आमची मनी, म्हणजे मनीमावशी. अर्थात वाघाची मावशी. मासे खाणे आणि झोपा काढणे हा तिचा अत्यंत आवडता उद्योग. तिचा जन्मच आमच्या घरात झाला. त्यामुळे घरातील सर्वांची अतिशय लाडकी. आहे तशी गुणी. कधी कोणाला नख लावत नाही. की चावत नाही.
तिला पहिल्यांदा पिल्लं झाली तेव्हा तिने मला रात्रभर सोबत बसवून ठेवलं होतं, एवढा माणसांवर विश्वास ठेवते. खूपच मायाळू, म्हणजे मधेच मांडीवर येऊन बसेल आणि रोज सकाळी पोळी भरवून घेईल. खूप लाड करून घेते.
तिची पिल्लं लहान असतानाची ही हकीकत. एकदा रात्री एक मोठा बोका चोरपावलांनी घरात घुसला. आम्ही सगळेजण झोपेत होतो. मनीने सरळ त्याच्यावर हल्ला चढवला. आवाज ऐकून आम्ही सगळे जागे झालो.