अल्कोहोलिक कॅलोरीस
डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू - 'कुठली ड्रिंक घेतलेली चांगली' हे सांगायचा नसून, 'कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?' हे सांगण्याचा आहे. धन्यवाद.
३१ डिसेंबर ची पार्टी. 'अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!' 'आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.' 'आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील... म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत.
मिसळपाव
माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.
त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'
रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत.