Skip to main content

प्रकटन

एक प्रायोगिक कविता

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/07/2008 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली. हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते. आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय.
Taxonomy upgrade extras

खेळी.

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 15/07/2008 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
खेळी. पळत होते मी........ नियती चकवत होती. तेजाळ कवडसे!! कधीच हाती न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही पळायचे, पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ, आणि थांबले. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखी. : : : खुप उशिरा कळलं, ती ही तिचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== स्वाती फडणीस......................१९-०१-२००८
Taxonomy upgrade extras

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

पांडेकर आजी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 15/07/2008 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या. "वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै.

'नवी मुंबई' दर्शन

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 14/07/2008 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नवी मुंबई दर्शन - आधुनिक शतकातील सुनियोजीत शहर म्हणुन उदयास येत असलेली 'नवी मुंबई '. जुन्या मुंबईतील अनेक प्रेक्षणीय ठिकानांना आपण नेहमीच भेट देतो. मात्र नवी मुंबईतील ठिकाणे आपल्याला फारशी माहित नाहीत. यातील काही ठिकाणांची चित्रमय माहिती. ------------------------------------------------------------------------ मुंबईहुन नवी मुंबईत यायचे झाल्यास सायन - पनवेल महामार्गावरुन , मानखुर्द नंतर येणारा खाडी पुल ओलांडुन आपण नवी मुंबईच्या आर्थिक राजधानी 'वाशीत' प्रवेश करतो ( तस मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन ही नवी मुंबईत येता येते.

बदल तर घडतोय...

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 14/07/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
टीक-टॉक टीक-टॉक टीक-टॉक ठांग! लोलक, जागच्या जागी फिरतोय! लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट लेफ्ट-राइट ठक्काक! मानव, जागच्या जागीच चालतोय! ठांग!. ठांग!!.. ठांग!!!... तरी ..बदल तर घडतोय... मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं! अखंड, अविरत... अथक!! बदल तर घडतोच आहे... क्षणा क्षणाला..कणा कणाने, वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे! क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने, वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे! एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे, दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे! एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे... पुढे.. मागे.. जिथल्या तिथे! जिथल्या तिथे.. मागे..

`यू टर्न'

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/07/2008 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी `समाधानाची चव' चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतरही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय... समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार असतील. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो..

स्वतावर

लेखक दीप्या यांनी रविवार, 13/07/2008 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
दीप्या जमले तर आयुष्यात एक काम कर पन्गतीत आन्धळ्यांच्या तु वाढीत जा नजर
Taxonomy upgrade extras

चौथी सीट

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 12/07/2008 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
चौथी सीट . नकोच ती सीट चौथी, हट जाऊ दे.. दाराशी उभे राहूनी, वारा खाऊ दे! पाठीचा कणा वाकवूनी, तोल साधणे.. सरकेल का कुणी म्हणूनी, वळून पाहणे! पायात पाय गुंतवूनी, आक्रसून राहणे.. अवघडलेल्या हातांनी, आधार शोधणे! नकोच ती डब्यातली, घुसमट..
Taxonomy upgrade extras

(ही पाल तुरुतुरु__)

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 12/07/2008 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
(ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु ) मराठीतील एक प्रसिध्द गाणे ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट सरली या चालीवर खालील रचना --------------------------------- ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु वरच्या खिडकीतुन आत सरली ! की उंचावरच्या कप्प्यात, अडगळीच्या जागेत पालीण सळसळली !! कोळ्यांशी मैत्री जमव ना ! जाळिशी फिल्डिंग लाव ना ! शेपुट वळ वळ कर ना! डासांवरती झडप घाल ना ! मनी खालुन जाता वरं वळुन पाहाता, पाल संकटात सापडली !! उगाच झाडू हाणून ! फवारा हिटचा मारुन ! शेपुट चाचपुन काठीन ! तो
Taxonomy upgrade extras