बालमजूर
हाय नशिबा माझी कहाणी
बालमजूर मी, बाल्यावस्थेची समाधी
बापाची माया लुटली जुगारी
मायची मारझोड उघड्या नजरी
आक्रंदती काळीज ममतेसाठी
ममताही मायची दव्यातच उरली
तिन्ही पोटचा मी भार वाही
देवही ना प्रसन्न उपाशी पोटी
शिक्षण ना चव हलव्याची
मालकाच्या लाथा अन तुकडा पदरी
कोवळे शरीर चिकटतसे सापळी
लाल रक्त जळून भिने काळ्या रंगी
खेळ, बागडण्यास ना त्राण अंगी
मायच्या जखमेची चिंता सदा उरावरी.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे.
ह्याबद्दल अधिक माहिती -