Skip to main content

लेख

पाठीला साबण चोळण्याचे सहा प्रकार

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 25/05/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या इसमाने "जीवनोन्नत्तीचे सहा सोपान" असे कायसेसे लिहुन ठेवले आहे. भाई काकांच्या गटण्याने ते तोंडपाठ केले होते म्हणे. काल अचानक प्रदीर्घ अभ्यासान्ती मला असेच काही सोपान गवसले. माणसे त्यांच्या स्वभावानुसार अभ्यास करत असतात. पाश्चात्य देशांत तर प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान शोधले जात. उदा : भरभर चालण्याचे वैज्ञानीक तीन प्रकार शास्त्रीय रित्या आळस कसा द्यावा. जेवताना ढेकर कसा द्यावा. घोरण्याचे शास्त्रीय फायदे ईत्यादी. आंघोळीचेही बरेच प्रकार आहेत.

आयुष्यात येणार्‍या धूसरपणाला मी मानते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 24/05/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक गंमतच झाली.ईंगळ्यांची यमी आमच्या घरी बसायला आली होती.तशी यमी मला लहानच. आमच्या बालपणात कोकणात मृगनक्षत्रात पावसाच्या पहिल्या सरीत बाहेर अंगणात जाऊन पावसात न्हाऊन घ्यायची आमच्यात चढाओढ असायची. "सर्वांत प्रथम तू सुरवात करायचीस होना यमे?" असा मी प्रश्न केल्यावर यमी म्हणाली, "हो एकदा मला आठवतं माझ्या अंगात एक ताप होता.ते ढगांचं गडगडणं,विजांचं चमकणं, पाहून मला अंथरूणात पडून रहायला कसंसंच वाटत होतं.मी बाबांचा डोळा चुकवून सर्वांच्या अगोदर अंगणात आले होते." "हो मला आठवतं त्यावेळी तुझ्या बाबांनी तुला बाहेर येऊन फरफटत घरात नेलं होतं.तू रडत होतीस.

प्रगती ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/05/2009 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
ए sssssssssssssssss टकी, सळ्ळै sssssssssssssssssssssssss य्या ! नेहेमीप्रमाणे ललकारी ऐकु आली आणि मी बाहेर आलो. " नमस्कार आज्जी, आज काय म्हणताय? काय काय आहे आज डोक्यावरच्या पाटीत? आणि काय काय चाललंय तुमच्या, पाटीखालच्या डोक्यात?" सुरुवातीला, साधारणपणे दोन वर्षापुर्वी कुर्ल्याच्या पोलीस क्वार्टर्समधुन इकडे शिफ्ट झालो, तेव्हा आज्जी काय म्हणताहेत ते कळायचेच नाही.

जनावरांच्या सानिध्यात मिळणारी शांती.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 22/05/2009 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
"ते २००६ साल होतं.मी निवृत्त झालो होतो.निवृत्ती नंतर वेळ कसा घालवायचा हा माझ्या पुढे आलेला मोठा प्रश्न होता.हा प्रश्न मला एक आव्हान होतं.तशी आता पर्यंतच्या जीवनात मी अनेक आव्हानं स्विकारली आणि त्यातून बाहेर पण पडलो.पण हे आव्हान जरा जबरी होतं. मला हवी तशी आणि मला जरूरी आहे तशी एकही गोष्ट लक्षात येत नव्हती.मुंबईला माझ्या घरात बसून सतत चिंता करण्यापलिकडे काही जमत नव्हतं.मला वाटायचं की अशी चिंता करीतच माझं आयुष्य संपणार की काय?

आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 21/05/2009 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
१५०० अब्ज डॉलर!' या विषयावर कांही दिवसांपूर्वी मिपावर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक सदस्यांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते. "१. स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधार्‍या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची." "२.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

लेखक भोचक यांनी बुधवार, 20/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 20/05/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता. मी त्याला म्हणालो, "अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?" मला म्हणाला, "तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं. तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो.

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

बाबल्या मोचेमाडकर आणि आरती प्रभू

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/05/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच वर्षानी मी माझ्या आजोळी म्हणजे कोकणात आजगांवला जायला निघालो होतो. आजगांवला वेंगुर्ल्याच्या मार्गाने जाताना वाटेत शिरोडं लागतं.गोव्यात पण ह्याच नावाचं एक गांव आहे.ह्या शिरोड्या गावात वि.स.खांडेकर-प्रसिद्ध सिद्धहस्त लेखक, ज्ञानपीठ अवार्डचे मानकरी-राहत असायचे.वाटेत त्यांच घर लागतं.ह्या भागात येणारे टूरिस्ट वि.सं.च घर बघायला येतात. लांबून त्यांच्या घराला नमस्कार पण करतात.

मदर्स डे..!!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 18/05/2009 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
२६ नोव्हेंबर २००३ हा दिवस खर्‍या अर्थाने म्हणजे अगदी शब्दशः माझ्यासाठी मदर्स डे होता. नववा महिना लागून २-३ दिवसच झालेले .. थोडे कॉप्लिकेशन्स होऊनसुद्धा, महिनाभर आधी झालेलं माझं पिलू .. मला मिळालं. सी-सेक्शनसाठी दिलेली भूल उतरल्यावर जेव्हा मला जाग आली, तेव्हा फक्त मान वळवून पाहिलं तर शेजारच्या पलंगावर माझी आई बसली होती आणि तिच्या बाजूला, माझ्या आजीच्या नऊवारी साडीच्या मऊसूत कपड्यात गुंडाळून माझं येडू झोपलं होतं.. डोक्यालाही टोपड्यासारखा कपडा बांधला होता त्याच्या, त्यामुळे त्या कपड्याच्या कडेवरून मला फक्त त्याचं सरळसोट नाकच दिसत होतं..