Skip to main content

लेख

शतशब्द कथा - सुट्टी

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/07/2015 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?” “बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही. कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ! काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा. इरावतीने भराभरा पालकांना फोन केले. “आय एम सॉरी, पण उद्यापासून आठ दिवस मुलांना शाळेत पाठवू नका प्लीज. एका मुलाला चिकुन गुन्या झालेला आहे.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

लिव बामणां लिव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/07/2015 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मावसभावाच्या, कोकणात,आंब्यांच्या बागा आहेत.देवगडहून हापूस आंब्यांची कलमं आणून त्याने आपल्या बागेत रुजवली होती.आता त्या झाडांना भरपूर आंबे लागतात.जर मी कोकणात त्या मोसमात गेलो नाही तर तो मला एक आंब्याची पेटी मुंबईला पाठवून देतो. ह्या देवगड आंब्यांची खासियत आहे.मध्यम आकाराच्या ह्या आंब्याला तो चांगला पिकला आणि खाण्यालायक झाला हे त्याच्या सालीला सुरकत्या आल्या की समजावं.वास तर भरपूर येतो.हा आंबा छोट्या चाकूने कापायला मजा येते.सालीच्या आतमधे सगळाच गर असतो.आतला बाठा एकदम लहान असतो.एक शीर कापून गर तोंडात टाकल्यावर त्याची चव एव्हडी मधूर असते की,ठेवणीतला मध चमच्याने बाटलीतून काढून जीभेवर सोडल्

कांदे-पोहे.

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 13/07/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील कुठ्ल्याही शहरातील उपहार गृहात गेला, तर महाराष्ट्रीयन कोणताही पदार्थ कमी प्रमाणात मिळेल.त्या मानाने उत्तरे कडून आलेले सामोसे,छोले भटोरे,कचोरी किंव्हा दक्षिणे कडील इडली,डोसा,उताप्पा वगैरे हे पदार्थ सहज उपलब्ध होतील. थोडक्यात आटके पार झेंडा लावलेल्या, महाराष्ट्रातील पराक्रमी पुरुषांची अनेक किस्से, आपणाला नावा सहित सांगता येतील, मात्र महाराष्ट्राचे इतर वेळी खाण्याचे स्पेशल पदार्थ म्हणावे तितके सांगता येणार नाहीत कींव्हा सहज उपलब्ध होणार नाहित.इतर वेळी खाण्यासाठी आसणारे महाराष्ट्रीयन पदार्थ फ़ारच कमी आहेत क़िव्हा काळाच्या ओघात ते आपण सोडून दिले असणार .

आठवणीतला श्रावण

लेखक सह्यमित्र यांनी रविवार, 12/07/2015 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण! मराठी सारस्वतात आजवर अनेकांनी हाताळलेला विषय. श्रावण आहेही तसाच. ह्या विषयावर आधीच एवढी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती झालेली असताना, मला त्यात भर घालण्याचे कारण नाही. पण तरीही काळाच्या ओघात हा आठवणीतला श्रावण निसटून जाऊ नये म्हणून हा प्रयत्न. श्रावण म्हणजे रिमझिमणारा पाऊस, ऊन-पावसाचा खेळ. एकूणच श्रावण म्हणजे पावसाच लोभसवाणे रूप. तसं बघायला गेलं तर पाऊस मला आवडतोही आणि नाहीही. पावसाचं आणि माझं जन्मापासूनचे नातं आहे. म्हणजे माझा जन्म ७ जूनचा असल्याने पावसाचं आणि माझं आगमन अगदी हातात हात घालून झालेलं आहे. माझ्या जन्माच्या दिवशी पुण्यात गारांचा पाऊस झाला होता म्हणे.

क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 10/07/2015 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटच्या खेळाच अविभाज्य भाग म्हणजे स्लेजिंग! एकाग्रपणे खेळत असलेल्या बॅट्समनचं चित्तं विचलीत करण्यासाठी आणि एकग्रता भंग पावून आणि एखादा भलताच चुकीचा शॉट मारून तो बाद व्हावा म्हणून अनेकदा शेरेबाजी केली जाते. बहुतेक वेळा ही शेरेबाजी वैयक्तीक असते आणि एकमेकांचं गुणवर्णन करणार्‍या - विशेषतः 'फ'काराने सुरु होणार्‍या - खास शब्दांनी सजलेली असते हे वेगळे सांगणे न लगे! स्लेजिंगची ही कला रुजवली आणि मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरवात केली ती ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन चॅपल आणि त्याच्या सहकार्‍यांनी!

बॉडीलाईन - ५ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 09/07/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडीलाईन - , , , फास्ट लेग थिअरीचा परिणामकारक वापर करुन इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका जिंकली होती! या डावपेचाचं मुख्य टार्गेट असलेल्या डॉन ब्रॅडमनने ३९६ रन्स काढल्या असल्या तरी मेलबर्न व्यतिरिक्त एकाही टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळपासही जाता आलं नव्हतं.

रघु देसाई

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 08/07/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष होता. रघु देसाई काही महिन्यापूर्वीच जुनी कंपनी सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला होता. त्याने त्या कंपनीमध्ये खूप मजा केली होती. तिथलं वातावरण त्याला आवडत होतं, त्या कंपनीकडून तो ऑनसाईटपण जाऊन आलेला होता. त्याला आमच्या कंपनीमधलं वातावरण फारसं पसंत पडलं नव्हतं. त्याच्या मते आधीचीच कंपनी छान होती. "वहापे बहोत ऐश करते थे रे... अपने बाप कि जान्गीर थी जैसे, यहापे साला दिन रात मराओ, फिर भी काम खतमहि नही होता.