प्रकटन
सरस कट्टा (अर्थात महालक्ष्मी सरसला भेट)
नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय.
कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!
मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते.कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही.मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.
म्हणूनच तर "प्यासा" च्या देशात "दबंग" सुद्धा हिट होतो. चला एकवेळ मान्य करू की दबंग मध्ये सलमान खान तरी होता . पण मराठी प्रेक्षकांनी ऐकेकाळी अलका कुबल चे सिनेमे सुद्धा डोक्यावर घेतले होते. हिचे सिनेमे बघून तर गांधीजींची सुद्धा सहनशक्ती संपून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असता.
पत्रकारीतेची ऐशीतैशी
आजकाल विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांचा भारतात सुळसुळाट झालाय. कित्येक लोकांना रोजगारही मिळाला आहे. पण हे पत्रकार, संपादक, उपसंपादक काय म्हणून त्या पदांवर बसलेत असा सवाल पडतो. पूर्वी काही चुका या उपसंपादकाच्या डुलक्या (उसंडु) या नावाखाली चेष्टेचा भाग मानला जायचा. पण आता मात्र या डुलक्यांची वाढती वारंवारीता बघून क्लेश होतात. वानगीदाखल हे एक उदाहरण
१. दै. लोकमत (पुणे आवृत्ती) दि.
प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे.
नमस्कार,
मला गेल्या दहा एक वर्षात सर्वसाधारण आंतरजालासोबतच मराठी आंतरजाल, तसेच ज्ञानकोशीय लेखनाचा प्रशिक्षण देण्याचा बर्यापैकी अनुभव आहे. सोबतच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात ते उपयूक्त पडेल अशापद्धतीने प्रशिक्षण वर्ग/ कार्यशाळा आणि सुट्टीतील वर्ग आयोजीत करण्याची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण आयोजीत करण्यासाठी आंतरजाल सुविधा उपलब्ध असलेल्या संगणक संस्थांशी संपर्क करून हवा आहे.
मिसळपाव वर टंकलेखन करण्याच्या काही विशेष सुचना
नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
इथे नविन सभासदांना मराठीत टाइप करायला बर्याच अडचणी येतात.
सुरुवातीला मला पण थोडा त्रास झाला.
त्यामुळे, मराठीत कसे टाइप करावे? ह्यासाठी हा धागा काढत आहे.
सुरुवातीला आपण बाराखडी बघु या.
पहिली महत्वाची गोष्ट ----- तुमच्या कळफलकाचे "Caps lock" नॉर्मल ठेवा.थोडक्यात अक्षरे छोट्या लिपीत यायला पाहिजेत.
व्हा पुढं … २०१५ साठी
२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे
कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ.
बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही
कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ?
(हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये )
तर असो मला काय म्हणायचे आहे की ….
छायाचित्रणकला स्पर्धा ५: "भूक" : निकाल
नमस्कार मंडळी! पाचव्या स्पर्धेचा निकाल तुमच्याहाती देताना अतिशय आनंद होत आहे. ह्यावेळच्या स्पर्धेला मात्र अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित विषय काहीसा कठीण (abstract) असल्यामुळेही असेल. सदस्यांनी मात्र नेहमीप्रमाणेच उत्साहाने मतदान केले.
सर्व स्पर्धक तसेच विजेत्यांचे अभिनंदन!
पुढची स्पर्धा लवकरच घोषित करु.
आगामी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल करत असून तो फक्त त्या स्पर्धेपुरताच मर्यादित राहिल.
विजेता क्र.
निरंजनाची कविता
झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना |
शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद|
निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा ||
कौतुक, स्तुती, वाद- विवाद, उपेक्षा आणि अपेक्षा ह्याहीपलिकडे जाणार्या शाश्वत परिमाणाशी नातं जोडू शकणारी रॉय किणीकरांची कविता. गहिर्या चिंतनशीलतेशी नातं सांगणारी, अचूक मोजक्या शब्दांच्या सहाय्याने विलक्षण असा कायमस्वरुपी असर मनावर टाकणारी आणि मनाला चुटपूट लावणारी. काही उमजलं आहे, समजलं आहे ही जाणीव होता होता, पार्यासारखा निसटून गेला, अशा अर्थांची काहीशी अनुभूती देणारी. गूढ आणि तितकीच मोहिनी घालणारी समर्थ शब्दकळा ल्यायलेली, पण काहीशी अस्थिर वाटणारी.
अटलजींना भारतरत्न
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्याचे आजच जाहिर झाले आहे.काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कुठलाही पुरस्कार देऊन त्या व्यक्तींचा नव्हे तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला जातो. अटलजींना भारतरत्न देऊन भारतरत्न पुरस्काराचा सन्मान अशा प्रकारेच वाढवला गेला आहे अशीच भावना बहुसंख्यांची असणार याविषयी शंका नाही.
मिसळपाव