Skip to main content

प्रकटन

शिवसेनेचा निलाजरेपणा

लेखक टायगर यांनी शुक्रवार, 05/06/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे.

करुणा कर

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 05/06/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
सांब सदाशिव शंकर | नीलकंठ गौरीहर हे उमापती महेश | भूतनाथ गिरिजावर करि धारी त्रिशुल डमरु | हे नटवर शशिशेखर अंगि चिताभस्म लेप | सर्पमाळ व्याघ्रांबर मदन दग्ध करिसी तूच | हे त्रिनेत्र नंदीश्वर रौद्र तुझे तांडव ते | भीषण अन् प्रलयंकर शंभो कैलासनाथ | भालचंद्र गंगाधर तूच सत्य, शिव, सुंदर | करुणाकर, करुणा कर

शिवसेना पुन्हा उभी राहील?

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 05/06/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आमचे स्नेही तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा सभासद होतांना मला आनंद होत आहे. ह्या संकेतस्थळाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! सुधीर काळे, जकार्ता. शिवसेना पुन्हा उभी राहील? (पूर्वप्रसिद्धी - http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh…) मी एक सामान्य माणूस आहे. मी कुणी "शिवसैनिक' नाही; पण बाळासाहेबांबद्दल खूप आदर असलेला व शिवसेनेला मनोमन मानणारा असा एक मराठी माणूस आहे.

नवा सेवादाता

लेखक सरपंच यांनी शुक्रवार, 05/06/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या. नवीन जागेवर आल्याने आता इतर छोटे मोठे बदल करता येतील. त्याबाबत सूचना सुध्दा येथे देता येतील. सध्या मिसळपाव.कॉम हे मिसळपाव.इन या पत्त्यावर चालू आहे. लवकरच मिसळपाव.कॉम उघडले असता येथे येता येईल. सर्व सदस्यांना अशी नम्र विनंती आहे की मिसळपाव.कॉम हे नाव पुर्ववत सुरू झाले की केवळ मिसळपाव.कॉमचाच वापर येथे येण्यासाठी आणि येण्याची नोंद करण्यासाठी करावा. मिसळपाव.इन हे काही खास कामांसाठीच वापरल्या जाईल.

नवा सेवादाता

लेखक सुबक ठेंगणी यांनी गुरुवार, 04/06/2009 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या. नवीन जागेवर आल्याने आता इतर छोटे मोठे बदल करता येतील. त्याबाबत सूचना सुध्दा येथे देता येतील. सध्या मिसळपाव.कॉम हे मिसळपाव.इन या पत्त्यावर चालू आहे. लवकरच मिसळपाव.कॉम उघडले असता येथे येता येईल. सर्व सदस्यांना अशी नम्र विनंती आहे की मिसळपाव.कॉम हे नाव पुर्ववत सुरू झाले की केवळ मिसळपाव.कॉमचाच वापर येथे येण्यासाठी आणि येण्याची नोंद करण्यासाठी करावा. मिसळपाव.इन हे काही खास कामांसाठीच वापरल्या जाईल.

नवा सेवादाता

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 04/06/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या. नवीन जागेवर आल्याने आता इतर छोटे मोठे बदल करता येतील. त्याबाबत सूचना सुध्दा येथे देता येतील. सध्या मिसळपाव.कॉम हे मिसळपाव.इन या पत्त्यावर चालू आहे. लवकरच मिसळपाव.कॉम उघडले असता येथे येता येईल. सर्व सदस्यांना अशी नम्र विनंती आहे की मिसळपाव.कॉम हे नाव पुर्ववत सुरू झाले की केवळ मिसळपाव.कॉमचाच वापर येथे येण्यासाठी आणि येण्याची नोंद करण्यासाठी करावा. मिसळपाव.इन हे काही खास कामांसाठीच वापरल्या जाईल. जसं आज मिसळपाव.कॉम चे बदल होई पर्यंत त्याचा वापर केला जातोय.
Taxonomy upgrade extras

नवा सेवादाता

लेखक लवंगीमिरची यांनी गुरुवार, 04/06/2009 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या. नवीन जागेवर आल्याने आता इतर छोटे मोठे बदल करता येतील. त्याबाबत सूचना सुध्दा येथे देता येतील. सध्या मिसळपाव.कॉम हे मिसळपाव.इन या पत्त्यावर चालू आहे. लवकरच मिसळपाव.कॉम उघडले असता येथे येता येईल. सर्व सदस्यांना अशी नम्र विनंती आहे की मिसळपाव.कॉम हे नाव पुर्ववत सुरू झाले की केवळ मिसळपाव.कॉमचाच वापर येथे येण्यासाठी आणि येण्याची नोंद करण्यासाठी करावा. मिसळपाव.इन हे काही खास कामांसाठीच वापरल्या जाईल. जसं आज मिसळपाव.कॉम चे बदल होई पर्यंत त्याचा वापर केला जातोय.
Taxonomy upgrade extras

शंखतीर्थ!!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 03/06/2009 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण येता, निळा डोह फ़ेसाळतो पापण्याच्या तीरावर, भरतीचा पूर येतो.. क्षण निसटले जणू, मूठीतून जावी रेती शिंपलीत नयनांच्या, भिजूनिया गेला मोती गाज हृदयाची खोल, स्पंदनात तुझी सय विरहाच्या लाटा उंच, वादळाचे मला भय तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त अस्ताचलास रे गेला, माझ्या आकांक्षेचा रवी धूसरला चंद्र माझा, काळोखास बोल लावी दूर दूर क्षितिजाला, भेटण्याची आस व्यर्थ आठवांस अर्पिते मी, आसवांचे शंख तीर्थ - प्राजु
Taxonomy upgrade extras

नारायणगावचा थरार!!!

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 02/06/2009 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे.