Skip to main content

प्रतिभा

तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 30/06/2015 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात जळाया लागलो... या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १० दिवस ज्याच्या साक्षीने ऐश केली त्या गणपती बप्पाला त्याच्या घरी पोचवायला आम्ही मिरवणूकीने निघालो होतो. मोठे मोठे डिस्कोलाईट होते आणि डिजेचा फुल साउंड सोडला होता आणि आम्ही सगळेजण त्याच्या तालावर बेभान होउन नाचत होतो. बर्‍याच वेळेला गाणे कोणते चालले हे पण समजत नव्हते. फक्त रीदम ऐकून मी त्यावर नाचत होतो. कारण मी जवळजवळ गेले १० तास त्या मिरवणूकीत नाचत होतो पण अजून मनाचे समाधान होत नव्हते. आजूबाजूला मिरवणूक बघायला येणारे लोक सारखे बदलत होते.

छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी सोमवार, 29/06/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! या स्पर्धेचा विषय जरा अवघड होता, मात्र तरीही खूप सुरेख प्रवेशिका आल्या आहेत. हा धागा मतदानासाठी. तुमच्या पसंतीचे पहिले तीन क्रमांक या धाग्यावर ८ तारखेपर्यंत नोंदवा.

तूर्तास महत्वाचे

लेखक निरन्जनदास यांनी शनिवार, 20/06/2015 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सोमवारपासून एका नव्या वैचारिक ठणाणाची सुरुवात होणारच आहे. पण त्या आधी काही मला महाजालच्या उत्खननात सापडलेल्या मौल्यवान नितांत सुंदर कोहिनूर हिऱ्यांचा शोध तुमच्या नजरेस आणावयाचा आहे. कदाचित तुमच्यातल्या काही खनकांन्ना आधीच हाती लागले असतीलही. पण मला नव्याने गवसल्याने ते आपणापुढे सादर करीत आहे. भक्तांनी लाभ घ्यावा.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

शब्द झाले मोती...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 29/05/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे..

('मी' ची कहाणी )

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 21/05/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते.

टाईमपास २ - बकवास फुल्ल टू

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 04/05/2015 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास २० वर्षांपूर्वीची माझी शोकांतिका सांगतो. देवाच्या दयेने (मार्कांच्या बाबतीत आम्ही अगदीच कंगाल होतो) एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळाला. दिल खुश हो गया. महाविद्यालय सुरू होण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे आमचे निरागस मन कल्पनेच्या उंच उंच आकाशात एखाद्या मोरपीसासारखे तरंगू लागले. ऐन तारुण्याचे दिवस ते. आणि हिंदी सिनेमातल्या तारुण्यसुलभ प्रेमाविष्कारावर पोसलेले आमचे कोवळे मन ते! निष्पाप होते.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.