Skip to main content

लेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ९

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 02/10/2014 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
बीची बेटावरुन पुढे निघाल्यावर ग्जो ने बॅरो सामुद्रधुनी गाठली. प्रचंड धुक्याने पुढचं काहीही दिसत नव्हतं. परंतु धुकं निवळल्यावर २६ ऑगस्टला पील खाडीच्या आसपासचे भूप्रदेश त्यांच्या दृष्टीस पडले. सकाळी ९ वाजता ग्जो फ्रँकलीन सामुद्रधुनीतील प्रेस्कॉट बेटाजवळ पोहोचलं असताना अ‍ॅमंडसेनने सहजच कंपासवर नजर टाकली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला! कंपास बंद पडला होता! दिशादिग्दर्शनासाठी अत्यावश्यक असलेला कंपास बंद पडल्यावर आता एकच मार्ग होता...

वर्धमान ते महावीर - भाग ३

लेखक दशानन यांनी मंगळवार, 30/09/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ८

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 30/09/2014 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
अटलांटीक मधून उत्तर अमेरीकेच्या किनार्‍याने पॅसिफीक महासागर गाठणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या बरोबरच अटलांटीकमधून पूर्वेच्या मार्गाने रशियाच्या उत्तर किनार्‍याजवळून जाणारा नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचे प्रयत्नही १५२५ पासून सुरु होते. इंग्लिश, डच, नॉर्वेजियन आणि मुख्यतः रशियन दर्यावर्दींचा यात सहभाग होता. २२ जून १८७८ मध्ये फिनीश-स्वीडीश दर्यावर्दी अ‍ॅडॉल्फ नॉर्डेन्स्कीओल्ड याने वेगा या जहाजातून स्वीडनमधील कार्ल्सस्क्रोना बंदर सोडलं. रशियाच्या उत्तर किनार्‍याने बर्फाचा मुकाबला करत जात असताना सप्टेंबरच्या सुरवातीला बेरींग सामुद्रधुनीच्या पश्चिमेला त्याचं जहाज बर्फात अडकलं.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ७

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 27/09/2014 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला. रिपल्स बे, जुलै २९ या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्‍या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ६

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 26/09/2014 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
-------- १८५२ -------- १० जानेवारीला बर्फावरुन वाटचाल करत जॉन रे फोर्ट गॅरी इथे पोहोचला. तिथून रेड नदीच्या काठाने पदयात्रा करत त्याने सेंट पॉल गाठलं. सेंट पॉलहून निघून शिकागो - हॅमील्टन - ऑन्टारीयो - न्यूयॉर्कमार्गे मार्च अखेरीस तो लंडनला परतला. इंग्लंडला परतल्यावर रे ला बीची बेटावर फ्रँकलीनच्या मोहीमेचे अवशेष आणि तीन कबरी आढळून आल्याची बातमी कळली. पुढच्या वर्षी आर्क्टीकमध्ये परतून फ्रँकलीनचा शोध घेण्याची आणि नॉर्थवेस्ट पॅसेज जोडणार्या शेवटच्या भागाचा शोध घेण्याची त्याने योजना आखली. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर मॅक्क्युलरच्या तुकडीची स्लेजवरुन भटकंती पुन्हा सुरु झाली.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ५

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 24/09/2014 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
१८५० १० जानेवारीला एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर यांनी इंग्लंडचा किनारा सोडला. मोहीमेत एकूण ६६ माणसांचा समावेश होता. एंटरप्राईझचा कॅप्टन होता कॉलीन्सन तर एन्व्हेस्टीगेटर मॅक्क्युलरच्या अधिपत्याखाली होतं. विषुववृत्त ओलांडून रिओ-द-जानेरोच्या परिसरात ५ मार्चच्या सुमाराला त्यांना आफ्रीकन गुलामांनी भरलेली जहाजं दृष्टीस पडली. १५ मार्चच्या सुमाराला इव्हेस्टीगेटर मॅजेलन सामुद्रधुनीत शिरलं. मात्रं मॅजेलन सामुद्रधुनीतून बाहेर पडल्यावर इन्व्हेस्टीगेटर आणि एंटरप्राईझ यांच्यातील संपर्क तुटला! मॅक्क्युलरने उत्तरेची वाट धरली.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ४

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 23/09/2014 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
१८३६ मध्ये पीटर वॉरन डीसने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं. डीसच्या मोहीमेत एकूण १२ जणांचा समावेश होता. मॅकेंझी नदीच्या मुखापासून पश्चिमेला पॉईंट बॅरो आणि पूर्वेला हडसनच्या उपसागरापर्यंत किनार्‍याने प्रवास करण्याची डीसची योजना होती. फोर्ट चिपेव्यॅन गाठून त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम केला. १ जून १८३७ ला डीसने फोर्ट चिपेव्यॅन सोडलं आणि महिन्याभरात ग्रेट बेअर सरोवर गाठलं. तिथून निघाल्यावर ९ जुलैला त्यांनी मॅकेंझी नदीच्या मुखाने आर्क्टीकचा किनारा गाठला.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 22/09/2014 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते. इंग्लंडहून निघाल्यावर रॉसच्या मार्गाने न जाता पेरीने थेट लँकेस्टर साऊंडची दिशा पकडली. खाडीतील बर्फातून वाट काढत २८ जुलैला तो खुल्या समुद्रात पोहोचला.

"हमें तुमसे प्यार कितना.."

लेखक अन्नू यांनी रविवार, 21/09/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.

शिकार

लेखक कल्पतरू यांनी शनिवार, 20/09/2014 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा.