Skip to main content

प्रतिभा

थोडे असे, थोडे तसे

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 11/04/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 03/04/2008 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मंडळी, आज मी थोडं तात्विक चित्रविवेचन करणार आहे! खालील चित्रांत मला काही राग दिसले. या चित्रांना आपण 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे' असं म्हणू. आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातली 'राग', ही पूर्णत: भावनांशी निगडीत असलेली संकल्पना आहे. एकच राग प्रत्येकाला तसाच दिसेल असं नव्हे. रागदारी संगीत किंवा एकंदरीतच कुठलीही कला, ही अनुभवायची गोष्ट आहे.

तुरुंग

लेखक गिरीराज यांनी सोमवार, 31/03/2008 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुरुंग जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते मजला ठाऊक त्यांची खोडी कशाकशाची भ्रांत न उरते कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! -गिरीराज
Taxonomy upgrade extras

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 31/03/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

गाण्यांच्या शोधात

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

रविवार विशेष

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.

बाबूराव बागुल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. 'वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास' अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठं नाव. बाबूराव बागुलांचे ' जेव्हा मी जात चोरली होती' हा कथासंग्रह वाचण्यापूर्वी, साहित्य केवळ ललित असते, ते दलित वगैरे नसते आणि साहित्याचे प्रयोजन केवळ मनोरंजन, आनंदच असते. या वाचन परंपरेला या कथासंग्रहाबरोबर नामदेव ढसाळांच्या गोलपीठा वाचल्यानंतर तडा गेला.