Skip to main content

अनुभव

पाचोळा -१

लेखक स्पा यांनी मंगळवार, 03/05/2016 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
देशमुखांसोबतची ती मुलाखत जरा विचित्रच झाली.आज मुलाखत आणी दुसर्या दिवशी पहाटे लगेच निघायचं इकडचे सगळे सोडून म्हणजे जरा विचित्रच, परत दोन वर्षाचा करार म्हणजे तोवर नोकरी सोडता येणार नाही.विचार करायलाही वेळ मिळाला नाही.देशमुखांनी हातात टिकिटाचे पॆसे टेकवले सुद्धा,माझा होकार समजून.

यथा शास्त्रप्रमाणेनं...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 02/05/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले.

सायकलीशी जडले नाते ३०: चाकण- माणगांव

लेखक मार्गी यांनी सोमवार, 02/05/2016 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 02/05/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री.

Confession Box : भाग २ ...शिक्षकांचा 'लाडका' विद्यार्थी बनलो

लेखक मार्मिक गोडसे यांनी रविवार, 01/05/2016 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ आज बाबा हट्टालाच पेटले होते. मला माहीत आहे तुला कशात करीअर करायचे आहे ते, परंतू स्पर्धा परिक्षेच्या निमित्ताने आपल्या प्रदेशाचा, समाजाचा व त्यांचा विकास करणार्‍या यंत्रनांचा तुझा अभ्यास होइल. आणि इथे शहरापेक्षा तुझ्या मामाच्या गावी तुला ह्या गोष्टी जवळून अभ्यासता येतील. बाबा मागे हटायला तयार नव्हते. मला स्पर्धा परिक्षांबद्दल ओ का ठो माहीती नव्हती आणि तीच्या वाटेला जायचेही नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून बाबांना म्हटले, दोन महिन्यांच्या सुटीनंतर माझे कॉलेज सुरू होइल तिकडे लावलेल्या क्लासची फी वाया जाईल.

माझी ज्यूरी ड्युटी ८

लेखक शेंडेनक्षत्र यांनी शनिवार, 30/04/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ अनेक तपशिलांनी भरलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या लांबलचक साक्षी झाल्यावर काही किरकोळ साक्षी झाल्या. त्यात त्या ट्रकशी संबन्धित काही माहिती मिळाली. तो किती उंच आहे, आत सीट किती आहेत, कितपत जागा आहे. उंच मनुष्य, बुटका मनुष्य कितपत सहजपणे वावरू शकतो हे एका वाहन तज्ञाने सांगितले. फार काही नवे कळले नाही. आता दुसरी महत्त्वाची साक्ष म्हणजे त्या आरोपीची. त्याची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. आरोपी साक्षीदाराच्या पिंजर्यात आला. तो व्यवस्थित इंग्रजी बोलत होता. ३० वर्षापूर्वी तो आर्जेन्टिना देशातून अमेरिकेत आला होता.

सायकलीशी जडले नाते २९: नवीन मोहिमेच्या प्रॅक्टिस राईडस

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 29/04/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

वाबळेवाडीची शाळा - विलक्षण प्रेरणादायी अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 29/04/2016 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.h… ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं.