Skip to main content

प्रकटन

-२३००० ते +२००९

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 02/02/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी नशिब चांगले असते. लोकल मधे चक्क खिडकीची जागा मिळते. सकाळी साडेसात वाजता दादरच्या एका शाळेत जायचे होते. बसल्या बसल्या डूलकी लागली. गाडी सुरु कधी झाली ते कळालेच नाही. Nowadays there is a decline in moral degradation. हे वाक्य कानावर आले आणि खड्बडुन जागा झालो. च्या मारी गाडी मंगलोर ला पोचली की काय असा दाट संशय आला. बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता. मला अचानक जागा झालेला बघुन त्याने म्हटले,"सॉरी हं" तुमची झोपमोड केली. मी गप्प राहीलो. "पण मी म्हणतो ते खरे आहे की नाही". आणखी एक शीटी . आता मात्र राहवेना.

तुला हसताना पाहिलं की.......

लेखक अनंतसागर यांनी शनिवार, 31/01/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुला हसताना पाहिलं की वठलेल्या झाडाला पालवई फुटते आणि वर्षभर कोरडी असणारी नदी दुथडी भरुन वाहू लागते तुला हसताना पाहिलं की भर ग्रिष्मात वसंत अवतरतो पावसाची चाहूल लागण्या आधीच मोर पिसारा फुलवून नाचतो तुला हसताना पाहिलं की त्या मेघालाही पाझर फुटतो इंद्रधनू तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो तुला हसताना पाहिलं की फुलं हसू लागतात सर्व पक्षी जणू तुझ्यासाठीच गाणे गातात तुला हसताना पाहिलं की तो चंद्र तुझ्या रुपावर जळू लागतो आणि मी मात्र तुझ्या प्रेमात चिंब होऊन भिजून जातो.
Taxonomy upgrade extras

आपल्याला पटते का?-२

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 31/01/2009 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज जग २१ व्या शतकात आहे? :O आपण अधोगती केली :> नवे विचार बदलले पाहिजेत हे मान्य :W पण आज काही लोक एकच आयडी घेऊन वेगवेगळ्या संकेतस्थळावर वावरतात हे पटत नाही. ~X( अनेकआयडीव्रत ती फॅशन नसून त्याला काही महत्व आहे. :B आजच्या तरुण पिढीने आयडी बनवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण पतन केले पाहिजे L) आपण अंतरजालीय आहोत आणि प्रत्येकानेच दशावतारी नाटक करणे गरजेचे आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) (अधोगत)केशवसुमार :P

कुणी घर सांगता का घर?

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 30/01/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भांडारकर रस्त्यावरच्या रणजित हॉटेलला जायचं होतं. तसा कार्यक्रमांनिमित्त अनेकदा गेलो असेन तिथे. पण अजूनही ते प्रभात रोडला, की भांडारकर रोडला, हे अजून आठवत नाही. ते शोधताना आधी प्रभात रोड, मग भांडारकर, असे करत राहिलो. अखेर कार्यक्रम संपल्यानंतर पोचलो. तसा कार्यक्रम बुडवून फार काही नुकसान नव्हते, पण केवळ माझ्या वेंधळेपणामुळे तो बुडाला, हे महत्त्वाचे. :S पत्ते शोधण्याची आणि लक्षात ठेवण्याची आमची ही नेहमीची बोंब! पुण्यात आता बारा वर्षे होतील, पण अजूनही लोखंडे तालमीपासून भरत नाट्य मंदिराला कसे जायचे, हे पक्के नाही सांगता येणार मला!

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 29/01/2009 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.

उन्मुक्त

लेखक जयवी यांनी गुरुवार, 29/01/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
देहफुले उमलवून मुक्त तू उन्मुक्त तू तुफानी प्रीत सरी उधळूनी रिक्त तू झेलूनी तुझा प्रपात नखशिखान्त नाहते प्रणयाचा मी मरंद मनमुराद चाखते दाहक कोसळ तुझा उतरतो नसानसात मदहोशी पसरते गात्रातून अंतरात वितळते मिठीत मुग्ध बेहोषी धुंद धुंद उन्मेषी श्वासांची लयकारी मंद मंद जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपितले-पडदा पडताना

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 28/01/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
पडदा पडताना !
पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते.

आताही प्रेम तसेच आहे का?

लेखक धनंजय यांनी बुधवार, 28/01/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आताही प्रेम तसेच आहे का? ********** नवे होते प्रेम जे वर्षांपूर्वी काही सांग आहे आताही ते तसेच का? भेटतो रोजच तुला सकाळ-संध्याकाळी काळीज प्रत्येकवेळी धडधडते का? सदाचा तोच तंटा भांडून झाल्यावरती होतो खालीवरती जीव तसाच का? तुझ्यासाठी झुरत नाही पूर्वीसारखा तरी नाही पारखा प्रेमाला मी आहे माझी खात्री असशील माझ्यासाठी घट्ट होतात गाठी ओढल्या तरी ********** (वाचलेल्या कवितेचा एम् पी ३ दुवा)
Taxonomy upgrade extras

वर्षपूर्ती

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 28/01/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'च्या चरणाशी आल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ मिपानं, मिपाकरांनी, संपादकांनी आणि मुख्य म्हणजे तात्यांनी या पामराला सहन केल्याबद्दल हार्दिक आभार! :D परवाच खरडवहीतून नंदनने वर्षपूर्तीच्या (आगाऊ) शुभेच्छा दिल्या, तेव्हा माझ्याही ते लक्षात आलं. नाहीतर अशी वर्षंबिर्षं लक्षात ठेवणं, अवघडच जातं. हल्ली तिशी उलटल्यानंतर तर स्वतःचा वाढदिवसही लक्षात राहू नये, असंच वाटतं मला! :$ तर ते असो. 28 जानेवारी 2008 ला पहिला लेख टाकला इथे. त्याआधी सहा-सात महिने ब्लॉगवर लिहीत होतो. तिथेही मजा येत होती.

वाविप्र

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 27/01/2009 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. अगदी मिपावर सुद्धा. अर्थात व्यंनि मधुन. आजपण विचारला गेला. मी उतरे दिली. गेल्या ३० वर्षात ही उत्तरे मी तरी बदललेली नाहीत. प्रश्नकर्त्याने ही उत्तरे लेख लिहुन 'कर्तव्य आहे' सदस्यांचा गोंधळ दुर करावा अशी कळकळीची आणि 'कळीची' विनंती केली म्हणुन हा प्रपंच. ह्या काही उत्तराबद्दल वाद होण्याची शक्यता आहे ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे. Different strokes for different folks according to frame of reference. प्रश्नः संतती नियमनाची चांगली साधने कोणती?