Skip to main content

लेख

स्वीकार

लेखक शिरीष फडके यांनी शनिवार, 15/11/2014 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्वीकार तसं ४०-५० उंबरठ्यांचं गाव. फार मोठंही नाही आणि नावाजलेलंही नाही. आज गावासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या गावातील एक मुलगा शहरात जाऊन रितसर शिक्षण घेऊन गावात परत येणार आहे. गावातील तो पहिलाच मुलगा आहे जो शहरात एवढं शिक्षण घेऊन गावात परतणार आहे आणि त्यामुळे गावाला त्या मुलाचं फार कौतुक वाटतंय. गावातील वृद्ध व्यक्तिंना बर्याच वर्षांपूर्वीची गावभर दुडूदुडू धावणारी त्या मुलाची लहान पावलं आठवत आहेत. आईवडिलांना आणि भावा-बहिणींना तर आज अभिमान वाटावा असं काही घडणार आहे. ज्याची गाव उत्सुकतेने वाट पाहत होतं त्या मुलाचं गावात आगमन होतं. पण आता तो लहान राहिला नसून तरुण झालाय. कोण आनंद होतो गावाला.

एक अडनिड गावाची गोष्ट... १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 14/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण... दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं!

मातृत्व

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 14/11/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मातृत्व मातृत्वाचा एवढा उदो उदो करू नये ज्यामुळे एक दिवस मातृत्वच मातृत्वाला मारक ठरेल. अनेकदा हे वाक्य अनेक लेखकांच्या लिखाणातून किंवा कवींच्या काव्यसंग्रहातून आपल्यासमोर येतं. परंतु आजही या २१व्या शतकात या वाक्याचं गांभीर्य समाजाने लक्षात घेतलं आहे असं आढळून येत नाही. मातृत्व म्हणजे केवळ आई होणं का? आई होणं आणि मूल होणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मातृत्वाचं आणि पितृत्वाचं समाजातील स्थान, महत्त्व समान आहे का? मातृत्व म्हणजे नक्की काय? मातृत्वाचा उदो उदो म्हणजे नेमकं काय? मातृत्वाबद्दलचे समज आणि गैरसमज कोणते?

एकटेपणा

लेखक शिरीष फडके यांनी गुरुवार, 13/11/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकटेपणा आपल्या आयुष्यात, आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. काही संस्कार, परंपरा यातून काही अंगवळणी पडलेल्या असतात. अशाच गोष्टी, प्रसंग यांचा अन्वयार्थ शोधणारं हे नवं सदर… आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा… एक चित्रकार. तसा तो या कलेच्या क्षेत्रात नवीनच. फारसं नाव नसलेला किंवा या क्षेत्रापुरतं म्हणायचंच झालं तर अनोळखी. या चित्रकाराचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न म्हणजे त्याला आवडणार्या एका सुंदर व्यक्तिचं रूपचित्र (Portrait) काढणं. अर्थात त्याकाळी ती व्यक्ती प्रसिद्धीच्या उंच शिखरावर विराजमान असल्यामुळे आपलं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होईल की नाही याबद्दल त्याला स्वतःलाच थोडी शंका होती.

पाठलाग..

लेखक बोबो यांनी बुधवार, 12/11/2014 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग.. ***************************************************** बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघेही शांत,चिडीचूप. पण मग मलाच राहवेना. विचारू की नको असा विचार मी करत होतो. कारण निर्णय मनाविरुद्ध गेला तर मी ते कसं पचवणार याची भीती वाटत होती. या आधीचा माझा एक अनुभव अतिशय वाईट होता. त्या अनुभवानंतर आलेल्या डिप्रेशनमधून मोठ्या मुश्किलीने मी स्वतःला सावरलं होतं. आणि आता पुन्हा एकदा विषाची परीक्षा घ्यायची वेळ आली होती. मनाशी देवाचा धावा केला. म्हटलं,"देवा महाराजा, या वेळेस सुद्धा जर निर्णय माझ्या मनासारखा लागला नाही तर ते सहन करण्याची शक्ती मला दे.

घालीन लोटांगण

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 12/11/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीनं चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे).

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 10/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

चिनू ची गोष्ट !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 07/11/2014 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
चिनू ची गोष्ट !! मे महिन्याचे दिवस होते.यंदाची मे ची सुट्टी काकांच्या गावाला साताऱ्याला घालवायची असे समस्त बच्चे कंपनी चे ठरले होते. मला ते साताऱ्याचे घर फार काही आवडायचे नाही. तसा वाडा मोठा होता, पण जुनाट वाटायचा. रात्रीच्या वेळी तर भयंकर शांततेचा आणि भकास वाटायचा. कधी मुक्काम केलाच तर कधी एकदा उजाड़ते आणि सगळे उठतात ....अस होऊन जायचं मला. आईला मी म्हणायचेही नेहमी... की मला नाही आवडत इथे.... पण काय ...आई काहीतरी सांगुन विषय टाळायची.....उगीच काका काकूंना काय वाटेल असे त्यांनी ऐकले तर...... काकांची आर्थिक परिस्थिति तशी बेताचीच.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 05/11/2014 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन डी रॉकफेलर आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. त्याची एकूण संपत्ती १५० मिलिअन डॉलर्स (२२५ बिलिअन डॉलर्स आज) होती. स्टँडर्ड ऑईल ९८% रॉकेल ची एकटी मालक होती. परंतु जगातील सर्व मोठ्या भांडवलदारांना स्पर्धक हे असतातच. आणि भविष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धकाला रॉकफेलरने स्वतःच जन्माला घातले होते. अँड्र्यू कार्नेगी! ज्याचा हात धरून अँड्र्यूने धंद्यातील धडे गिरवले त्या टॉम स्कॉटची वाताहत केल्याबद्दल अँड्र्यू जॉनला बिलकुल क्षमा करणार नव्हता. पुढे चालू ..

एक लक्ष वाचक - एक प्रवास

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 03/11/2014 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती. चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.