Skip to main content

प्रकटन

सट्टाबाजार

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/06/2009 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
`साहेब, हा कॉम्प्युटर सट्टा बंद करून टाकला पाहिजे... महागाई बरोबर कमी होते की नाही बघा...' निवडणुकीवरून महागाईवर आलेल्या विषयावर बोलताना तो ताडकन म्हणाला आणि माझे डोळे विस्फारले. `कॉम्प्युटर सट्टा?' मला कळलं नव्हतं. मी तोच प्रश्‍न त्याला केला आणि माझ्याकडे न पाहता तो बोलू लागला. `ते पैसेवाले लोक धान्य, धातूंच्या भावावर सट्टा खेळतात. गरिबांना लुटून नफा कमावतात. खिशातला पैसाही इकडचा तिकडे न करता त्यांना लाखो रुपयांचा नफा होतो आणि आमच्यासारख्या हातावरचं पोट असलेल्या लोकांचा जीव जातो.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 12/06/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आधीचे भाग येथे वाचा भाग एक - http://misalpav.com/node/८१२७ भाग दोन - http://misalpav.com/node/8138 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.

बेरीज

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 12/06/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
खरे म्हट्ले तर माझे काम झाले होते. कसे झाले कुणामुळे झाले हे पण माहीत नव्हते. निघता निघता विचार आला चला आणखी काही बेरीज होते का? माझी मोठी बहीण तशी शेठाणी. भावोजींचा मोठा प्रेस होता प्रभादेवीला. मार्मिक च्या बाजुला. दसर्‍याच्या पुजेला ह्या प्रेस वर जाणे ही एक पर्वणीच असायची. पुजा झाल्यानंतर भावोजी पाकीटातुन रुपये १०१ चा बोनस देत असत. सत्तरीत १०१ रक्कम फार मोठी होती. अशाच एका पुजेला गेलो होतो. ताई आणि आई च्या गप्पा सुरु झाल्या होत्या. ताई तशी फार कनवाळू. आईला तीने कुणाला तरी मदत कशी केली ह्या बाबत बोलत होती. ताईचे बोलुन संपल्यावर आई म्हणाली,'"हे बघ , आपण कधीच कुणाला मदत करु शकत नाही.

मी सखाराम गटणे

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 12/06/2009 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
[हा लेख साधारण दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. काही मित्रांच्या सूचनेवरून आजच्या दिवशी येथे पुन्हा देतो आहे. मिपाच्या धोरणात हा लेख, आता किंवा यापुढे बसत नसल्यास अप्रकाशित केला तरी काही हरकत नाही.] "मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणार्‍या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षर्‍या गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला. अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 11/06/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचा http://misalpav.com/node/8127 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.

मथुरानगरपती

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 11/06/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
हे कृष्णार्पण इथे! मथुरानगरपतीनं लावलेलं वेड इतकं जबरदस्त आहे, की कधी नव्हे तो काव्याचा काव्यात स्वैर भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय. जमलाय की नाही, ते त्या मथुरानगरपतीलाच माहीत!

एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 10/06/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आमच्या आळीतल्या भोंड्यांचा पम्या म्हणजे लय भारी बेणं! तसे घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण त्यांच्यात पम्या म्हणजे एकदम भांगेत तुळस! ड्ब्बल जाड काचेचा चश्मा लावणारा, पम्याचा फादर मुन्शीपाल्टीत संडास (सॉरी शॅनिट्री) इंस्पेक्टर असला तरी आपल्याला रिस्पेक देतो.

पाहिली मी पंढरी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 10/06/2009 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
अमृताची चंद्रभागा झुळझुळे या अंतरी याचि देही याचि डोळा पाहिली मी पंढरी मीपणाचे कवच गळले निर्गुणाच्या दर्शने ते अलौकिक रूप पाहून तृप्त झाली लोचने नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी माळ तुळशीची गळा, कासे पितांबर, कर कटी भाळि कस्तुरिटिळक, कानी मकरकुंडल शोभती स्वर्ग भीमेच्या तिरी, वैकुंठ शोभे भूवरी भान हरपे आणि होई मूक वाचा बोलकी चरणि माथा ठेविता हा जन्म होई सार्थकी आज प्राणांतून घुमली सावळ्याची पावरी

पाऊस ओला..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 10/06/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
सतरंगी रथात बसून आला पाऊस ओला.. पाऊस ओला.. हिरवाई भारली सृष्टीच्या रंगात शुभ्रसा निर्झर धरणीच्या भांगात धुक्याचा कापूस पिंजून गेला.. पाऊस ओला .. पाऊस ओला.. गर्जत मेघांचे तुषार सांडले तृणांवर मोत्यांनी डावही मांडले मेघांनी झाकला नभाचा टीळा.. पाऊस ओला.. पाऊस ओला.. झाडांच्या हातांत वेलींचा चुडा ओसंडून वाहतो मेघांचा घडा शृंगार हिरवा ऋतू ल्यायला.. पाऊस ओला.. पाऊस ओला.. निळ्याशा थेंबात आभाळ दाटे मातीच्या हृदयांत दरवळ भेटे अल्लड अवखळ सरींचा मेळा.. पाऊस ओला.. पाऊस ओला.. ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर हृदयांत शिरशिरी शिंपून गेला.. पाऊस ओला.. पाऊस ओला.. - प्राजु
Taxonomy upgrade extras

“शूप”, “शूप”, “शूप” ....

लेखक निखिलचं शाईपेन यांनी बुधवार, 10/06/2009 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
“और क्या ?” “आरे आणि ठिक, सॉफ्टवेअर जीव मी लेका, एक विकऎन्ड ते नेक्स्ट” “नाही रे तरीपण? वाचतोयस का काही?” “पेपर, ब्लॉग्स, बाकी विशेष नाही.” “फॉऊंटन हेड वाच खरं तर आतापर्यंत दहादा वाचलयं मी” “हम्म्म्म्म, बघतो शनिवारी आणतो, क्रॉसवर्ड मधून” “हो फॉऊंटन हेड, बाय आयन रॅंड, चल रे ठेवतो,स्क्रीन सेव्हर आला असेल एव्हाना, बॉस घिरट्या घालतोय आज” “अछा, चल, बाय” “हो, वाच पण” “नक्की” आयचा घो, ह्या आयन रॅंड च्या. पुस्तक आहे का डिक्शनरी ची जाहिरात? निरक्षर आहे कि काय मी अस्सं दिवसभरात पाच एक वेळा वाटून गेलं. डोकं फुटायच्या आत पुस्तक गादिखाली घुसवून मी पळायला निघालो...