Skip to main content

लेख

वक्तृत्वाचे कथन..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 25/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन.. नमस्कार मंडळी, सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत) असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता.

मनाच्या कुपितले-पाऊस

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 25/03/2009 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा सलग तेरावा लेख पाऊस दाटलेला माझ्या घरावरीही हा काल हे गाणे पुन्हा ऐकले. ऐकून बरे वाटले बाकी मी मराठी गाण्यांचा डाय हार्ड फॅन आहे हे तुम्ही जाणताच, त्यामुळे असे अर्थवाही, माझ्यासारखी पाल्हाळ न लावता थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय. हा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असणार म्हणा की तू पावसात भिजलास त्याचा आम्हाला काय फायदा. तुझ्या अंगात मस्ती होती म्हणून भिजलास आता भोग फळ कर्माची.

येरगुंडे गुरुजी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/03/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
हं तु उभा राहा रे, नवीन आलाहेस ना? नाव काय तुझं? अं..गुर्जी माझं नाव विशाल कुलकर्णी आहे! कानफटात आवाज काढीन ! बापाचं नाव घ्यायला लाज वाटते का? पुर्ण नाव सांग. आणि गुरुजी म्हणावं राजा, गुर्जी नाही, समजलं ? हो गुरुजी. माझं नाव विशाल विजय कुलकर्णी. आधी पुण्याला होतो, वडिलांची बदली झाली म्हणुन इथे कुर्डुवाडीला आलो. आज पहिलाच दिवस आहे शाळेत माझा. हं, ठिक आहे. पाटी बघु तुझी. गुरुजींनी माझी पाटी घेतली, माझ्याच पेन्सीलने त्यावर एक ओळ लिहीली....ते मोत्यासारखे अक्षर मी पाहातच राहीलो. हे घे, आता या ओळी सुवाच्य अक्षरात फळ्यावर लिही आणि नंतर सगळे मिळुन तास काढा.

गिरिश

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 23/03/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसला निघालो. सोसायटिच्या समोरच्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत होते, एक दहा-बारा वर्षांचा मुलगा बॉलिंग करत होता, त्याचा कडे पाहुन माझे पाउल अचानक थांबले, तो पळत आला आणि त्याने डाव्या हाताने जोरात बॉल टाकला आणि त्याने बॅट्समन ला बोल्ड केले. त्याला पाहुन माझ्या डोळया समोर गिरिश उभा राहिला. गिर्‍या माझा बालमित्र माझा शेजारी. असाच गिरिश ला आठवत मी पुढे जाऊ लागलो आणि डोळ्यात समोर उभा राहिलं तो दिवस. मी असाच घरात लोळत पडलो होतो. पहिल्या पावसाची पहिली सर बाहेर पडत होती. शांत पणे गॅलरी जवळच्या सोफ्यावरबसुन बाहेर मस्त पाउस बघत बसलो होतो.

अशीच ही एक चीज असते ज्याला सत्य म्हणतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 23/03/2009 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे." माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा. त्या दिवशी मी त्याला त्या पैजेची आठवण करून दिली.त्याचं खरं असून सुद्धा त्याला शंभर रूपये मिळाले नाहीत.ती गंमत मला त्याच्या तोंडून पुन्हा ऐकायची लहर आली. मी त्याला म्हणालो, "सत्याच्या मागे जाण्याची ही तुझी संवय तुला

मनाच्या कुपितले-जर्नल

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/03/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख. हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता
जर्नल
हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.

मनोमन प्रार्थना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 18/03/2009 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
"कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं." जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्षं कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.कुणा आजार्‍याला भेटण्यासाठी किंवा माझ्या डॉक्टर मित्राला सांगून कुणातरी माझ्या नातेवाईकाला ह्या हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करण्याच्या निमीत्ताने माझ्या इकडे बर्‍याच खेपा व्हायच्या.

अश्वत्थाम्याच्या डायरीतले एक पान .......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 16/03/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
दोन घडीचा डाव, त्याला जीवन ऐसे नाव..... हं..जगणं मरणं, मरणं जगणं सारंच अनाकलनीय, विलक्षण.... माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर.. जीवन... निरर्थक, वेडेवाकडे, कागदावर रेखाटलेल्या अर्थहिन भौमितिक रेखाकृतींसारखे कागदावरच्या सर्वच रेषांना...नसतो अर्थ जसा....! माझं जीवनही तसंच आहे.... मदिरेच्या प्याल्यातील शिल्लक, शेवटच्या, एकुलत्या एक थेंबासारखे ... तृणपर्णावरुन ओघळलेल्या एकाकी दंवबिंदुसारखे ... कपोलावर अलगद, नकळत, रेंगाळलेल्या कढत कढत कदाचित खारट आसवांसारखे ... का जगायचे, कशासाठी जगायचे ? जगण्यातला अर्थ जाणण्यासाठी?

"आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 16/03/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,कुठच्याही नवीन समस्येला जूनं उत्तर असतं.त्या जुन्या आणि होऊन गेलेल्या अक्कलवंत कानगोष्टी आपल्या बरोबरच असतात त्या आपल्याला आश्वासन देतात, "आपण एकटे नसून,आपण इथे पुर्वी पण होतो" श्रीधर आणि मी एकाच गावात वाढलो आणि शिकलो.मी शिक्षण पुरं केल्यावर जास्तशिक्षणासाठी परदेशी गेलो.आणि या वयात परत आपल्या गावात येऊन उर्वरीत आयुष्य लेखन करण्यात वापरायचं ठरवलं आहे.पण श्रीधरने माझ्या सारखं काही केलं नाही.

श्यामची आई

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 15/03/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌। छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।। छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या.