Skip to main content

प्रकटन

तुम्ही काय करता ?

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 09/10/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते

त्यांची दिवाळी ..

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 09/10/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन. वाहत्या गंगेचा लाभ घेऊन वर्षाची थकबाकी निल करण्यासाठी मोर्चे कसे बांधायचे याच्या सूचना नवरेसाहेब जातीने देणार होते आणि त्यासाठीच खास मिटिंगचे आयोजन केले होते.

गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी

लेखक _मनश्री_ यांनी मंगळवार, 07/10/2014 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ठरवताना काय आवश्यक असतं , व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला . ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत . पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे . आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत , आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून ब्राम्हण कुटुंबात वाढली

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 07/10/2014 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

माझ ब्राम्हण असण

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 05/10/2014 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये .

देणाऱ्याने देत जावे.....

लेखक _मनश्री_ यांनी शनिवार, 04/10/2014 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत रहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे . देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो . २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा जगात joy of giving week म्हणून साजरा केला जातो . भारतात हा आठवडा 'दान उत्सव' या नावाने साजरा केला जातो . प्रत्येक जण यथाशक्ती सहभाग घेतो ... देण्याच्या वृत्तीचे अनमोल, दैवी मूल्य आहे. सर्व धर्मग्रंथ ह्या वृत्तीला, कृत्याला अव्वल दर्जा देतात. हा एक मोठ्यातला मोठा संस्कार जोपासला गेला पाहिजे. निसर्गाकडून हीच शिकवण आपल्याला मिळते. ही देण्याची वृत्ती मात्र सहजपणे आढळत नाही. देणं म्हणजे केवळ आर्थिक दान असा गैरसमज नसावा.

डॉ. झाकिर नाईक - माझी प्रतिक्रिया

लेखक उगा काहितरीच यांनी शुक्रवार, 03/10/2014 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
(सदरील मुळ लेख ईंग्रजीत असुन भाषांतराच्या चुका असु शकतात) काल मित्राने डॉ. झाकिर नाईक व श्री श्री रविशंकर यांच्यात झालेल्या चर्चेचा विडीओ दिला. सदर कार्यक्रम पाहिल्यवर माझ्या मनात उठलेले विचार... कार्यक्रमाचा विषय होता: “the conecpt of god in Hinduism and Islam in the light of the sacred scriptures.” पहिली गोष्ट जी माझ्या मनात आली ती कोणत्याही व्यक्तीच्या मनात येईल ती म्हणजे डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती. कमाल आहे राव ! त्या टोपीखाली एवढा डेटा साठवन्याची. हे व्हिडीओ पहान्याच्या अगोदरच मी ठरवलं होत कि - शक्य तितकं नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पहायचे.

ग्राहक राजा

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 01/10/2014 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राहक राजा हि आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात दिलेल्या लढ्याची छोटीशी कहाणी. आमच्या आईचा एक लाखाचा मेडिक्लेम १९९९ साली काढलेला होता. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी कडे. २०१२ साली तिचे दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात झाली. ती पूर्ण बरी होउन घरी आली. आम्ही शस्त्रक्रियेच्या अगोदर विमा कंपनीला त्याबद्दल कळविले होते. जे जे सर्व कागदी सोपस्कार होते ते पूर्ण केलेले होते. शल्यक्रिया झाल्यावर त्याचे बिल रूपये ८८०००/- आम्ही कंपनीकडे पाठविले.

अभिनव विचार संग्रह - (१)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 01/10/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!