Skip to main content

प्रकटन

....आणि तरीही मी!

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 23/03/2011 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
....आणि तरीही मी! खरे तर सौमित्र यांच्या कवितांचे आकर्षण फार पुर्वी पासुनच आहे. म्हणजे जेव्हापासुन गारवा ऐकले होते तेव्हापासुन त्यांचा पंखा (गारव्यामुळे पंखा झालो ;) ) झालोच होतो. गारवा प्रकाशित झाला तेव्हा नुकतेच मिसरुडे फुटुन महाविद्यालयात दाखल झालो होतो, आणि त्यात असा सुंदर प्रेमकाव्य असलेला अल्बम म्हणजे काही विचारालाच नको. ;) असो. सौमित्र यांचा '....आणि तरीही मी!' कविता संग्रह काही दिवसांपुर्वी वाचनात आला. आत्तापर्यंत त्याची बरीच पारायणे झाली. यातील प्रत्येक रचना ही खुप तरल आणि स्वाभाविक वाटते. या सर्व कवितांनी मनात घर केले.

हुतात्मा भगतसिंह आणि भयभीत इंग्रज सरकार

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/03/2011 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले. आज त्या हौतात्म्याचा ८० वा स्मरणदिन. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी आपल्या ध्येयास्तव स्वत:ला वाहुन घेतले आणि ते हसत हसत फासावर चढले. या सर्व देशभक्त हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणजे हुतात्मा भगतसिंह.

बातमी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 22/03/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत. या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

लेखक अवलिया यांनी सोमवार, 21/03/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि | तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२- २२ ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकुन देऊन नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे शरीराचा त्याग करुन आत्मा नवीन देह धारण करतो. सांख्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानानुसार त्या तत्वज्ञानाचे स्वरुप विशद करुन सांगतांना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे संवादातुन सांगितले त्यातले एक महत्वाचे वाक्य असे या श्लोकाला म्हणता येईल. जुन्या वस्त्रांच्या त्यागानंतर नवीन वस्त्रं धारण करणे हा दाखला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण नेहमी पहात असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही.

(आता करितो भरपाई...)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 19/03/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल... सोडले जुने रागलोभ...राहिलो मिपानगरीचे ठायी... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... हा तो विसोबाचा गाव.... अवघे चंट, थोडके राव... पिचकारीच्या रंगामध्ये.. अवघा आसमंत न्हाही... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... स्वसंपादनाचा घोळ... हा तर बालिश पोरखेळ... उठली बंदी जर काही.....ती तो नीलकांताची पुण्याई... आता करितो भरपाई...आता करितो भरपाई... ते बंधन सुटता वेगे... पहा झाली नवीन पहाट.... विसरूनी शून्य चर्‍हाट...

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

नेहमीचीच संध्याकाळ

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 18/03/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे ५.३० वाजतात. सगळेच पीसी बंद करुन उठतात. वर्गात काही लोक सोडून कुणालाच बसायची इच्छा नसते; तरीपण लॅब मध्ये काहीतरी काम करतोय असे मॅडमना दाखवावे लागते. त्याला पर्याय नाही. प्रत्येक शुक्रवारचा हाच दिनक्रम! मॅडमचा शाब्दिक मार, धमक्या सहन होत नाहीयेत, खर्‍या करुन दाखवल्या तर धडगत नाही. त्यातच मंगळवारच्या सेमिनारचे टेंशन. एक ना दोन, हजार लचांडे मागे लावून प्रोफेसर लोक मात्र निवांत चहा आणि सिगरेट प्यायला शहीद भवनात किंवा टिक्कावर! सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.