Skip to main content

अनुभव

इक बंगला मेरा न्यारा--२

लेखक तिमा यांनी सोमवार, 20/02/2017 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्रः- त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली. मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!! दोन दिवस नुसतेच गेले. तिसर्‍या दिवशी सकाळी मुंबईहून मुलगा आला. काम सोडून यावे लागल्यामुळे थोडासा त्रासलेला वाटला. कोचावर स्थानापन्न झाल्यावर घरातल्या कुटुंबप्रमुखाने विषयाला हात घातला. "तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी, पण इथे हिला आणि माझ्या मुलाला जरा वेगळे अनुभव येत आहेत." "काय झालं ?" मुलाने विचारलं. " माझ्या मुलाला वरच्या खोलीत एक आजोबा दिसले, असं तो म्हणतो. पण आम्हाला काहीच दिसलं नाही." त्यामुळे, ही जरा अस्वस्थ झालीये.

शिवसुर्यजाळ

लेखक भटक्या चिनु यांनी रविवार, 19/02/2017 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज भोसले ह्यांची तारखेनुसार जयंती. शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप | शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी || शिवरायांसी आठवावें | जीवित तृणवत मानावेँ | इहलोकी परलोकी उरावे | कीर्तीरूपें || आपल्या दैवताला शतशः वंदन करुन गेल्या वर्षी मला आलेला एक अनुभव आपणासोबत सांगु इच्छितो. २०१५ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लग्नसमारंभ, देवदर्शन आटोपुन शनिवारी(२६डिसें.)जुन्या नाशकात(नाशिकला) माझा मुक्काम होता. संध्याकाळी फेरफटका म्हणुन मावसभावासोबत दुचाकीवर बाहेर पडलो. बर्याच वर्षांनंतर नाशिकची बोचरी; पण मस्त थंडी अनुभवली(५°से).

इक बंगला मेरा न्यारा.

लेखक तिमा यांनी शनिवार, 18/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही या बंगल्यात अनेक वर्षं राहिलो आहोत. माझ्या वडिलांनी हौसेने चांगला प्रशस्त बंगला बांधला. तेंव्हापासून इथे रहाण्याची इतकी संवय लागली होती की चार दिवस कुठे गांवाला गेलो तरी आईला मी, परत कधी जायचं, असं सारखं विचारुन भंडावून सोडत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरगांवच्या कित्येक चांगल्या ऑफर्स मी नाकारल्या आणि आमच्या गांवातच नोकरी पत्करली. पगार थोडा कमी मिळायचा, पण मला ही जागा सोडायची नव्हती. आयुष्य तसं संथगतीने पण खाऊन्-पिऊन सुखी गेले. मुलं मोठी झाली, थोरला अमेरिकेला गेला आणि धाकटा मुंबईला गेला. थोड्याच दिवसांत त्याने मुंबईतल्या धंद्यात जम बसवला. मोठा फ्लॅट घेतला.

Brevet des Randonneurs Mondiaux 300

लेखक देशपांडेमामा यांनी गुरुवार, 09/02/2017 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक थोडे विचित्र आहे कारण १) हे फ्रेंच भाषेतले आहे आणि २) हा प्रकार जो पर्यंत सायकलींगची आवड लागत नाही तोपर्यंत काही कळत नाही :-) BRM च्या अधिक माहीतीकरता मोदकभाऊंच्या ह्या धाग्याला भेट द्या डिसेंबर २०१६ मध्ये २०० ची BRM म्हणजेच long distance cycling चा २०० किमी चा प्रकार पुर्ण केला होता. त्यानंतर काही ना काही कारणाने पुढचा ३०० चा प्रकार करता आला नाही. पण फेब्रुवारी २०१७ चा करायचाच असे ठरवले कारण पुढला थेट जुन मध्ये होता/आहे. नोंदणी वगरे सगळे सोपस्कार करुन तयारीला लागलो आणि नेमक तेव्हा काम वाढलं !

पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव

लेखक तिमा यांनी गुरुवार, 02/02/2017 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली.

बडे तो बडे, छोटेमिया सुभानल्ला !

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 27/01/2017 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल सुट्टी. झेंडावंदन करून झाल्यावर रीतसर जिलबीचे जेवण झालेले. सुट्टी म्हणून दुपारी मस्तपैकी ताणून द्यावी की दुर्दर्शनच्या शिरेलीने डोक्याची मालिश करून घ्यावी हा विचार सुमारे तीन मिनिटे करून झाल्यावर लक्षात आले की शाळेला सुट्टी असल्याने बाहेर चाललेल्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या धुडगूसामुळे निद्रादेवीच्या राज्याचा रस्ता सापडणे कठीणच. प्रजासत्ताक दिन म्हणजे जवळजवळ बालसत्ताक दिनच असे समीकरण करायला हरकत नाही. माझ्या घराशेजारी एकूण तीन अपार्टमेंटस असल्याने बाल-सत्ताधाऱ्यांची मांदियाळीच होती. तेव्हा दुर्चित्रवाणीचा पेटारा पेटवला आणि सोफ्यावर ऐसपैस अंग पसरले.

एक वादळी जीवन: ओशो!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 25/01/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक वादळी जीवन: ओशो! सर्व मान्यवरांना नमस्कार! हा लेख उघडल्याबद्दल धन्यवाद. नुकतीच ओशोंची पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने लिहिलेला लेख आपल्यासोबत शेअर करत आहे. मी ओशोंवर पूर्वी लिहिलेला लेख इथे वाचता येईल. विसाव्या शतकात भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवरील क्रांतीकारी व्यक्तींमध्ये ओशोंचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. १९३१ ते १९९० ह्या ५९ वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे वादळ निर्माण केलं ते अजूनही सुरू आहे. १९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 19/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.

देवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा!

लेखक सिंधू वडाळकर यांनी बुधवार, 18/01/2017 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपुलकी, जिव्हाळा, दया, माया आणि आल्हादाच्या रेशमी धाग्यांनी नटलेली वास्तू म्हणजे आपले घर असते. अशा घरास गंगेचे पावित्र्य लाभलेले असते. माझे घर छोटे आणि दोन मजली आहे. वरच्या घरात एका कोपऱ्यात माझी एक आवडती खास जागा आहे. ती म्हणजे माझे देवघर! देवघरात मोजकेच देव आहेत. त्यात गणपती हे माझे आराध्य दैवत आहे आणि रेणुका देवी ही माझी कुलस्वामिनी आहे. या देवांची मी रोज उपासना करते. रोज तीन तासांची माझी उपासना असते. सुख दु:खाला मोकळीक करून देण्याची ही माझी जागा आहे. देवघरात गणपतीची छोटी आणि सुबक अशी मूर्ती आहे. त्याची मी आवर्तने करते. तसेच देवघरासमोर मी ध्यान धारणा करते. त्यामुळे मला शांती लाभते.

घेई छंद!

लेखक सिंधू वडाळकर यांनी मंगळवार, 17/01/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाला अनेक छंद असतात. कुणाला वाचनाचा, कुणाला लिहिण्याचा, कुणाला झाडे लावण्याचा, कुणाला पशुपक्षी पाळण्याचा. छंदाशिवाय जीव म्हणजे सुकाणूशिवाय होडी होय. मला अनेक छंद आहेत आणि ते मी आजपर्यंत जोपासले आहेत. मानवी जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रद्धेविना जीवन रुक्ष आहे. याला कारण म्हणजे लहानपणापासून मी घरातील अध्यात्मिक वातावरणात वाढले. माझ्या वडिलांना अध्यात्माची खूप गोडी होती. "जीवनात कुणाचेही मन विनाकारण दुखवू नये. कुणाचाही द्वेष, मत्सर करून नये. मन शुद्ध असावे. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते!" असे ते सांगत. रात्री वडील आम्हाला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगत.