आगरी भयकथा
भाल्या त्याचेच तंद्रीन् बिरी वरत बांधावरशी घरा चालला होता. येलेची न् आजुबाजूला काय चाल्ललाय याची त्याला अजाबात जानीव पुन व्हत नव्हती. तवर्यान मंगारशी आवाज आयला... "ये भाल्या! थांब तखरच... मी पुन यतय". मंग ते दोघ पुन सोबतीनुच चालाला लागल...
"बिरी दे र" भाल्याचे बरब व्हता तो बोलला...
भाल्यान मंग त्याला बिरी दिली...
बरबचा "च्याला... ३० नबंर!!!... मी पुन यीच रोजचे ईच वरत..."
आखरून तख्रूनच्या बाता मारत दोघा चालत व्हत...
तवर्यान..."बिरी दे र" बरबचा परत बोलला...
ती पुन संपली... मंग परत त्यान बिरी मांगली... भाल्या आजून पयलीच बिरी वरत होता... त्याला बिरी दिली न भाल्या जरासा टरकलाच...
मिसळपाव