प्रकटन
काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.
काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध.
लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज.
अनुवाद : उषा तांबे.
प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे.
मूल्य : १९५ रू.
मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी...
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत.
उदारीकरण
उदारीकरणाच्या प्रक्रियेत
मनं उदार दिसत नाहीत
जग आकुंचित झाले मात्र
माणसे उदार भासत नाहीत.
जगाबरोबर दृष्टीही
ह्रस्व फक्त होत आहे
तहानलेल्याला पाजताना
पाण्याचाही व्यापार होत आहे.
पैसा आता देव झालाय
देवही श्रीमंत (?) झालाय
पैशावरील श्रद्धेचाच
वेदनादायक विजय झालाय.
देवळात आता देवाशिवाय
सारे काही मिळते
बडवे आणि पुजाय्रांना
मुजोरीही फळते.
एक सहज कवीता
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्री
कवीता
कविवर्य सुरेश भट यांची ही कवीता
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोण्त्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?
सागती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशाः
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!"
माणसांच्या मध्यराञी हिंडणारा सूर्य मीः
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
राजमुंद्री --एक नयनरम्य ठिकाण
राजमुंद्री--एक नयनरम्य ठिकाण
आपल्या भारतात अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत.त्यातील हे एक आहे.आंध्र प्रदेशात एन्.एच.५ ह्या महामार्गापासून जवळच आहे.गोदावरी नदीच्या कांठावर वसलेले अत्यंत देखणे असे हे गाव.जिल्हा-पूर्व गो दावरीं. नाशिकपासून निघालेल्या गोदावरीचे पात्र येथे इतके भव्य होते की जणू समुद्रच!
जर उपवर मुला॑नी असे केले तर
गेल्या आठवड्यात आम्ही ७/८ मैत्रीणी नी एका मैत्रीणीच्या घरी रात्रीची मैफिल ठरविली होती, मस्त गप्पा टप्पा- खाणे पिणे, पत्याचे खेळ असा मस्त कार्यक्रम आखला होता. ठरल्या प्रमाणे सगळ्या जणी जमलो, आमच्या ग्रुप मध्ये गृहीणी, नोकरी करणार्या आणि काही जणी मुले झाल्यावर मुले लहान असल्या मुळे करिअरला तात्पुरता राम राम ठोकलेल्या अशा सगळ्या जणी आहोत.
लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव
लूज कंट्रोल...
२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..
लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.
या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..
नाटकाचे कथासूत्र...
तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०...
मिसळपाव