Skip to main content

आस्वाद

बाप आणि मुलगी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 13/04/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहायला मिळालेली एक सुरेख अ‍ॅनिमेशन फिल्म : बाप आणि मुलगी! ह्या लघुपटात तशी दोनच पात्रे आहेत, पण आजूबाजूचे माणसांचे संदर्भही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रीतीने येत राहतात. बाप आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं, त्यांच्यातील भावस्पंदांचं इथे पहावयास मिळणारं चित्रण कालातीत, अप्रतिम!

"रेड सन"

लेखक श्रावण मोडक यांनी सोमवार, 12/04/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीचा प्रसंग. मुंबईला गेलो होतो. मस्त कलंदरकडं जायचं होतं. निखिल देशपांडेही आला होता. मकीच्या घरात प्रवेश केला, अन् उजव्या हाताच्या ड्रेसिंग टेबलवर लालभडक रंगाच्या पुस्तकानं लक्ष वेधून घेतलं: "रेड सन - ट्रॅव्हल्स इन नक्षलाईट कंट्री"! मला एकदम काही दिवसांपूर्वी निखिलशी या पुस्तकाविषयी झालेलं बोलणं आठवलं. पुढं फारसं काही घडणार नव्हतंच. परतीच्यावेळी माझ्यासोबत ते पुस्तक होतं. :) *** नक्षलवाद. रेड कॉरिडॉर. माओवादी. चीन-नेपाळ. आदिवासी. विकास. दुर्गम प्रदेश. सलवा जुडूम. रोजची मृत्यूशी लढाई. क्रौर्य.

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

मोनालिसाच्या बहिणी ?????

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 10/04/2010 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे अगदी लहानपणापासून संगीताचे बरे-वाईट संस्कार कळत नकळत घडत जात असले, तरी तसे चित्रकलेच्या बाबतीत मात्र होत नाही...... जगातल्या थोर चित्रकारांनी रंगवलेली काही चित्रे निदान डोळ्यांखालून जावीत, हा या धाग्याचा हेतु..... मोनालिसाच्या या बहिणी.....

आम्रपाली

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/04/2010 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी! आम्रपालीचा जन्म कोठे झाला, तिचे माता-पिता कोण हे कायम गूढच राहिले. वैशाली नगरीच्या राजप्रासादात ती एका आम्रतरूपाशी ठेवलेली सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली! इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली.

शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 07/04/2010 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव आजकाल शाळांत मुलांना वेगवेगळे प्रकल्प करून आणायला सांगतात. लहान मुले हा प्रकल्प पुर्ण करूच शकत नाहीत. मग पालकांना हातातले काम सोडून ते प्रकल्प पुर्ण करावे लागतात. उदा. अंध लोकांसाठी पैसे जमा करणे, खरी कमाई, एखादा सायन्स- विज्ञान प्रदर्शन मधला प्रकल्प, क्राफ्ट, पुठ्याचे घर बनवणे, चित्र काढणे आदी. लहान मुलांना असली न जमणारी कामे ते का देतात ते समजत नाही. शाळेतच चुकीचे का होईना त्या मुलांनच ते प्रकल्प बनवू दिले तर ते जास्त फायदेशीर राहिल.

आयडीज .. आणि त्यांच्या कार्स :)

लेखक टारझन यांनी रविवार, 04/04/2010 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम्स लोक्स , उन्हाळ्यातली दुपारची वेळ म्हणजे अंमळ सुस्तावणारी असते , पण आता दुपारीच उठलो असल्यानं पुन्हा सुस्तीही येत नाही. फार दिवसांपासुन एक विचार मनात घोळत होता.. तसे आम्ही सुपर कार्स आणि सुपर बाईक्स चे दिवाने .. आपल्या मिपाकरांच्या क्यारॅक्टर ला सुट होणारी कार कोणती असेल ? असा विचार चाटुन गेला आणि मग हे ... तुर्त तरी फक्त निवडक क्यारॅक्टर्स चा विचार केल्या गेला आहे पिवळा डांबिस : यांची कार असेल "लेक्सस आरेक्स३५० ". लेक्सस चं नावंच पुरेसं आहे. एखाद्या गर्भश्रीमंताचंच काम ! एकदम स्टायलिश , आरामदायक आणि सुंदर इंटेरियर.

युध्दाचा कलाविष्कार

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 02/04/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
ना़डीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से क्रमांक ३ भाग - १ --
किस्सा ३१ मार्चचा - दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद .
एका शंकराच्या मंदिरात उद्या जाऊन दोन दीप लावावेत. त्यानंतर अपेक्षित व्यक्ती वाटेत भेटतील.
गोपुराची वेस ओलांडताना एकदम लक्षात आले.