Skip to main content

प्रकटन

श्रीमंत: शतशब्दकथा

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 25/05/2015 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्‍या आईची आठवण झाली.

वेगळ्याचं वेगळं नशीब

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 25/05/2015 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुस्तकं एक अजब गोष्ट आहे. मानवाच्या सर्व संभाषिक प्रकारांमधला सर्वात जास्त "हेकेखोर" प्रकार आहे हा … खरंच !!! माझे विचार, माझ्या संवेदना, माझा न्याय आणि माझाच निवाडा… माझ्या भिंगांमधूनच जग पहा … नाही आवडलं तर वेळीच प्रतिक्रिया द्यायची सोय नाही … पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तर शक्यच नाही … लेखकाला सगळं छापून आल्यावर मग प्रतिक्रियांची पत्र , इमेल पाठवून काय उपयोग?

सत्य परेशान होता ही है और हारता भी है?

लेखक जानु यांनी शुक्रवार, 22/05/2015 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
(खालील घडलेली सत्य घटना नावे बदलुन) अनिकेत आणि निकिता दोहोंचा संसार सुरु होऊन ५-६ वर्ष झाले होते. छान पैकी चालले होते. एक मुल होते. भाड्याच्या घरातुन एक २ बी.एच. के. फ्लॅट घेतला. फ्लॅट घेतांना सोसायटी, शेजारी पाहिले. फक्त चारच घरांची दुमजली ईमारत पाहुन जास्त त्रास नाही म्हणुन फ्लॅट घेतला. सुरवातीला २-३ वर्ष सगळे व्यवस्थित चालले होते. तस पाहता घरात ज्या छोट्या छोट्या कुरबुरी शिवाय बाकी सगळे ठीक ठाक. शेजारी एक पेट्रोल पंपावर काम करणारा. अनिकेत स्वतः शासकीय नोकरीत. वरचा फ्लॅटमध्ये एक दक्षिण भारतीय कुटुंब. त्याच्या शेजारी एक अविवाहित.

मिसळ पाव - श्री गणेशा!

लेखक हर्षल पतिंगे यांनी गुरुवार, 21/05/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रमंडळी, बरेच वर्षापासून विचार करत होतो की 'मिसळ पाव' खायला सुरुवात करुयात ; पण काही करून योग येईना. बरेच जण म्हणतात की योग हा येत नसतो, तो आणायचा असतो. येत नसेल तर त्याचा येण्या-जाण्याचा खर्च उचलायची तयारी दाखवावी लागते असं म्हणतात. तर मी ही तयारी दखवल्यावर योग तर एका पायावर तयार झाला येण्यासाठी. नशीब! (जाऊ दे सध्याच नशीबा बद्दल नको बोलायला. लवकर रुसायची सवय आहे म्हणतात त्याला) तस तर वेबसाईटच्या वरच्या कोपर्यातलं नुसतं चित्र बघायलाही भेटं देणं मला वावगं वाटणार नाही; पण त्याचा आस्वाद घेण्यातली मजा काही औरच. असो.

पानिपत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 20/05/2015 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.

सुंदरीचे ओझे

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 20/05/2015 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले. तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.

रडू

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 18/05/2015 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार भारतातील आपल्या क्षेत्रात एक मोठे ब्रॅंडनेम असलेल्या एका मोठ्या कंपनीच्या लंचरूममध्ये हा जेवायला बसलाय. टेबलवर समोरच्या खुर्चीत त्या कंपनीचा एक उच्चपदस्थ बसलाय. गप्पा चालू आहेत. उशिर झालाय. दोघेच उरलेत. त्याची सुबत्ता याच्या सुबत्तेपेक्षा कमीत कमी दसपट तरी असेल. जास्तच पण कमी नाही. माणुस तसा भला. पण सतत काळजीच्या छटा घेऊन वावरत असतो. ओळख होऊन दहा एक दिवस झालेत. त्यामुळे आता हळू हळू गाडी व्यक्तिगत आयुष्य, आवडीनिवडी वगैरेंवर येत आहे. गप्पा चालू आहेतच. गाडी डाएट, फ़िटनेस, हार्ट वगैरे रूळांवर धावतीये आता.

शतशब्दकथा - शिवी

लेखक एस यांनी सोमवार, 18/05/2015 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा गुंठामंत्री. काय त्यो रुबाब, त्ये अंगावरलं मणभर सोनं, काळ्या काचंवाली कार्पियो, ह्याप्पी बड्डेवाले फ्लेक्श. जिमिनीचा पयसा पान्यागत वहातोया." विचारात गढलेल्या त्याला धूळ उडवीत येणार्‍या गाडीनं जागं केलं. लगबगीनं बंगल्याचं फाटक उघडलं गेलं. गाडीतून टक्कल उतरलं. मागून एक पोरगी आणि काही माणसं. बाकीची मंडळी ढोसायला बाहेर गेली. "लिलावात उचलली. धा हजारात." पुसटसं ऐकलं त्यानं. रात्र वाढली तसा तो त्याच्या खोपटात पडला. ते आवाज ओळखीचे होते त्याला. मध्ये पडायची हिंमत नव्हतीच कधी. दिवस उजाडला. टक्कल तांबारलेल्या डोळ्यांनी स्कॉर्पियोत बसून निघून गेलं.

शी!!!! तुम्ही नियम पाळता?

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 17/05/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार सकाळची गोष्ट आहे. पहाटे पहाटे १०.३० वाजता माझे एक जवळचे मित्रवर्य घरी आले. उजवा हाताचा पंजा आणि कोपराची मागची बाजु बँडेजमधे गुंडाळलेली, चेहेर्याची उजवी बाजु थोडीशी घसपटलेली आणि जराश्या "तैमुरलंग" अवस्थेमधे त्याला पाहुन मी खरं तर दचकायला हवं होतं. त्याऐवजी मला भयानक हसायला आलं. नाही नाही तुम्हाला वाटतयं तश्या माझ्या संवेदना वगैरे मेलेल्या नाहीत पण त्याची ही अवस्था व्हायला तो स्वतःचं जबाबदार आहे. त्याचं म्हणजे "आधीचं उल्हास, त्यातुन फाल्गुनमास" असा प्रकार आहे.

पाकिस्तानी अणुबाँब: एक घोर फसवणूक

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 17/05/2015 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ’मिपा’कर! Nuclear Deception या एड्रियन लेव्ही व कॅथरीन स्कॉट-क्लार्क लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचे रूपांतर मी एक मालिकेच्या रूपाने लिहिताना ’नैवेद्याचा मान’ म्हणून प्रत्येक पुष्प मी सर्वात प्रथम ’मिसळपाव’वरच प्रसिद्ध करत असे. इथल्या वाचकांनी त्या उपक्रमाचे मन:पूर्वक स्वागत केले व त्यापैकी २-३ वाचकांनी तर स्वयंस्फूर्तीने त्यातील चुका मा़या निदर्शनास आणणे व मला सुधारणा सुचविणे अशा पद्धतीचे अमोल सहाय्यही केले. या सुधारणा केल्यानंतरच मी ते ’ई-सकाळ’वर पोस्ट करत असे.