बोट - अग्निशमन (Fire Fighting)
असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.
भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization) खूप असतं. असायला हवं देखील.
मिसळपाव
माझा हा दुसरा सेनहायजर हेडफोन आहे,पहिला एचडी २०२ अनुभवला होता. हा अनुभवच मला इतका भावला की मी सी.एक्स ३.० घेण्याचा निर्णय घेतला.हे तर मूळ कारण झाले... अजुन इतर कारणही होती,जसे आधीचे स्कलकँन्डीचे हेडफोन्स बराच काळ वापरले आणि आता ते कधी बाद होतील याची काही टोटल लावता येणार नाही. ;)
एचडी २०२ अनुभव घेउन मला माझ्या कानाची सवय बदलणे काय ते कळले... आधी ऐकलेल गाणं पुन्हा वेगळं का भासतं ? मग आधी ऐकलेली गाणी परतं ऐकुन पाहिली.