ती....
ही कथा यापूर्वी अनाहिता मध्ये प्रकाशित झाली आहे. तिथल्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर इथे टाकत आहे.
पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावे.'
ती..
एका वेगळ्या व्यथितांची प्रतिनिधी.
सगळ्या जगाने सहज धुडकावली तिला ! काय दोष तिचा ? सगळ्यांसाठी खपली फक्त. अपेक्षा ठेवल्या नाहीत. तिच्या नशिबी असं का? मलाच का माया लावली इतकी तिने? असा काय ऋणानुबंध होता या मावशीचा अन माझा? हे उत्तर तर आजही मिळत नाही मला.
काही काही कळत नाही मला.........
**--**
"सविता, चला आता घरी, शुभंकरोती म्हणायचय ना? आजोबा बोलावतायत"
मी अगदी तीन वर्षांची असल्यापासून आजीचा हाच उद्योग.
मिसळपाव