Skip to main content

प्रतिभा

मेरा सुंदर सपना बीत गया.....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/01/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रकाशित ... ती एक न उलगडलेलं कोडं होती. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक..., जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्‍या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य गाजवलं. तिच्यावर हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तिच्या नशिबाने, तसेच जवळच्यांनीही खुप अन्याय केलेला आहे. 'सुजाता' मध्ये एक गाणं आहे.

बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ... "नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर." मला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा).

नवे संस्थळः पाहावे मनाचे! तुमचे स्वागत आहे

लेखक पाहावे मनाचे यांनी शुक्रवार, 16/01/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे. याच दरम्यान, गेल्या महिन्यात आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आमच्या आवडत्या विषयाला वाहिलेले संस्थळ काढायचे ठरवले - आणि लगोलग बनवले देखील.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 15/01/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

मला आवडलेले ऋतुरंग २०१४

लेखक नाखु यांनी शनिवार, 03/01/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे दिवाळी अंकाचे समीक्षण नाही किंवा जाहीरातही नाही. मला या अंकात भावलेले लिखाणाचा आकलन लेखा-जोखा म्हणा (फारतर) आहे. विषय घेतला आहे स्थलांतर =========================================== अनेक नावाजलेल्या लेखकांचे लेखन सशक्त अनुवादित आहे. १.गुलजार =रावीपार (विजय पाडळकर) फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चटका लावणारी कथा २.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ - व्यक्तिचित्रण

लेखक एस यांनी गुरुवार, 01/01/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो. मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
ह्या स्पर्धेचा विषय श्री. स्वॅप्स हेच सुचवणार असून स्पर्धेसाठी उपलब्ध प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवडही तेच करणार आहेत.

बंदुकीची गोळी आणि ती

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/12/2014 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थात केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे.

विषाणू (भाग २)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 14/12/2014 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
............. आदिवासी मानवापासून आपण सगळ्याच अर्थाने खूप दूर आलेलो आहोत. तरिही आपल्याला आपले मूळ ठिकाण बघण्याची आतुरता आहे. तिथे पोहचल्यावर पुरातन सृष्टी आपल्याला दिसेल. तिचा फ़क्त तेथेच आनंद लुटा. तेथून कोठलीही वस्तू आणणे हे धोक्याचे आहे. काहीही आणायला परवानगी नाही. हे लक्षात ठेवा.” विषाणू (भाग १) पुढे वाचा.... पृथ्वीवर पोहोचल्यानंतरचे सगळे सोपस्कार होऊन मंडळी आपापल्या कक्षांमधे विसावली. थोडा आराम झाल्यावर सगळ्यांचे आलिशान हवाई वाहनामधून आजुबाजुंच्या पर्वतराजीभोवती ऊड्डाण झाले. सरोवराच्या बाजुने भटकंती झाली.

विषाणू

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 06/12/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगत दूरच्या काळात, मंगळावर घडलेली ही कथा. अर्थात, त्यावेळी मराठी किंवा इतर भाषा नव्हत्या. थांबा, तुम्ही नीट समजावून घेतले नाही बहुदा! इतर भाषा नव्हत्या, म्हणजे, भाषाच नव्हत्या. माणसे होती, पण ती देखील आज आपल्याला समजणार नाहीत अशी! जेथे ही कथा घडली तेथे माणूस होता, पण त्याला ना मन होते, ना भाषा! जे काही होते, ते कालच्या काळापेक्षा खुपच वेगळे, आपल्या समजण्याच्या बाहेरचे. म्हणून, आजच्या वाचकांसाठी त्यांना समजेल अशी सादर केली आहे.