Skip to main content

बातमी

सरहद्दीपलीकडून झालेलं कौतुक!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 09/11/2009 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉन' या कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकात आज खाली दिलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे. मजकूर वाचल्यावर असे वाटते कीं पाकिस्तानी सरकार कसेही असो पण पाकिस्तानी जनतेला नीर-क्षीर-विवेक सुचू लागलेला दिसतोय! ही खरंच एक निरोगी परिस्थितीकडे नेणारी घटना आहे व आपण तिचे स्वागत केले पाहिजे. पत्र लिहिणार्‍याने जरी दोनदा भारताचा उल्लेख केला असला तरी जास्त करून माहिती चीनचीच दिली आहे. कदाचित पाकिस्तानी वृत्तपत्रांत भारताची माहिती दिली जात नसावी.

अबू आजमी ची मनसेच्या आमदारांना धक्काबुक्की; मनसेचे बाणेदार प्रत्यूत्तर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/11/2009 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
अबू आजमी ची मनसेच्या आमदारांना धक्काबुक्की; मनसेचे बाणेदार प्रत्यूत्तर आंतरजाल प्रतिनिघी: (ता. ०९ डिसेंबर २००९) आज महाराष्ट्र विधानसभेत नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी चालू होता. अबू आजमी शपथ घेण्यासाठी व्यासपिठावर चढला. त्याने मनसेच्या आमदारांकडे वाकड्यानजरेने पाहत शपथ घेणे चालू केल्यानंतर मनसेचे आमदार शिषीर शिंदे यांनी त्यास मराठीतच शपथ घेण्याचे आवाहन करणारे पत्रक दर्शविले असतांना त्याने त्या पत्रकाकडे पाहत हातवारे दाखवले. संतापाच्या भरात खडकवासल्याचे आमदार वांजळे यांनी शपथ ही मराठीतच घेण्याचे आवाहन करण्यासाठी व्यासपिठाकडे गेले असता अबू समर्थक आमदारांनी त्यांना शिवीगाळ केली.

जय महाराष्ट्र !! जय मराठी !!! अबुला धोपटला.. मनसे जिंदाबाद

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 09/11/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत हिंदीत शपथ घेतली. हिंदीतून अबू आझमी शपथ घेत असताना मनसेच्या आमदार रमेश वांजळे यांनी त्यांच्यासमोरील माईक बाजूला केला. त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी अबू आझमींच्या कानातही वाजवली त्यांनंतर लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली. हिंदीतून शपथ घ्यायला मनसेचा विरोध होता. मात्र अबू आझमींनी हिंदीतून शपथ घ्य़ायचा हट्ट कायम ठेवल्याने त्यांना मनसेच्या आमदारांचा लाथा बुक्क्यांचा प्रसाद खावा लागला. (स्टार माझा वरुन साभार)

लेखन स्पर्धा २००९

लेखक मोहन यांनी सोमवार, 09/11/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर लेखकांकरता माहिती, पु.ल. देशपांडे जयंती निमित्ताने, puladeshpande.net या संस्थळाने लेखन स्पर्धा २००९ आयोजित केली आहे. महाविद्यालयीन व खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा आहे. ३० नोव्हें. अंतिम तारीख आहे. या बद्द्लची अधिक माहिती इथे पाहू शकाल. स्पर्धेत भाग घेणारे इच्छुक लेखकांना शुभेच्छा. आपला मोहन.

भागवत यांचे निधन - (बातमी - पुणे सकाळ ८ जून १९६९)

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 27/10/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्मही झाला नव्हता. परंतु, मला ही बातमी मिळाली. ती खाली दिली आहे. यांच्याबद्दल आणखीही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. तरी स्वच्छ नजरेने याकडे पहावे. आपला दृष्टीकोन कळवावा. संदर्भ : रविवार सकाळ, ८ जून १९६९ वर्ष :३० वे (मुखपृष्ठ) बातमी मथळा - शंकर रामचंद्र भागवत वयाचे ८७व्या वर्षी निधन पुणे, ता-७ - पूर्वीच्या पुणे नगरपालिकेचे माजी चीफ ऑफिसर श्री. एस. आर. उर्फ अप्पासाहेब भागवत आज सायंकाळी सात वाजता पेरू गेटाजवळील त्यांच्या राहते घरी वार्धक्यामुळे वयाच्या ८७व्या वर्षी निधन पावले. ...... असा आदर्श अधिकारी झाला नाही कै.

लघुसंदेशातील संकेताक्षरे

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 28/09/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्‍या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्‍याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्‍याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या आदेशानुसार सर्व कंपन्यांना असे करणे बंधनकारक असेल. पण त्या अक्षरांचे अर्थ कळत नव्हते. मला आलेल्या संदेशांमध्ये मुख्य:त्वे TM, TA असे लिहिलेले असायचे. त्याचा मी लावलेला अर्थ TM=Telemarketing आणि TA=Transaction Alert असा होता. :D लवकरच, नंतर आलेल्या विविध संदेशांमधून, कळले की मी काढलेले अर्थ चुकीचे आहेत.

उत्तेजनार्थ!..

लेखक नीधप यांनी रविवार, 27/09/2009 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं. मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं. दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी.

आजचा दिवस... सलाम एका शहिदाला !

लेखक दशानन यांनी रविवार, 27/09/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस ! ह्या वीराला शत शत नमन ! * सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य ! ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!

इस्रोचे अभिनंदन

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 24/09/2009 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
इस्रोचे अभिनंदन काल ओशनसॅट-२ या दूरसंवेदन उपग्रहासह एकूण सात उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पाठविलल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) अभिनंदन. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण झाले. ओशनसॅट-२ उपग्रहाबरोबरच जर्मनीचे चार छोटे उपग्रह, तुर्कीचा एक व स्वित्र्झलडचा एक असे एकूण सहा उपग्रह अवकाशात एकाचवेळी सोडले गेले. एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाचवेळी दहा उपग्रह एकाचवेळी सोडून एक जागतिक विक्रम केलेला आहे. इस्रोचे पुन्हा एकादा अभिनंदन! (सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे. )

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/09/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...) प्रिय ताई, माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे.