Skip to main content

भाषांतर

अनुवाद मदत हवी आहे.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 25/09/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लोकायत.कॉम हे मराठीतून संगणक तंत्रज्ञान विषयक लेखन करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहीने चाललेले आहे. यापैकी एक लेखमाला आहे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल. मुख्यतः लिनक्स विषयी मराठीतून तपशीलवार माहिती देण्याचा विचार आहे. हे करतांना एक अडचण जाणवली , ती म्हणजे या मुक्तस्रोत चळवळीचं सार सांगणार्‍या यांच्या परवाण्याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही आहे. मी लिनक्स कसं वापरावं याबद्दल लिहू शकतो मात्र या कायदेशीर परवाण्याचं मराठी भाषांतर करणं मला कठीण आहे.

मराठीतील अजरामर गीतांचा इतर भाषिकांनाही आस्वाद घेता यावा म्हणून हा प्रयत्न...

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 16/09/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे - यशवंत देव यांच्या गीताचे स्वैर रुपांतर - बहुगुणी, ऑगस्ट ८, २००८ शक्य झाल्यास चालीतही गाता यावं असा प्रयत्न आहे. ------------------- इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं दिल सौ बार लुटाएं इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं चंचल झोंके, जलकी धारा, भीगी काली मिट्टी जैसे प्राण हो हरे भरे, निकल पडी तृणपत्ती फूल शर्मिले देखके किसकी, होठोंकी याद आए इस जीवनपर, इस जीनेपर, दिल सौ बार लुटाएं रंगोंका फैलाकर पंखा, सांझ ये किसने बना ली रैनाके दरवाजेपर जैसी, तारोंकी रंगोली छे ऋतुओंकी हो छे मेहेफ़िलें, यहींपर दर्द हटाएं इस जीवनपर, इस जीनेपर, दिल स
Taxonomy upgrade extras

कुणी बेभान म्हणतं मला...

लेखक फटू यांनी सोमवार, 15/09/2008 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही भुंगा जर
Taxonomy upgrade extras

एक अमेरिकन प्रेमकथा

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 14/09/2008 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक अमेरिकन प्रेमकथा ऒर्कुटवर काही असे काही लोक असतात की जे स्वत:चे पूर्ण नाव, सविस्तर व खरा पत्ता, तसेच खरा दूरध्वनी क्रमांक देखील प्रोफ़ाईलवर लिहून ठेवतात. इतकेच काय जोडीला त्यांची खरे छायाचित्रे देखील हजर असतात. तर इतर काही प्रकारचे लोक खरा दूरध्वनी क्रमांक व पत्ता तर सोडाच आपले खरे नाव ही लिहीत नाहीत. तर स्वत:ची छायाचित्रे म्हणून विदेशी बालकांची छायाचित्रे लावून ठेवतात. (कृपया इथे कुणालातरी व्यक्तिश: दुखविण्याचा उद्देश असल्याचा गैरसमज करुन घेऊ नये.) पुन्हा त्यात आश्चर्य म्हणजे अशा भिन्न प्रकारच्या लोकांमध्ये मैत्री देखील होते. हे पाहून मला पूर्वी वाचलेली एक अमेरिकन प्रेमकथा आठवली.

तुला खात्री आहे?

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 09/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
भोवती बघ.. थोडं तु खाली बघ इथे दिसणारे चेहरे बघ... तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं? हे तुझ्या भोवतीचे मित्र... पण हे आहेत का "खरे" मित्र? ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम? तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस भोवती बघ.. अगदी नीट बघ फक्त दोघे..तु आणि मी तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि... हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात भोवती बघ.. अगदी नीट बघ सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ तुला खात्री आहे?

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

लेखक चिन्या१९८५ यांनी बुधवार, 06/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते.

अशी गुमसुम आवडतेस मला

लेखक धनंजय यांनी रविवार, 06/07/2008 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
अशी गुमसुम आवडतेस मला *** अशी गुमसुम आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे खूप दुरून ऐकतेयस - माझा ... आवाज तुला नाही शिवत. वाटते तुझी दृष्टी तुला ... सोडून गेलीये दूर उडून एक चुंबन जणू तुझे ... ओठ असावे घट्ट शिवत. * सगळ्याच गोष्टी आहेत जशा ... माझ्या आत्म्याने भरलेल्या माझ्या आत्म्याने भरलेली ...
Taxonomy upgrade extras

पाब्लो नेरूदा - I do not love you... अनुवाद

लेखक मनिष यांनी मंगळवार, 01/07/2008 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाब्लो नेरूदा’ हे नोबेल पारीतोषक विजेते कवी. विसाव्या शतकातील (१९०४ - १९७३) एक अतिशय प्रभावशाली आणि श्रेष्ठ कवी. त्यांच्या कविता बर्‍याचदा अतिशय गुढ (surrealist?), इंटेन्स अशा आहेत. त्या मुळ स्पॅनिश भाषेत लिहिल्या असून त्यांचे इंग्लिश अनुवाद सहजपणे उपलब्ध आहेत. माझा हा मराठी अनुवादही अशाच एका इंग्लिश अनुवादावरुन घेतला आहे, त्या अर्थाने तो double-indirection असा आहे; तो कितपत जमला आहे, ते अवश्य सांगा...मला त्यातली वाक्यरचना फार गुंतागुंतीची झाली आहे असे वाटते, पण ती सहज, सोपी अशी नाही रुपांतरीत करता येत आहे!