Skip to main content

प्रतिभा

गमभन ०८.०२.२० आवृत्ती प्रकाशित..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 24/02/2008 18:27 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

आपल्याला सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव डॉट कॉमच्या अक्षर-सामर्थ्यदात्याने, म्हणजेच गमभन ने आता कात टाकली असून त्याची पुढील आवृत्ती 'गमभन ०८.०२.२०' ही आता प्रकाशित झाली आहे आणि मिसळपावला जोडली गेली आहे!

बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 24/02/2008 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत.

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 24/02/2008 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले. मित्र हो....

शब्देविण संवादिजे...

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 19/02/2008 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
सोंग झोपेचे घेऊन स्वप्न सुंदर पडेना देह-भूमिती जाणून मन-गणित सुटेना पडे पैशाचा पाऊस सूर कोरडा राहिला घाट बांधायाची हौस देव दगड जाहला भरी रांजण स्वार्थाचे घुसे मग तो दिंडीत टाकी रुपये चोरीचे वारकर्‍याच्या झोळीत पापपुण्याचा करावा हिशेब ना कधी कोणी गणिकेच्या गळ्यातून येती गंधर्वाची गाणी डोके चालविण्या आधी भिंत चालवावी लागे हीच ग्यानबाची मेख करी झोपलेल्या जागे शब्देविण संवादिजे असा अधिकार त्यांचा बाकी सार्‍यांनी आणिला आव श्रवणभक्तीचा --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

शीर्षक सुचत नाही - २

लेखक बेसनलाडू यांनी रविवार, 17/02/2008 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

आज़ जाने की जि़द ना करो...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 12/02/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल! फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं!

आम्ही कोण २ (शार्दूलविक्रीडित)

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 11/02/2008 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंतांच्या आम्ही कोण पासून प्रेरणा घेऊन आणि (अर्थातच) केशवसुत,केशवकुमार इत्यादींच्या ओळी चोरून ही चारोळी समर्पित करतो... आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा (कृपया र्‍हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत. चारोळी जरा बरी वाटली, तर आणखीन पुढे विस्तार करावयास हरकत नाही. उत्साह असल्यास कृपया शार्दूल-विक्रीडित न मोडता करावी)
Taxonomy upgrade extras