Skip to main content

प्रकटन

व्हॅलेंटाईनच्या निमीत्ताने

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 12/02/2009 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने तूला काही सांगाव म्हणतोय जून्या आठवणीतले जूनेच डाव तूझ्याशी मांडावे म्हणतोय आइनस्टाइनचे सिद्धांत आणि ऍरीस्टोटल ची गणित मला जमलीच नाहीत तशी ऐन वसंतात साद घालणारी 'तू' मला कधी कळलीच नाहीस आता तूझ्यातल्या ' तू' ला आणि माझ्यातला ' मी' ला जरा पावसात न्याव म्हणतोय द्वैताची भावना विरे पर्यंत चिंब चंब भिजवाव म्हणतोय. तन भिजेल पण मन मात्र कोरडच राहील कारण माझ्यातल्या 'मी' ला तुझ्यातली 'तू' कधी जाणवलीच नाहीस. आता व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने आकाशातल्या बापाकडे एक गार्‍हाण घालाव म्हणतोय पूढल्या व्हॅलेंटाइन पर्यंत, न जमलच तर निदान पूढल्या पावसापर्यंत तरी ... माझ्यातल्या 'तू
Taxonomy upgrade extras

पाकिस्तानचा "बुरखा' फाटला

लेखक अन्वय यांनी गुरुवार, 12/02/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजला नाही, या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंधच नाही, असे तुणतणे वाजविणाऱ्या पाकिस्तानने अखेर या हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजल्याचे मान्य केले. वारंवार खोटे बोलणाऱ्या पाकिस्तानचा खरा (काळा) चेहरा तेथील सरकारने आज स्वत:च जगासमोर उघड केला आहे. मात्र, देशविहीन शक्तींचे (नॉन स्टेट ऍक्‍टर) हे कारस्थान असून, त्यांनी स्वत:चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे कृत्य केल्याची सारवासारव पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांनी केली आहे. तसेच रशिया, इटली, स्पेन आणि अमेरिका हे देशही मुंबई हल्ल्याशी संबंधित असून, या देशांतही कटाचा काही भाग शिजला आहे.

बेंबट्या आणि बेंबटी

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 12/02/2009 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
बेंबटे राव कोचवर हातात विडिओ गेम चा रीमोट घेउन मग्न आहेत. इतक्यात सौ. बेंबटी हातात झारा, लाटणे , मोठा डाव किंवा तत्सम प्राणघातक वस्तु घेउन अचानक बेंबटेरावासमोर उभ्या राहतात. सौ.बेंबटी: बोल माझ्याकडे ..... श्री. बेंबट्या: आता नाही हां...... सौ. बेंबटी: कसल गाणे गुणगुणत होतास काल? श्री बेंबट्या: कसले गाणे? सौ. बेंबटी: काल नाही का संध्याकाळी शेजारणी कडे बघुन म्हणत होतास ते गाणे. श्री. बेंबट्या: "प्यार हुवा" सौ. बेंबटी : हां तेच. आत्ताच्या आता मला बघुन ते गाणे म्हण. नाहीतर तुझा 'गेम ओवर'. (प्राणघातक वस्तुला दाखवत) श्री. बेंबट्या: ठीक आहे. म्हणतो.

ठेवणीतले आवाज ..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/02/2009 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आवाज हा शद्ब इतक्या अर्थी आपण वापरतो की आपल्यालाच त्याची कल्पना येत नाही. साधारणपणे "त्याचा आवाज चांगला आहे" असं कोणी म्हंटलं तर नक्कि तो चांगला गात असावा असंच वाटतं. आवाजात चढउतार सुरेख आहेत असं कोणी म्हंटलं तर नक्की समजतं की, निवेदकाचा / नाटककाराचा/ नटाचा आवाज आहे . चिरका आहे आवाज असं म्हंटलं तर समजतं की, कानाला त्रास होणारा किंवा पिचत जाणारा आवाज आहे. खणखणीत आहे आवाज .. असं म्हंटलं की समजतं की नक्की एखाद्या वक्त्याचा, पुढार्‍याचा आवाज आहे. जर म्हंटलं की, मंजुळ आहे आवाज तर फक्त आणि फक्त समोर एखादी नाजूकशी मुलगी येते. कोणा मुलाचा आवाज मंजुळ असल्याचा ऐकिवात नाही.

"कुठे काय" विषयी थोडेसे...

लेखक वाचक यांनी बुधवार, 11/02/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार (ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.) मी मराठीतली काही प्रमुख संकेतस्थळे नेहेमी वाचतो. अर्थात प्रत्येक वेळी सर्वच मजकूर वाचायला जमतो असे नाही. पण गेल्या काही महिन्यांमधे मी वैयक्तिकरीत्या जास्त कार्यमग्न झालो आणि त्याचप्रमाणे संकेतस्थळांवर होणार्‍या लिखाणाची वारंवारिताही वाढलेली दिसली. बराच चांगला मजकूर वाचायचा राहून जाउ लागला आणि प्रत्येक वेळी सगळीच्या सगळी स्थळे बघणे अवघड होउन बसले.

कधी येशील कोंदणी??... (खास व्हॅलेंटाईन डे साठी)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 11/02/2009 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरंना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! सर्व प्रेमिकांना त्यांचे प्रेम मिळो.. सर्व मित्र-मैत्रीणींमधील त्यांचे मैत्रीचे नाते अधिक दृढ होवो आणि सगळ्याच नात्यांची वीण खूप घट्ट होवो.. ही सेंट व्हॅलेंटाईन च्या चरणी प्रार्थना! :) कधी येशील कोंदणी??...
Taxonomy upgrade extras

दुवा

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 11/02/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज अखेर तुझ्या न माझ्यातला अखेरचा दुवा पण निखळला. ते तोंडपाठ असलेले दहा आकडे. गायत्री मंत्रापेक्षा जास्त वेळा म्हटलेले. सकाळी एकमेकांना कॉल करुन उठवण्यापासुन ते गुड नाईटच्या एसेमेस पर्यंतचे तसेच रोजच्या सप्तरंगी प्रवासाचे सोबती ते दहा आकडे .. आज निखळले. एकतर्फी संपर्काचा शेवटचा पुल पण ढासळला. हे तुला पुन्हा गमावण्याइतकेच त्रासदायक, उखडुन टाकणारे. नवा नंबर तुला कळवावा की नाही या विचारातच मला डोळा लागावा अन मी येउन पोहचावा स्वप्नांच्या धुसर निळसर आभासी जगात ! आता एरवी मला अप्राप्य अशी तु अगदी हाताच्या अंतरावर येउन पोहचावी. तुझ्या हातात असावी एक सुरेख शुभ्र हस्तिदंती लहानशी पेटी.

आनंद शोधतांना..!

लेखक राघव यांनी मंगळवार, 10/02/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
वैराण वाळवंटी जीवदेठ शांतवेना.. तृष्णेस बंध नुरले, ढग आटले नभीचे! आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा.. तुझिया कुशीत सारे भय लोपते मनीचे.. येथेच ठाव घेई, ते शब्दब्रह्म, "आई" तुजलाच अर्पितो मी भवदु:ख मम उरीचे.. आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी? मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे.. आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो! भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!! काही दिवसांपासून श्रीविठ्ठलाची मूर्ती सतत डोळयांपुढे येत होती. कुठे फोटो दिसेल, कुठे एखादा अभंग ऐकू येईल, कुणी वारकरी भेटेल.. एक ना दोन..! त्यातून स्फुरलेल्या या ओळी.
Taxonomy upgrade extras