अनुभव
विहार...भाग ४ (अंतिम)
आधीच्या तीन भागांची लिंक
http://www.misalpav.com/node/39239
http://www.misalpav.com/node/39266
http://www.misalpav.com/node/39271
वॉर्डमधल्या डॉक्टरांनी अहमदला सांगितले,
"उद्या सकाळी इरफानला डिस्चार्ज मिळणार."
एकीकडे मुलगा बरा झाल्याचा आनंदामुळे अहमदच्या चेहऱ्यावर हसू होते. पण मनात कुठेतरी तो अस्वस्थ होता. गेले कित्येक दिवस एक प्रश्न स्वत:ला विचारण्यापासून त्याने अडवून धरला असला तरी आता ती वेळ आली होती.
माण णा माण, मी पायला सुलताण!
प्रसंगः- वोल्वोचा प्रवास
वेळः अर्थातच कुवेळ
घटना:- सुलताण पिक्चर बघायला लागणे
तर, मी आपला, असाच मौजमजेसाठी प्रवास करत होतो. तसं पहिल्यांदा, बरं चाललं होतं. म्हणजे बस वेळेवर सुटली होती, सीट मनासारखी मिळाली होती, रिक्लायनिंग सीट चक्क काम करत होती, वरचा एसीच्या हवेचा फवारा बंद करता येत होता. गंतव्य स्थान यायला चांगले चार तास तरी होते. छान पैकी डुलकी काढावी, म्हणून डोळे मिटले. अल्पावधीत झोप लागलीही. थोड्याच वेळात मोठ्ठ्या आवाजात पार्श्वसंगीत सुरु झाले. दचकून जागा झालो(यांच्या पार्श्वभागावर एक सणसणीत ... द्यावी अशी इच्छा झाली). समोरचा टी.व्ही. चालू झाला होता.
दांडी मारणे - एक विलक्षण कला
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.
विहार…भाग ३
पहिल्या दोन भागांची लिंक,
http://www.misalpav.com/node/39239
http://www.misalpav.com/node/39266
अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !!
रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे.
विहार…भाग ३
पहिल्या दोन भागांची लिंक,
http://www.misalpav.com/node/39239
http://www.misalpav.com/node/39266
अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली होती !!
रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे.
विहार...भाग २
पहिल्या भागाची लिंक
http://www.misalpav.com/node/39239
चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !!
हे सगळं आठवल्यावर अहमदच्या अंगावर शहारे आले. भानावर येताच आपण होडीवर असल्याचे त्याच्या ध्यानात आले. अहमदने त्याच्या बायकोला जास्त तपशील न सांगता फक्त नडियाडला जावे लागेल एवढेच सांगितले. तिला त्याचे गांभीर्य पूर्णतः: कळले नसले तरी ती चिंतातुर झालीच. नाडियाडला तिचा लांबच्या नात्यातला एक भाऊ राहायचा. त्याच्याकडे उतरता येईल असे तिने अहमदला सांगितलं. अहमदला या गोष्टीची काळजी नव्हतीच.
प्रमोशन
माॅर्निंग ब्रेकची वेळ.
ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.
विहार... भाग १
निळ्याशार समुद्रात रोजच्याप्रमाणेच अहमद होडी घेऊन निघाला. सोबतीला त्याचा वीस-एकवीस वर्षांचा कोवळा मुलगा इरफान होताच.खरं म्हणजे, आज मुलाला सोबत घेण्याची त्याची इच्छा नव्हती. भर समुद्रात मुलाला काही त्रास झाला तर काय हा प्रश्न आज पहिल्यांदा त्याला पडला होता. पण इरफान घरातही स्वस्थ बसला नसताच. इरफान क्रिकेट खेळायचा.सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे एकतर वडिलांसोबत समुद्रात जाणे किंवा क्रिकेट खेळणे एवढाच त्याचा उद्योग असायचा.
सुरवंट
मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.
मिसळपाव