आहेत का ? शिवाय कोणी मिपाकर आहेत का ? कळवावे. जायचे अचानक ठरल्याने आधी विचारणा करता आली नाही. कदाचित तिथे नेट नसेल, त्यामुळे तिथे मिपाकर कुणी असतील तर मला कृपया फोनने संपर्क करावा. ९९५३९०८२२१.

एका माणसाची गोष्ट

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 01/05/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा ************** **एका माणसाची गोष्ट ** शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?" " हो, तुला कसं कळलं ?" " असं कसं ? तुम्हाला कोण ओळखत नाही? " अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं. " बरं तुझी गाडी कोणती ?' " मॅक्स आहे साहेब " " टेप ?" " आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.." " पण ड्रायवर चांगला का ?" " एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा" " अरे...!

साद

लेखक मिडास यांनी सोमवार, 01/05/2017 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आजोबांना एक सवय होती, ते कुठल्याही लहान मुलाला 'देवा' अशी हाक मारायचे. खूप गम्मत वाटायची त्या गोष्टीची. त्यांची ती हाक ऐकण्यासाठी म्हणून मग मी मुद्दाम लपून बसायचो कुठेतरी. घराच्या एखाद्या अनोळखी कोपऱ्यात दडून त्यांची हाक ऐकण्यामध्ये एक अपूर्व असा आनंद होता. या म्हाताऱ्या लोकांच्या आवाजात काय जादू असते कळंत नाही. सतत मुरत असलेल्या मुरंब्याची गोडी असते त्यांच्या स्वरात. त्यांच्या स्वरांची जादू असेल किंवा त्या शब्दाची असेल पण कसलीतरी भूल पडत होती त्या वेळी.

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 22/04/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.