Skip to main content

प्रकटन

रॅंपेज

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 08/06/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना." "अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही..

पाउस, ती आणि मी- भाग २

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी रविवार, 07/06/2015 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस, ती आणि मी- भाग १ कानफटात खायची तयारी ठेउन मी गडाच्या ट्रेकला सुरुवात केली. आज माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. पावसानीही हजेरी लावली. तिच्या आवडत्या पावसामधे तिला मागणी घालायचा प्लान बहुतेक पुर्ण होणारचं होता. ----> मुलींचा सिक्स्थ सेन्स पक्का असतो का मी त्यादिवशी विचित्रासारखा वागत होतो हा प्रश्ण मला कधीचं सोडवता आलेला नाही. कारण जसजसा किल्ल्याच्या वरच्या जिन्याकडे सरकत होतो आम्ही तसतसं ती मला बोलता करायचा प्रयत्न करत होती. माझं हलकट मित्रमंडळ बाउन्सर वर बाउन्सर टाकत होतं.

निकाल (शतशब्दकथा )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/06/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली.

संगम

लेखक रातराणी यांनी बुधवार, 03/06/2015 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
डबा बाट्लीये… अशाच एका उन्हाळ्याच्या दुपारी भंगार वालीची हाक आली आणि काम आवरून नुकतच पडलेली आई निशुला म्हणाली, "निशू बेटा जरा सांग ग त्यांना थांबायला." लोळत पडलेली निशू जराशी कुरकुरतच उठली आणि तिने खिडकीतून त्या भंगारवालीला बोलावलं, "ओ आईने बोलावलंय तुम्हाला." "अग निशू मागच्या दारीच आण ग त्यांना, खूप साठवलेत म्हणाव त्यांना डबे , इकडेच आल्या तर त्यांना सोप पडेल वजन करून भरायला.उन तापलय चांगलच." तोपर्यंत त्या बाई घराजवळ आल्या होत्या, निशूने गेट उघडून त्यांना आत घेतलं आणि मागच्या दारी घेऊन आली. तोपर्यंत आईने साठवलेले पत्र्याचे डबे आणि बरच काय काय बाहेर काढल.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

मुर्दाड

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 26/05/2015 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याला असताना १९९९ - २००० जीवंती रुग्णालयात( वास्को येथील) तिथला एम टी(mechanized transport) अधिकारी म्हणून डॉक्टरी शिवाय अतिरिक्त काम माझ्या गळ्यात आले होते. यात रुग्णवाहिका त्यांचे चालक, त्यांचे तेलपाणी डागडुजी इ. सर्व कारभार पाहावा लागतो. सर्वात कटकटीचे काम म्हणजे रुग्णवाहिकेचे चालक(हे सिव्हिलियन असतात). माणूस एकदा चालक म्हणून सरकारी नोकरीत लागला कि त्याला आयुष्यभर बढती नाही. सरकारी नोकरी असल्याने कामावरून काढता येत नाही. त्यामुळे हे लोक बर्याच वेळेस माजोरी असतात.

स्वस्तिक २

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 26/05/2015 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वाध- स्वतिक ,माझा एक मित्र घरी भांडुन घर सोडुन जातो. रात्र्ी स्वताःच पुन्हा पुण्याहुन परततो. मी त्याच्या खिशातुन एक चिठठी हस्तगत करतो ज्यावर माझे नाव असते. -------------------------------------- ती चिठ्ठी अोलसर झालेली होती. त्यामुळेच मला माझ्या नावाची अक्षरे वाचता आली होती. आता सगळ्यांसमोर ती उघडुन वाचत बसलो असतो तर अनर्थ झाला असता. मी ती चिठ्ठी हळुच खिशात ठेवली. स्वस्तिकची आई थोड्यावेळाने बाहेर आली. रडुन रडुन त्या माऊलीने डोळे सुजवुन घेतले होते. त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलावले. या एवढ्या घोर प्रसंगातही त्यांनी जेवण बनवले होते अगदी स्वस्तिकच्या नावाचेही!

उर्जा घड्याळ

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 26/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू. उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं.

उडदांमाजी....

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 26/05/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
‘मॅडम, बाहेर काळे म्हणून एकजण भेटायला आलेत. येऊ देत का ?’ दहा मिनिटापूर्वीच मी शिपायाला बजावलं होतं, मिटिंगचं काम आहे, एक तास कुणाला आत सोडू नको. आणि दहाच मिनिटात कोण काळे उगवला ? मी कपाळाला दोन सुरकुत्या पडून विचार केला. काळे नावाची कुणी व्यक्ती डोळ्यासमोर येईना. ‘थोडा वेळ थांबा म्हणावे..’ मी म्हटले. इतक्यात शिपायाच्या मागून एक ओळखीचा चेहेरा उगवला. ‘मॅडम, येऊ का आत ?’ ‘अरे, तुम्ही होय, काळे ? या, या ना !’ काळेला बघितल्याबरोब्बर माझी बत्ती पेटली. तीन वर्षापूर्वी माझे सोलापुरातल्या एका तालुक्याच्या गावी पोस्टिंग झाले असताना तिथे माझ्या हाताखाली दोन शाखा अधिकारी होते. हा काळे आणि दुसरा गोरे.

स्वस्तिक

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 26/05/2015 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षापुर्विची नव्हे तर अगदी अलिकडची गोष्ट आहे.रम्य पहाटेची वेळ. मंद गार वारा वाहतो आहे आणि अशावेळी काहीच घडत नाही. सर्व गोष्टींची सुरवात रम्य पहाटेने व्हावी असे काही नाही.असो. रात्र्ी मित्र्ांसोबत[फक्त मित्रच हं] फिरताना नेहमीप्रमाणे अचानक मोबाईल वाजला.फोन अक्षयचा. "स्वस्तिकला बघितल का बे?" " नाय बा काय झाला?" "अरे ते येड्याxx कालपासुन गायब आहे." माझ्या पायाखालची वाळुच काय दगड माती सगळच सरकलं. " घरच्यांशी भांडुन गेला तो आलाच नाही अजुन. आत्ता फोन केलो तेव्हा कळालं." " मग आता?" " ए मंद बुद्धी सुंद काम निघ आणि माझ्या घरी ये." गाडीवरुन लगेच निघालो.