Skip to main content

प्रकटन

(मदतः- अंगातले बाळस् कसे घालवु?)

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 26/11/2009 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी हुशार आहे. (कोइ शक?) हल्ली अंगातले बाळस् फारच वाढत चाललेले आहे. सारखे काहीतरी करावेसे वाटते. मध्यंतराचा सुद्धा अगदी कंटाळा येतो आहे. क्रिकेट आवडत नाही. सिरियल्स बद्दल पॅथॉलॉजिकल नावड आहे. चॅलेन्स वर जे काही चाललेले आहे त्याने संताप होतो आहे. काय करावे सुचवाल काय?

व्यर्थ न हो बलिदान...

लेखक अभिजा यांनी गुरुवार, 26/11/2009 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
व्यर्थ न हो बलिदान... २६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!

२६ नोव्हेंबर विसरायचा नसेल तर आवर्जून पहावं असं काही

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 26/11/2009 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भष्टाचाराविरूद्ध महत्वाचे हत्यार ठरू शकणार्‍या माहिती आधिकाराच्या कायद्यानंतर त्याच्या काही यश-कथा वाचल्या, तसंच हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे यांच्या अतिरेक्यांद्वारा हत्येनंतर त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट विषयीच्या चौकशीला मिळालेलं असं बेजबाबदार उत्तरही वाचनात आलं.

--चुकवू नये अशी मैफल--

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 25/11/2009 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित उदय भवाळकर (धृपद गायन) आणि उस्ताद बहाउद्दीन डागर (रुद्र्वीणा) यांची जुगलबंदी दि. ६ डिसेम्बर २००९ रोजी सकाळी ९ वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे देणगी प्रवेशिका पुढील आठवड्यात उपलब्ध होतील.

मी कोण?

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 24/11/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी जेव्हा मला विचारलं आपण कोण! तेव्हा माझ्या मनी प्रथम उत्तर आलं या अफाट विश्वातला एक छटाक माणुस मी! पण मनातलं उत्तर ओठांवर येण्याआधीच कानी आला ओरडा देशद्रोही, भारत माता की जय, जयहिंद! अन तेव्हा मी म्हणलं मी एक भारतीय हेच बरोबर उत्तर असेल बहुतेक! तेव्हढ्यात कुणीतरी चिरकलं काफीर, दार-उल-हर्ब, गर्व से कहो हम हिंदु है! तेव्हा मी विचार केला मी हिंदु असंच सांगण योग्य! पण तेव्हढ्यात कानी आला गलका घाटी, भांडी घासा आमची, घास रे रामा, जय महाराष्ट्र! मग मनी म्हणलं आहेच मी मराठी तर गरजेन जय महाराष्ट्र! तोवर कुजबुज सुरु झाली सवर्ण, दलीत, बामण, ९६ कुळी! मग मला आठवली जातीकरता खावी माती ही उक्ती!

राजे पुन्हा जन्माला या

लेखक रविंद्र गायकवाड यांनी मंगळवार, 24/11/2009 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
काय योगायोग पहा मागच्य २ दिवसात १०-१२ गाड्यांवर लिहिलेले वाचले "राजे पुन्हा जन्माला या." पहिल्या २-३ वेळा वाचले तेव्हा जास्त लक्ष दिले नाही म्हटले चला आपल्यासारखे अनेक शिवभक्त आहेत. पुन्हा २-३ वेळा वाचले तेव्हा मन शेखचिल्ली सारखे रम्य स्वप्नात रमून गेले..... अह्हाहा शिवचरित्रात वाचलेले चित्र डोळ्या समोर उभे राहिले. स्वराज्याचा प्रत्येक नागरिक राजनिष्ट आणि देशभक्त. आया बहीनी सुरक्षीत असतिल त्यांची छेड काढणार~यांचे हात कलम केले जातिल. प्रत्येक जण सकाळी देवपुजाकरताणा राजाच्या दिर्घायुष्याची प्रार्थणा करत असेल. राजांच्या एका हाकेवर देशभारातला सगळा तरून जीव द्यायला तयार होईल.

तू तर माझी बायको, शारदा.....

लेखक भानस यांनी मंगळवार, 24/11/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या बागेत-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच ज्येष्ठ नागरिक एका गोल टेबलाभोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे तरणतलावामध्ये थोडावेळ व्यायाम करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स तरंगत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते.

काहि नाटके व आठवणी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 23/11/2009 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
काहि नाटके व आठवणी.. आचार्य.....नावांचे नाटक आचार्य अत्रे यांच्या विरोधात लिहिले गेले आहे अशी कुणकुण लागली होति..नक्कि आठवत नाहि पण पहिला हिंवा दुसराच प्रयोग असेल..भरत नाट्य मंदिरला प्रयोग होता..

प्रिझनर्स डिलेमा

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 23/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू. "प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात.

`एकच' तारा समोर आणिक...

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 21/11/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
meteor "सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्‍वात उलथापालथ होण्याचा प्रश्‍नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले.