Skip to main content

भाषांतर

कारगिलचे युद्ध कुणाचे? आपल्या प्यार्‍या भारताचे कीं त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाचे?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 21/09/2010 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जुलै २०१० हा कारगिलच्या युद्धातील विजयाचा ११वा गौरवदिन. गेल्या वर्षी या विजयाचा दहावा गौरवदिन होता. त्यात आपल्या सध्याच्या सत्ताधारी नेत्यांच्या वागणुकीबद्दल खालील लेख माझ्या वाचनात आला. लेखक आहेत 'हिंदुस्तान टाइम्स'चे श्री नीलेश मिश्रा. त्यांची जन्मपत्री मला माहीत नाहीं, म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते झुकतात, कुठल्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे वगैरे. इथे लिहिले आहे ते खरे आहे कीं नाहीं याचीही मला कल्पना नाहीं. पण 'हिंदुस्तान टाइम्स'सारखे जबाबदार वृत्तपत्र खोडसाळ वृत्ते छापेल असे वाटत नाहीं.