Skip to main content

अनुभव

शेम्बुड आख्यान

लेखक इल्यूमिनाटस यांनी सोमवार, 29/08/2016 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतला एक प्रसंग आठवला. आता या प्रसंगातून सात्विक बोध घ्यावा असे काही नाही आणि ही गोष्ट फार कौतुकाने सांगावी अशातला ही भाग नाही (नावावरून स्पष्ट च आहे!) तरी विरंगुळा म्हणून लिहितो आहे. वैधानिक इशारा- मन कणखर करा, कारण गोष्टीत बराच शेम्बुड आहे! शाळा सूरू होऊन दोन महिने झाले होते , तरी अजून नवीन युनिफॉर्म चा पत्ता नव्हता. मला या युनिफॉर्म चं भलतंच आकर्षण वाटायचं. युनिफॉर्म घातल्यावर सगळीच माणसं रुबाबदार दिसतात असं उगीचच मला वाटायचं, आणि ज्ञान प्रबोधीनी चा युनिफॉर्म तर काही औरच! गुलाबी कुर्ता, पांढरी विजार आणि डोक्यावर गांधी टोपी. हे कुर्ता वगैरे प्रकरण माझ्यासाठी जरा नवीनच होतं.

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/08/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.

आमचे समूहगान....(?)...

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 26/08/2016 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुलाला घेऊन शाळेत गेलो होतो. आज सुट्टी होती परंतु त्याची शाळेत समूहगीताची स्पर्धा होती . त्यांच्या शाळेची 10-12 मुले आलेली होती. अन स्पर्धा रामकृष्ण मठात होती. त्यांचा सर्वांचा व्यवस्थित गणवेश पाहून आणि तयारी पाहून मला माझ्या समूहगीताच्या स्पर्धेची आठवण आली. 1985-86 सालची गोष्ट असेल. त्यावेळी मी बहुधा 6 वीत होतो. आणि सांस्कृतिक स्पर्धेत तेव्हा मी नेहमी भाग घेत असे. कोणताही कार्यक्रम असो माझे गाणे अथवा भाषण ठरलेले असायचे. अश्याच एका तालुका लेव्हल स्पर्धेसाठी आमचा एक गट बनवला होता. माझ्यासारखेच वयक्तिक गाणी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरांनी गट बनविला होता. जोर्वेकर सर होते .

धाक... दहशत

लेखक मन यांनी गुरुवार, 25/08/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते. उरुस , जुलूसही मागे नसतातच. त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं. डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ; आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो. बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.

गुलजार!

लेखक रुपी यांनी शुक्रवार, 19/08/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे. खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा.

माझा सायकल प्रवास….

लेखक नपा यांनी गुरुवार, 18/08/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सेमिस्टर नंतर आपल्या गावी आपण सायकल वर जाऊया..!! का?...उगाच अभियांत्रिकीच्या तिसऱ्या सेमिस्टर ला हा किडा आम्हा मित्रांना चावला. अति उत्साहात बरेच जण तयार झाले. पण दर वेळी परीक्षा देऊन थकलेलो आम्ही, या ना त्या कारणाने आपापल्या गावी (अर्थातच केलेल्या संकल्पाला फाट्यावर मारून) विनासायास आणि विनासायकल पोहचायचो. अधून मधून तो किडा पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा, चावायचा आणि पुन्हा गायब व्हायचा. नंतर अचानक लक्षात आला कि आता हे तर शेवटचे वर्ष, मग मात्र मी पुन्हा एकदा सगळ्यांना विचारले कि कोण कोण तयार आहे सायकल सवारीला ला? फक्त एक मित्र तयार होता. सातव्या सेमिस्टर नंतर जायच ठरलं.

गणपतीचे दिवस !

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 15/08/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी नेहमीची धावपळ चालू असतांना घरात नवीनच आलेल्या बाप्पांनी हाक मारली "अरे कसली एवढी घाई … ?" "अरे तुझं बर आहे बाप्पा, तुला आता १० दिवस नुसती ऐश करायची आहे … मोदक, पेढे, मखर, आरास … आम्हाला काम आहे … बॉस आहे तिकडे … " मी पोराचे शाळेचे दप्तर भरता भरता उत्तरलो… "बर बर … मग आज आमचे छोटे उस्ताद … तुमचे चिरंजीव तरी … " बाप्पा काय विचारणार याचा अंदाज आल्याने मी वेळ न दवडता लगेच म्हणालो "छे आज त्याच्या शाळेत गणपती फेस्टिव्हल चे सेलिब्रेशन आहे.

राजाराम सीताराम........भाग १९......धूंद येथ मी स्वैर झोकीतो मद्याचे प्याले

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 11/08/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. .एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

प्रकाशाची चोरी (२)

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 05/08/2016 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : या लेखाच्या पहिल्या भागात आणि या दुसऱ्या भागात लिहिलेले प्रसंग म्हणजे काही अधिकृत निवेदन नसून जस्ट अनुभव म्हणून दिलेले आहेत. पहिल्या भागात या विषयाबाबत पुष्कळांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या. ग्राहक सुविधा विभाग माझ्याकडे असल्याने त्यांची मी यथाशक्ती उत्तरे दिली आहेत. तथापि अधिक तपशीलवार आणि अचूक माहितीसाठी www.mahadiscom.in हे संस्थळ पाहावे. मागच्या भागावर काही जणांनी ‘प्रकाशाची’ चोरी या शब्दाला हरकत घेतली होती, की चोरी करणारे प्रकाशासाठी करत नाहीत.