Skip to main content

अनुभव

Now she does not bite…!

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 21/09/2016 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख अनाहितामधे पूर्वप्रकाशित आहे आणि तिथले काही उल्लेखनीय उत्तम साहित्य ज्यात कोणतेही वैयक्तिक संदर्भ नसतील असे यापुढे नियमितपणे लेखिकांच्या परवानगीने मिपावर सर्वांसाठी खुले करू. - अनाहिता) ------------------------------------ (आमची प्रेरणा) मागच्या महिन्यात आमच्या घरी मोठाच फंडा झाला.. नाही हो, माझा अन माझ्या नवऱ्याचा नव्हे, तिचा अन तिच्या पिल्लांचा ! सगळा घोळ माझ्या झाडांच्या हौशीमुळे झाला असं नवऱ्याचं म्हणणं.

दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

लेखक मार्गी यांनी रविवार, 18/09/2016 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अदू. . . . काल तुझा दुसरा वाढदिवस झाला! तू दोन वर्षांची झालीस! कालचं तुझं नाचणं, सेलिब्रेशनमध्ये हसणं, सगळ्यांसोबत खेळणं, गोल गोल फिरणं आणि न कंटाळता न रडता अखंड स्टॅमिना ठेवणं. . . खरोखर शब्द फार फार अपुरे आहेत. मला काल तुझी आणखीन एक गोष्ट विशेष वाटली. तुझ्या स्वभावाचा तो भागच आहे. तुझी निरागसता! सहज भाव! मन खरोखर इतकं शुद्ध नितळ असू शकतं? हो, असू शकतं, असतं, हे तुझ्याकडे बघून जाणवतं अदू. म्हणून कालची बर्थडे पार्टी ही 'सूर निरागस हो. . .' अशीच होती. . . . अदू, गेल्या दोन वर्षभरामध्ये तुझ्यासोबत जीवन सार्थक करणारे असंख्य क्षण आले. एक एक दृश्य डोळ्यांपुढे जीवंत होतं.

खेलन आयो रे...ब्रजराज कुंवर...अबीर-गुलाल उडावत, गात-वसंतराव देशपांडे

लेखक महामाया यांनी रविवार, 18/09/2016 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
‘ख्याल गायन का प्रस्तुतीकरण’ या विषयावर इथे बिलासपुर ला वसंतराव देशपांडे यांचे शिष्य पं. प्रभाकरराव देशकरांनी कार्यशाळा घेतली होती...त्या निमित्ताने त्यांच्या भेटीचा योग आला...धागा एकच-वसंतराव देशपांडे...कार्यशाळे नंतर मी पंडित देशकरांना सविस्तर पत्र लिहिलं होतं...हेच ते पत्र- रा.रा. प्रभाकर रावांना माझा स.न. त्या दिवशी कार्यक्रमानंतर मी खरंच आनंदून गेलो होतो. एकाच दिवशी यमन, अल्हैया बिलावल, मुल्तानी, मधुवंती, शंकरा...ऐकायला मिळणं...सगळंच कसं कल्पनातीत होतं. काफी मधील टप्प्याच्या चार ओळी (हा टप्पा मी मालिनी राजुरकरांचा ऐकलाय, इथल्या कार्यक्रमांत त्यांनी म्हटला होता.

टाटा मोटर्स कस्टमर केअर...मराठी इल्ले

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 16/09/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव आहे त्यामुळे कंपनीचे नाव लिहिले आहे. मध्यंतरी माझी नॅनो मी ओफिसातुन घराकडे येताना संध्याकाळी रस्त्याच्या मधोमध बंद पडली. कशीबशी ढकलत कडेला लावली व रिक्षा करुन मग घरी आलो. रात्री टाटाच्या कस्टमर केअर ला फोन लावुन पुढे टोईंग बाबत विचारणा केली.पलिकडुन उत्तर आले कि थोड्या वेळात कॉल करु म्हणुन.एकुण तक्रार धसास लावण्याचा प्रकार कौतुकास्पद आहे. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण नंतर कस्टमर केअरमधुन फोन यायला चालु झाले. सुरवात कन्नड मधुन.

तीन दिवस दोन रात्री : भाग १

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 16/09/2016 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुभव खरा, नावे खोटी) त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्‍याच्या निर्‍यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्‍या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.

कावेलोसिम - स्वप्नातले गांव

लेखक गणामास्तर यांनी बुधवार, 14/09/2016 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
लांऽऽबलचक सुट्टी हि प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट असते. जर का ती नेमकी हवी त्या वेळी मिळाली तर होणारा आनंद काय वर्णावा, अर्थात हा आनंद फार कमी वेळा वाट्याला येतो म्हणा. सुट्टी घालवायची कशी हा सांप्रतला फार कठीण प्रश्न बनून राहिलेला आहे. 'सुट्टी घालवण्याची ठिकाणे' या बाबतीत प्रत्येकाच्या मनातील कल्पनांची जर का माहिती गोळा करायची ठरवली तर एक अत्यंत रोचक यादी तयार होईल यांत काही शंका नाही. पण खरा प्रश्न उभा राहतो तो इथेचं. प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन एखाद्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करणे हा एक अवघड प्रकार असतो. नवरा गोवा म्हणत असेल तर बायको हमखास राजस्थान वगैरे काही तरी म्हणत असते.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

लेखक मी कोण यांनी शनिवार, 10/09/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

एक स्पॅनिश टोपी

लेखक सुहास बांदल यांनी गुरुवार, 08/09/2016 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
ऑनलाईन बँकिंग आता आपल्या जीवनातील रोजचा भाग आहे. गेल्या एका दशकात आपण बरेच त्यात निपुण झालो आहोत. तरी आपल्याला वाटते कि आपल्याला सगळे माहित आहे आणि आपण एवढी काळजी घेतो कि आपल्याला कोण टोपी घालणार आहे. आमच्या आयुष्यात हा टोपी घालण्याचा प्रसंग ८ महिन्यांनपुर्वी घडुन आला आणि प्रस्थापित मुलतत्वाला सॉलिड धक्का लागला. जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही मित्र मंडळी बसुन या वर्षी च्या ट्रिप चे नियोजन करत बसलो होतो. अखेर बऱ्याच चर्चे अंती टेनेरीफ स्पेन वर एकमत झाले. मार्च च्या इस्टर हॉलीडेज मध्ये जायचे ठरले. लहान मुलांची पसंती पण कुठे तरी समुद्र किनारी जायची होती.

<< हिशेब-ठिशेब>>

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 02/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.

अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 01/09/2016 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव. ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील.