Skip to main content

आस्वाद

रव्याचे थालिपिठ...

लेखक प्राजु यांनी सोमवार, 11/02/2008 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
रव्याचे थालिपिठ... वेळ : ३० मिनिटे वाढणी : २-३ जण साहित्य : १. रवा - १ कप २. तांदूळ पिठी - २ कप ३. बारिक चिरलेला कांदा - १/२ वाटी ४. कोथिंबिर चिरलेली - मूठभर ५. हिरव्या मिरच्या एकदम बारिक चिरलेल्या - ३-४ ६. मीठ, धने-जीरे पावडर. ७. दहि ( आंबट गोड कसलेही) - १ ते १ १/२ वाटी कृती : १. प्रथम कांदा, कोथिंबीर, आणि मिरच्या एका बाऊलमध्ये घेऊन त्याला थोडे मीठ हाताने मळल्यासारखे लावून ३-४ मिनिटे ठेवावे. २. तांदूळपिठी, रवा आणि धने जिरे पावडर एकत्र करून घ्यावे. ३. या मिश्रणात आता मिठ लावून ठेवलेले कांदा-मिरच्या घालावे, पुन्हा चांगले मळावे. ४. आता यात थोडे थोडे दहि घालून मळून घ्यावे.

संडे स्पेशल ( व्हेज लसाने)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 10/02/2008 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक इटालियन पदार्थ (पास्ता प्रकारात मोडणारा) आहे. साहित्यः लसाने :८ रेडीमेड लसाने शीट्स.( ३ इंच बाय ६ इंच) पालकः२० पाने देठ काढून ब्लांच करणे नंतर पाणी काढून टाकणे. चीजः ५० ग्रॅम चेडर चीज (ब्रिटानिया) ५० ग्रॅम मोझारीला (अमुल) टोमॅटो सॉसः ३टे.स्पून तेल (किंवा ऑलिव्ह ऑइल) १ ढोबळी मिरची बारीक चिरलेली १/२ किलो टोमॅटो (ब्लांच करुन , साल काढून बारीक चिरलेले) १/२ टी.स्पून ओरेगानो (वाळलेले चालेल) १/२ टी.स्पून काळी मिरी पावडर ( ताजी) २टे.स्पून टोमॅटो प्युरी १ टी.स्पून साखर १/४ कप कोथिंबीर (किंवा बासिल) मीठ चवीनुसार व्हाईटसॉसः ३ टे.स्पून बटर ३ टे.स्पून मैदा २चिमूट जायफळ पूड (नसले तरी च

आम्ही कोण?

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 10/02/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, "आम्ही कोण?" या प्रश्नावर केशवसुत, केशवकुमारांपासून ते केशवसुमारांपर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील.
Taxonomy upgrade extras

"जनरल मोटर्स" विरूध्द " मायक्रोसॉफ्ट "

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 09/02/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुढे ढकललेल्या "विरोपातून " आलेला एक मस्त 'मेल' देत आहे. मुळात तो "इंग्लिश" मध्ये आहे पण त्यातील "तांत्रिक बाबींना पर्यायी मराठी शब्द" मला माहीत नसल्याने मुळ ऊतारा आहे तसा इंग्रजी मधून देत आहे.... At a recent computer expo (COMDEX), Bill Gates reportedly compared the computer industry with the auto industry and stated, "If GM had kept up with technology like the computer industry has, we would all be driving $25.00 cars that got 1,000 miles to the gallon." In response to Bill's comments, General Motors issued a press release Stat

फासले ऐसेभी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 07/02/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गझल फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था ..... सामने बैठा था मेरे.....और वो मेरा ना था!!!!!! वो की खुश्बू की तरह.....फैला था मेरे चार सू...... मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था..... रात भर उस ही की आहट कान में आती रही...... ....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था...... अक्स तो मौजूद थे पर .....

व्हॅलेंटाईन्स डे....

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/02/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो. या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा.. कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का? एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत. ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.

फस्क्लास भेळ !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शनिवार, 02/02/2008 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते. अनामिका भेळ, नारायण पेठ सुद्धा मस्त असते..

झांज..

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 01/02/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras