Skip to main content

लेख

कासाराचा गोईंदा

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा.

कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)

लेखक यकु यांनी मंगळवार, 07/12/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत.

मूष रफ पाकिस्तान /भारत व नाण्याची दुसरी बाजू

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 07/12/2010 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूष साहेबांचा विसा नाकारणे. त्यावर त्यांनी कांगावा करणे साहजिकच आहे ...पण नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे . त्यांनी बलुचीस्तांमधील कारवायांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला.( हे सत्य असल्यास असे समजू कि भारतीय करदात्यांचा पैसा कुठेतरी सत्कर्मी लागतोय .नाही तर आपले मंत्री म्हणजे राजा आहेतच पैशाचा सद उपयोग करणारे . ) त्यामुळे आपल्या सरकारने त्यांचा विसा नाकारला.

बुलबुलचे नर्सिंग होम आणि माहेरपण

लेखक जागु यांनी सोमवार, 06/12/2010 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नवीन घरात राहायला येऊन पाच वर्ष झाली. ह्या घरात आलो तेव्हा आम्ही घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेतल्या. जसे सोफा, बेड, फ्रेम्स, टिव्ही ट्रॉली, लॅम्स, झुंबर. त्यातील माझ्या आवडीचे म्हणजे झुंबर. थोडा वेगळा आणि आकर्षक म्हणून मला आणि माझ्या मिस्टरांना बाउल्सच्या आकाराचा झुंबर आवडला. ह्यात रिंग्ज मध्ये खोलगट काचेचे डिझाइन्स वाले बाउल्स बसवलेले आहेत. अगदी आवडीने आम्ही ते झुंबर लावल. कोणी पाहुणे येणार असतील किंवा घरात एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून आम्ही ह्या झुंबराची लाइट चालू करायचो. सगळ्यांना हया झुंबराच आकर्षण वाटायच. जेवढ सुंदर आहे तेवढच हे झुंबर नाजुक पण आहे.

पुण्याची मैना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 28/11/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळसुट्टीत पुण्याला मामाकडे येणं झालं की दुपारच्या शांतवेळी रानमेवा विकणारे लोक चाळीत येत असत. 'डोँगरची मैना, काळी काळी मैना, पुण्याची मैना' अशी हाळी ऐकून माझी उत्सुकता वाढली. 'काय हाये वो तुमच्या टोपल्यात?' मी त्या माणसाला विचारलं तशी पोरं माझ्या अज्ञानावर हसू लागली. 'तुला साधी करवंदं माहीत नाहीत?' 'न्हाई बॉ. करवांदंबी म्हाईत न्हाई आन् पुण्याची मैनाबी.' आमच्या खेडेगावात फार क्वचितवेळा करवंदं विक्रीस येत. त्यामुळे मला हा पदार्थ नवाच होता. आईच्या मागे लागून मी एक रूपया मिळवला.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर?

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 28/11/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर? ================================== केतन आणि विनीत शेजारी शेजारी राहत होते. दोघेही लहान असल्यापासून एकत्रच वाढले. दोघेही एकत्रच अभ्यास करायचे, खेळायचे. त्यांच्या आयाही एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्या दोघीही एकमेकींकडे वरचे वर जायच्या. केतन आणि विनीत हळूहळू मोठे व्हायला लागले. अभ्यासात केतन जात्त्याच हुशार होता. पण हे विनीतच्या आईस कळलं तरी मनाला पटत नव्हतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी केतन जरा आजारी पडला. विनीतची आई केतनच्या आईकडे जावून सहानुभूती दाखवायची. विचारपूस करायची. पण घरी आल्यावर का कुणास ठावूक तिला किंचित बर वाटायचं.