Skip to main content

लेख

कोकणातली भुतं

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, या नावात भरपूर काही साठवलय. त्या महासागरांच्या पोटात ज्या गोष्टी दडल्यात ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी आमच्या कोंकणात आणि इथल्या माणसांमध्ये दडल्यात. आता कोकण म्हणजे नदी नाले डोंगर दऱ्या हे सगळं आलंच पण या सगळ्याबरोबर एक इनबिल्ट गोष्टंसुद्धा येते ती म्हणजे कोकणातली भूतं. लहानपण गेलं ते यांच्या गोष्टी ऐकण्यातच आणि अनुभवण्यातपण त्यातलेच काही मोजके गमतीदार किस्से खाली दिलेत. रात्रीची वेळ होती आणि अचानक वीज गेली. आता कोकणात पाऊस कधी पडेल आणि वीज कधी जाईल याचा काही भरवसा नसतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे लगेचच घामाच्या धारा लागल्या.

आठवणी

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात. ७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing.

थोडे अद्धुत थोडे गूढ - ६

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 07/09/2014 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
१८५२ सालची गोष्ट.. लंडन शहरातील हाईड पार्क चांगलेच गजबजलेले होते. विविध प्रकारच्या इमारतींचे आणि बांधकामक्षेत्रातील तत्कालीन चमत्कारांचे मोठे प्रदर्शन तिथे भरले होते. अनेक प्रकारच्या बांधकामाचे लहान-मोठ्या आकारातील नमुने तिथे ठेवण्यात आलेले होते. चोखंदळ ब्रिटीश नागरीक प्रत्येक बांधकामाचं चिकीत्सकपणे निरीक्षण करत होते. मात्रं सर्वांची राहून राहून नजर जात होती ती मधोमध करण्यात आलेल्या एक मोठ्या बांधकामावर... १५२ फूट उंचीचा एक लोखंडी टॉवर! प्रदर्शनाला आलेले सर्वजण उत्सुकतेने त्या टॉवरचं निरीक्षण करत होते.

थोडे अद्धुत थोडे गूढ - ५

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 06/09/2014 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेच्या ईशान्येला गल्फ ऑफ मेक्सीकोच्या पलीकडे पसरलेला सागर म्हणजे कॅरेबियन समुद्र. मेक्सीकोच्या उत्तरेकडील किनारा आणि क्युबापासून वेस्ट इंडीज बेटांमधील त्रिनिदादपर्यंत हा पसरलेल्या या सागराच्या किनार्‍यावर अनेक लहानमोठे देश आणि असंख्य बेटं आहेत. पॅसिफीक आणि अटलांटीक महासागरांना जोडणार्‍या पनामा कालव्यातून जहाजं प्रवेश करतात ती याच कॅरेबियन समुद्रात. कॅरेबियन समुद्र ओलांडल्यावर बेटांच्या दरम्यान असलेल्या अनेक मार्गांतून उत्तर अटलांटीक महासागरात प्रवेश करता येतो.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

लेखक अन्नू यांनी शुक्रवार, 05/09/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

परिघ परिक्रमा

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?

अफगाणिस्थान..........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/09/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
अफगाणिस्थान.......... ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य.....एकांडा डॉ. ब्रायडॉन. Simple, Free Image and File Hosting at MediaFire जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला.

प्रमोशन

लेखक vikramaditya यांनी बुधवार, 03/09/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता. समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!" त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच.

व्यक्त : कारण आणि परिणाम

लेखक वडापाव यांनी बुधवार, 03/09/2014 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का? टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही?

आळस

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 02/09/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस.