लेखकबेसनलाडूयांनी बुधवार, 10/03/2010 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================
२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय.
लेखकप्रसादयांनी मंगळवार, 09/03/2010 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत.
तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती!
[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...
लेखकरामदासयांनी मंगळवार, 09/03/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी संध्याकाळी मी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी म्हणून टॅक्सीच्या शोधात होतो तेव्हा स्ट्रँड बुकस्टॉल च्या जवळ माझा वरळीचा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र मला भेटला.
"काय कुठे ?" त्यानी मला विचारलं.
"काही नाही आपलं एक चर्चासत्र आहे दादरला .जरा जाऊन येतो." मी हळूच उत्तर दिलं. तसा मी प्रसिध्दीचा झगमगाट टाळतोच म्हणा.
पण हा म्हणजे प्रसिध्दीवाला मित्र .तो म्हणाला "म्हणजे ते गांगलांच्या साईटच्या उदघाटनाला जातोयेस म्हण की."
मी मान डोलावली.
"मग घाई काय आहे .जरा स्वागतमध्ये इडली खाऊ. मग जा दादरला.मी माझ्या गाडीतून सोडतो."त्याने प्रस्ताव मांडला .
माझ्या मनात दोन विचार आले.
लेखकप्रकाश घाटपांडेयांनी सोमवार, 08/03/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशिक्षण ही गुरुकिकिल्ली
सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा
हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा?
लेखकचेतनयांनी सोमवार, 08/03/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;)
असो...
इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:
१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.
लेखकरामदासयांनी शुक्रवार, 26/02/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकर,
येत्या पाच मार्च रोजी http://thinkmaharashtra.in/ या संस्थळाचे उदघाटन आहे.
मी आणि तात्या याप्रसंगी होणार्या चर्चेत सहभागी होणार आहोत.
मला मिळालेले हे आमंत्रण मी तुमच्या समोर ठेवत आहे.
सध्या हे संस्थळ प्रायोगीक तत्वावर सुरु झाले आहे.
समस्त मिपाकर आणि मराठी अनुदिनीकारांना एक नम्र विनंती.
आपल्या आणि आपल्याला माहीती असलेल्या मराठी ब्लॉगर्सची माहीती कृपया द्यावी.(म्हणजे मला गृहपाठ करून जाता येईल.)
आमंत्रणाची प्रत देत आहे.
धन्यवाद.
************************************************************************
मा.