Skip to main content

माध्यमवेध

गुगल नावाची पुस्तकाची खाण

लेखक विकास यांनी शनिवार, 11/07/2009 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल फास्टनॉलेज चा जमाना तेजीत आहे. कुठलीही माहीती हवी असली तर गुगलवर लगेच त्यासंदर्भातील शब्द टाकून पाहीले जाते. कधीकधी ऐतिहासीक/सामाजीक/राष्ट्रीय माहीती शोधायला या शोधामधे बहुतांशी येणार्‍या विकीपिडीयाचा उपयोग होतो. तरी देखील कधीकधी याहून अधिक माहीती हवी असते. अशी वेळ जशी काही कामानिमित्त संशोधन करताना येते तशीच ती मिपा अथवा इतरत्र काही चर्चा करताना योग्य संदर्भ करताना पण येते. अशा वेळेस नेहमीच्या गुगलच्या उपयोगापेक्षा अधिक काहीतरी हवे असते. जिथे ठाम संदर्भ मिळू शकतील. त्याला परत उत्तर तेच आहे - गुगल! फक्त नुसते गुगल नसून ते गुगलबुक्स म्हणून आहे.

शताब्दी - अर्थशास्त्राच्या प्रकाशनाची

लेखक विकास यांनी बुधवार, 24/06/2009 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
(इमेल वरून एका आलेल्या आणि त्या इमेलच्या वेधक मथळ्यामुळे सुदैवाने वाचल्या गेलेल्या एका लेखाचे हे स्वैर आणि संक्षिप्त भाषांतर.) १८९१ साली म्हैसुरच्या महाराजाने राणि व्हिक्टोरीयाच्या सन्मानार्थ "व्हिक्टोरीया ज्युबिली इन्स्टीट्यूट" नामक एक वास्तू म्हैसुरमधे बनवली. विविध संस्कृतीतील वास्तुशास्त्रांचे मिश्रण केलेली ही इमारत वेगळ्याच घाटणीतील तयार केली गेली आहे. या वास्तू मधे अनेक भुर्जपत्रांवरील लेखन विविध ठिकाणाहून आणून साठवले गेले होते. त्या काळात त्याला ओरीएंटल रिसर्च लायब्ररी म्हणायचे आता तीला ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट म्हणतात.

मला आवडलेला फोटो

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 16/06/2009 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्ता नवी मुंबई पुरवणीतील एक छान फोटो. शाळेच्या पहिल्या दिवशी रडणार्‍या आपल्या मैत्रीणीचे एक मुलगी डोळे पुसुन तिला धीर देत आहे. मस्त फोटो. तुमच्या काही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी आहेत का ? अमोल --------------------------------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

लेखक ॐकार यांनी रविवार, 07/06/2009 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

शिवराज्याभिषेक दिन -

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 04/06/2009 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

लेखक भोचक यांनी बुधवार, 20/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

एकम् सत्

लेखक विकास यांनी सोमवार, 18/05/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...