Skip to main content

प्रकटन

फॉर हिअर ऑर टू गो!!.. पुस्तक परिक्षण

लेखक प्राजु यांनी बुधवार, 04/11/2009 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ॉर हिअर ऑर टू गो!! जनरली कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये ,खास करून अमेरिकेतल्या बर्गर किंग, वेंडीज, फ़्रेंडलिज अशा उपहार गृहातून हा प्रश्न विचारला जातो. अर्थ साधाच, "इथेच खाणार की घेऊन जाणार?" पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?" मिलिंद प्रधान यांनी हे पुस्तक मला पाठवून दिलं आणि झपाटल्यासारखं मी ते वाचून काढलं. लेखिका अपर्णा वेलणकर. बृहन्महाराष्ट्र मंडळानं या पुस्तकाचा प्रकल्प आयोजित केला. काय कारण असावं?

गाडी रूळावरून सांधे बदलून जाते तेंव्हा..

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 04/11/2009 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरचा लतादीदींवरचा लेख वाचल्यानंतर डोक्यात घुसलेलं 'जो वादा किया वो' आज सकाळी गुणगुणत होतो (बाथरूम मध्ये, दुसरीकडे कुठे आमची हिंमत असायला), आवरून बाहेर गाडीकडे जात असतांना गाण्याच्या शब्दांचं शिटीत रूपांतर झालेलं. गाडी सुरू केली आणि मग पुन्हा (काचा बंद आहेत हे subconsciously लक्षात येऊन!) शिटीवरून पुन्हा शाब्दिक गाण्यावर. फ्रीवेवर गेल्यावर लक्षात आलं की आपण भलतंच गाणं गातोय आता ... 'ये दिल और उनकी निगाहोंके साये...' च्या मारी! हे गाणं कुठून आलं?

यम धर्म

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 03/11/2009 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काळा मिट्ट अंधार. अजुनही दहा मिनिटे होती तासिका संपायला. (आजकाल तास म्हणत नाहीत) विज कधी येणार ते माहीत नव्हते. मुले अंधारात कशी काय अभ्यास करतात कुणास ठाउक.? समोर बसलेला मास्तर तरणा होता. चेहेरा तरारलेला. मास्तरकीची चमक स्पष्ट दिसत होती. नेहेमीच्या विझलेल्या डोळ्यानी यंत्रवत काम करणार्‍या शिक्षकापेक्षा वेगळा. शाळा गोलमेज परिषदेच्या काळातली. अजुनही तशीच. १२ फुटावर छत. पत्र्याचे मोडके पंखे तुटकी बाके. माझ्या खुर्चीतल्या ढेकणाची चंगळ चालली होती. शाळेच्या कंपाउंड ला लागुन १७ माळ्याची टॉलेजंग इमारत दिसत होती. ही कुठली आपटे बुद्रुक गावातली शाळा नव्हती. अगदी मुंबईच्या १२००० स्क्वेअर फुट दराच्या उपन

शिवाम्बूचिकित्सा मित्र मंडळ

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 02/11/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
(हे लेखन संपूर्णपणे काल्पनिक आहे)
शिवाम्बूचिकित्सा मित्रमंडळ ( पुरुषांसाठी ) वार्षिक सभा आणि नूतन सभासद नोदणीचा कार्यक्रम
सदाशिव पेठेतल्या रा.ब. कुमठेकर मार्गावरच्या जुन्या वाड्याच्या भिंतीवरची हि पाटी पाहून मला फार आनंद झाला. "चला .. संस्थेबद्दलची उत्सुकता आता फार काळ ताणली जाणार नाही " असे मनातल्या मनात म्हणत मी पाटी परत एकदा वाचून बघितली. खाली सभेची तारीख आणि वेळ ठळकपणे लिहिलेली होती.

आगे नारी - एक कोंकणी लोकगीत

लेखक धनंजय यांनी सोमवार, 02/11/2009 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यातली "ख्रिस्ती लोकगीते" गोव्याबाहेर फारशी परिचयाची नाहीत. त्यांच्यावर पाश्चिमात्य संगीताची छाप आहे, पण मूळ ती एतद्देशीय आहेत. गोव्यातील पाककलेसारखेच हे घरोघरच्या, गावोगावच्या कलाकारांना स्फुरलेले रम्य मिश्रण आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या ख्रिस्ती लोकगीतांचा एक खजिना मला आंतरजालावरती मिळाला. वेगवेगळ्या लोकांनी केलेली संकलने सुरावटीसकट स्कॅन करून या स्थळावर चढवलेली आहेत. एक सुखद आश्चर्य म्हणजे त्यातले एक संकलन (ख्रिस्तवासी) पाद्री लूर्दीन्य बार्रेतो यांनी केलेले होते - हे नाव माझ्या ओळखीचे होते.

आवाजातला गोडवा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 01/11/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
वयोमानापरत्वे दीदींच्या आवाजातला गोडवा कमी झालाय असं अनेक विद्वानांचं मत आहे. हैदराबादमध्ये काही वर्षांपूर्वी लतादीदींचा कार्यक्रम झाला होता, त्यानंतर दीदींचा लाईव्ह कार्यक्रम झाल्याचं ऐकिवात नाही. आवाजातला नाजुकपणा पूर्वीपेक्षा कमी झाला असला, तरी गोडवा अजूनही तितकाच कायम होता असं त्या कार्यक्रमातली गाणी ऐकल्यावर लक्ष्यात येतं. दीदींच्या आवाजाच्या गोडव्याबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही.

..

लेखक प्रियाली यांनी रविवार, 01/11/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
..

..

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 31/10/2009 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
..

१. भारतीयांचा "संघ". २. अतिस्वतंत्रता

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 31/10/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
खालील दोन घटना एकमेकांशी घट्ट बांधलेल्या नसतीलही पण कळत-नकळत आपण इतरांबाबत कशी मते बनवतो त्याची ही उदाहरणे आहेत. भारतीयांना सांघिक कामे येत नाहीत अशी सर्व-साधारण समजूत अनेक युरोपी राष्ट्रांतील लोकांची आहे. अमेरीकेतील लोक जितक्या उघडपणे युरोपी लोक बोलतात तितके उघडपणे बोलून दाखवत नसावेत. माझ्याबरोबर काम करणाऱ्या दोन ब्रिटीश लोकांनी मला हे दोन-तीन वेळा सांगितले होते की, भारतीयांबद्दल तिकडे असे बोलले जाते. माझा त्यावर विश्वास नव्हता. पण पुढे नमुद केलेली घटनाच माझे मत बदलायला पुरेशी होती. अर्थात मी त्या मताशी सहमत आहे असे मुळीच मानू नका.