Skip to main content

प्रकटन

"पुष्पक "

लेखक VINODBANKHELE यांनी सोमवार, 14/03/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिपाकर , न बोलता फटाके फोडण्या साठी मिपा संस्थळ प्रसिद्ध आणि म्हणून खूप लोकप्रिय आहे , अर्थात हे सांगण्याची काही गरज नाही म्हणा ,पण असेच एक माईल स्टोन स्थळ माझ्या आठवणीत आणि गुगल व्हिडिओ वर आहे त्याची आणि आपली भेट घडवावी म्हणून हे लेख पुष्प .

फुकट ते पौष्टिक?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/03/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...' लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा. "क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं.

'एरीक क्लॅपटन'

लेखक प्रास यांनी शनिवार, 12/03/2011 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण साठच्या दशकात, काऊण्टर कल्चर, हिप्पी कल्चरच्या गदारोळात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज रत्ने हाती गवसली. त्यातलं महत्त्वाचं नाव , म्हणजे 'एरीक क्लॅपटन'. अत्युच्च प्रतीचा गीतकार, संगीतकार आणि गायक. जगातल्या सर्वात उत्तम गिटारवादकांपैकी एक.

शंका नको!

लेखक उगा काहितरीच यांनी शनिवार, 12/03/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
काल मिपावर एक साधा सरळ प्रश्ण विचारला होता. आणि त्याचे तसेच उत्तर अपेक्षीत होते. पण मिपाकरांच्या सौजन्याने व कल्पकतेने हसता हसता पुरेवाट झाली.( धन्यवाद!) पण काही मिपाकरांनी आमच्या आयडी बद्दल काही शंका उपस्थित केल्या म्हणुन हा लेखनप्रपंच!! मी ब-याच दिवसापासुन मिपाचा वाचक आहे पण पाहुना बनुन. ब-याच मराठी व भारतीय मानसाप्रमाने मलाही माझे काही विचार लोकांपर्यंत पोचावेत असे वाटते त्यामुळे व मिपावरचे उत्साही व एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण पाहुन मिपावर यायचे ठरवले. मिपावर सदस्य व्हायला इतर संस्थळासारखे झटपट होत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले! पण (बहुदा) निलकांतच्या सहमतिने लवकरच सदस्य झालो.

वेळ झाली!

लेखक गुंडोपंत यांनी बुधवार, 09/03/2011 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच तेथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो उपक्रमावर दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले. उपक्रमावर मी येताच नावाप्रमाणे दंगा सुरू केला. जन्मतः असलेल्या खोचक, भोचक आणि हलकट स्वभावामुळे अनेकांचा आवडता आणि अनेकांचा नावडता बनलो. माझ्या प्रदीर्घ खरडवहीत तुम्ही ते वाचू शकता. युयुत्सु यांच्याशी मात्र तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना, असे झाले होते.

उन्नत क्षण

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 09/03/2011 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा ढकलपत्रातून आलेल्या, उगम माहित नसलेल्या कथा-कविता पुढे पाठवत नाही, अगदीच आवडल्या तर मित्र-मंडळींना वाचून दाखवतो, नाहीतर कंप्यूटर मध्ये save करून ठेवतो.

पुष्पक

लेखक मॅक यांनी मंगळवार, 08/03/2011 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
राणीच्या बागेत महानगरपालिकेतर्फे फुलझाडांचे व फळझाडांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. त्या ठिकाणची ही काही फुलझाडे. बघा आवडलीतर कारण हा माझा पहीलाच प्रयत्न आहे.. काही चुक झाली असल्यास तसे सांगा व माफ करा.... ०१) ०२)